Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

माझा विद्यार्थी

माझा विद्यार्थी

1 min
160


  माझा विद्यार्थी हा माझे मूल आहे.हो ते माझेच मूल आहे असेच आपण त्याच्याशी वागतो.बरोबर ना!

  घराची पायरी ओलांडून प्रथम मूल समाजात पाऊल ठेवते ते पाऊल थेट सरस्वती मंदीरात ठेवते.आईला सोडून प्रथमच ते मूल शिक्षकांच्या स्वाधीन होते.मग इथे आपली भूमिका फार महत्वाची आहे.आपण त्याच्या बाई आणि आई दोन्ही बनणे आवश्यक आहे.तरच मूल आपलेसे होईल.आपल्या दिल्या जाणार्‍या संस्कारांना सामोरे जाईल.

   मूल शाळेत येते ते काहीतरी शिकायचे असेच आणि एवढेच कुटुंबातील लोकांकडून त्याने ऐकलेले असते. मग आपण या वर संस्कारक्षम गोष्टींच्या आधारे उत्तम संस्कार रूजवतो.

   कुंभाराचे काम काय? तर मातीच्या गोळ्याला आकार देणे.हेच आपण काम हाती घेतले आहे.हे प्रत्येक शिक्षकाने आधी आपल्या अंगी बाणवावे.

   बालवर्गात येणारे प्रत्येक बालक हे मातीच्या गोळ्यासमान आहे.या वर शिक्षकाला आचार ,विचार ,संस्कार यांचे खतपाणी घालून या गोळ्याला उत्तम आकार द्यायचा आहे.म्हणजेच मूल्यसंस्कारांचे बीज रूजवायचे आहे.

  लहान मुलांचे मन खूप निर्मळ व निष्पाप असते.आपण जसे त्याला सांगू तसे ते मूल घडते. बर्‍याचदा शिक्षकांच्या वागणूकीचा ,हस्ताक्षराचा,त्यांच्या विचारांचा,आचारांचा पगडा बालमनावर उमटतो. 

    म्हणून शिक्षकाने आलेल्या आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला वैयक्तिक मार्गदर्शन करून त्याला भारताचा उत्तम नागरिक घडवणे.ही फार मोठी जबाबदारी पार पाडायला हवी. 

  जर मूल शाळेतच उत्तम नागरिक घडले तर काॅलेजला त्याला वाईट संगत लागणार नाही.

  या साठी खरचच" शिक्षक हा शाळारूपी बागेचा माळी आहे " असे म्हटलेतर वावगे ठरणार नाही.असे मला वाटते.

   शि..शिकवण देणारा

   क्ष....क्षमाशील

   क...करूणासागर


Rate this content
Log in