Jyoti gosavi

Others

5.0  

Jyoti gosavi

Others

माझे बालपण

माझे बालपण

2 mins
1.2K


माझे बालपण

बार बार आती है मुझको

मधुर याद बचपन तेरी

गया ले गया तू जीवन की

 सबसे मस्त खुशी मेरी चिंता रहित खेलना खाना 

वह फिरना निर्भय स्वच्छंद

कैसे भुल जा सकता है

बचपन का अतुलित आनंद


माझे बालपण एका अत्यंत मागासलेल्या खेडेगाव गावात गेले .परिस्थिती गरीब होती कसेबसे मुलींना नववी दहावी पर्यंत शिकवत व त्यांचे लग्न लावून देत असत पण त्या काळात माझ्या आईवडिलांनी मुलींना शिक्षण दिले व पायावर उभे केले. मुलीच आहेत, आज ना उद्या लग्न करून आपल्या घरी जातील .असा विचार त्यांनी केला नाही

दिवस गरीबीत काढले, पण कोणापुढे हात पसरला नाही. कोणाची लाचारी पत्करली नाही. तेव्हा शाळेच्या गणवेश शिवाय रंगीत कपडे असतात हे आम्हाला माहीत नव्हते. एक दांडीला व एक अंगावर अशी परिस्थिती होती.

मी अकरावीत कॉलेजला जाऊ लागले तेव्हा पायाला प्रथम चप्पल मिळाली. घड्याळ ,रेनकोट ,छत्री या गोष्टी आमच्या पासून कोसो दूर होत्या .त्या काळात वर्गात एखादी कडेच मनगटी घड्याळ असायचे नवीन पुस्तके घेणे परवडत नव्हते दुसऱ्या ची पुस्तके अर्ध्या किमतीत घेऊन ते वर्षभर वापरून पुन्हा पाव किमतीत विकायचो यावर्षीच्या वह्यातून कोरी पाने काढूनच त्याच्या वह्या घरी हाताने शिवायचो जवळजवळ सगळ्यांकडे हीच परिस्थिती होती

गरिबीत वाढलो, पण कधी उपाशी राहण्याची वेळ आली नाही आई-वडिलांनी येऊ दिली नाही वडील ,नाना खटपटी ,लटपटी करून आम्हाला जेवू घालायचे ते शेती करायचे, शिलाई मशीन चालवायचे, आणि भिक्षुकी पण करायचे मात्र त्यांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवले व आपल्या पायावर उभे केले

बालपणीच्या काळातील सामाजिक परिस्थिती बघता ,जातीपाती मधला द्वेष कोणाच्या मनामध्ये नव्हता लोकांची ओळख त्यांच्या नावाबरोबरच त्यांच्या जातीने व्हायची. अमका सोनार, तमका गुरव, हा बामण, हा माळी, हा महार , अशीच ओळख असायची पण त्यात कोणाला राग येत नव्हता

अजून एक बालपणीची चांगली गोष्ट म्हणजे त्या काळात टीव्ही मोबाईल कॉम्प्युटर नव्हते .गावात एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असायचा,तो पण ग्रामपंचायतीमध्ये, कार्यक्रम पण मोजकेच असायचे त्यामुळे नको त्या वयात नको ते कळत नव्हते .आमची बालपणातली निरागसता जपली गेली त्यामुळे आम्ही मैदानी खेळ खेळलोच ,शिवाय सागरगोटे ,काचाकवड्या लगोरी लपाछपी सुरपारंब्या अशा कित्येक खेळाची मजा घेतली. उत्तमोत्तम पुस्तके वाचली आईजवळ बसून रामायण महाभारत शिवरायांचे पराक्रम इत्यादी गोष्टी ऐकल्या खरोखर आमचे बालपण हे अत्यंत सामाजिक रित्या मानसिक रित्या सुबत्तेचे गेले असे म्हणावे लागेल आत्ताची सदोदित कॉम्प्युटर पुढे बसलेली व हातात मोबाईल लहान असलेली मुले बघितली की यांच्या बालपणाची कीव करावीशी वाटते

आमचे बालपण हे " रम्य ते बालपण "अशा सदरात नक्कीच मोडते

आमचा काळ हा "बालपणीचा काळ सुखाचा असाच होता"



Rate this content
Log in