माझे बाबा माझे हिरो
माझे बाबा माझे हिरो
एकदा अक्षय तृतीयेचा दिवस होता, आणि आई माहेरी गेली होती.
घरामध्ये वडील आणि आम्ही दोन बहिणी, आता सणवार असल्यावर घरातली गृहिणी घरामध्ये पाहिजे, तरच गोडधोडाचा स्वयंपाक होतो दर वर्षी आई पुरणपोळ्या करीत असत परंतु यावर्षी आजोबा आजारी होते म्हणून ती माहेरी गेली होती मी
पाचवीला होते हे मोठे बहिण नववीला होते वडील म्हणाले कशाला काळजी करता आपण पद्मा पेक्षा झकास स्वयंपाक करू माझ्या वडिलांना भाकरीपासून सारे काही करता येत होते .ते पण चुलीवर, त्यामुळे आम्ही दोघी आणि वडील, स्वयंपाक करण्यासाठी कंबर कसली आणि स्वयंपाक घरात शिरलो.
ते म्हणाले पुरणपोळ्या सोडता आपण सारं काही बनवू. मग त्यानुसार बहिणीने कणिक मळली आणि चपात्या मात्र वडिलांनी लाटल्या आणि भाजून मोठ्या बहिणीने घेतल्या.
खरंच चुलीवरती "धुरा" मध्ये स्वयंपाक करणे एक चॅलेंज असते, आणि नवख्या माणसाला ते लवकर जमत नाही .
आताच्या पिढीला तर नाहीच नाही, पण आम्ही हे सगळे केले आहे.
त्यादिवशी वडिलांनी आणि आम्ही दोघीनी मिळून भजी केली, वाटली डाळ केली, कोशिंबीर केली, कुरडया पापड तळले ,बटाट्याची सुकी भाजी केली, चपात्या केल्या आणि रव्याची खीर केली. आणि सगळा स्वयंपाक एकदम फर्मास झाला होता. त्यामध्ये आम्ही आपल्या लुटुपुटीच्या शिलेदार होतो. मुळ लढाई वडिलांची होती, अशा रीतीने त्यादिवशी ची अक्षय तृतीया आम्ही साजरी केली नैवेद्य निमित्य वाढला बनवला देवाला दाखवला पितरांचा घास ठेवला.
या सणाला पितरांची आणि धरणी मातेची कृतज्ञता पाळली जाते .
साधारण एप्रिल महिन्यामध्ये अक्षय तृतीया येते, त्यावेळी शेतातून सर्व धान्य घरी आलेले असते. परंतु त्या शेतातील किडे-मकोडे , जीव -जंतू शेतात राखणदार या सगळ्यांची कृतज्ञता पाळण्यासाठी, एका मडक्याला बाहेरून चुना लावला जातो.
त्याला "ढवळे"असे म्हणतात. त्याच्यामध्ये सर्व नैवेद्य भरायचा आणि शेतामध्ये नेऊन ठेवायचा .
ते सर्व करून आम्ही तिघे बाप लेकी, मिटक्या मारत आईची आठवण काढत जेवलो .आईची आठवण अशासाठी की, तू घरी नाहीस तरी आज आम्ही एकदम भारी जेवण करून जेवलोय.
