माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी


पूर्वीच्या काळी उत्तम शेती मध्यम नोकरी व कनिष्ठ व्यापार असा एक समज होता. त्यावेळी खरोखर नोकरी करणाऱ्याला दोन ते पाच रुपयांपर्यंत पगार असायचा. व्यापाऱ्यांचे व्यापार बरसले पण शेतकरी नुसता नावाचा राजा नसून खरोखरी राजा असायचा. गावातील बारा बलुतेदार मंडळी त्याच्यावर अवलंबून असायची. दारात आलेला असा दोन पसा धान्य दिलं जायचं. दारावर आलेला कोणीही विन्मुख जायचा नाही.
गोठ्यात दोन-चार शेपट तरी असायचीच. घराच गोकुळ झालं असायचं आणि दुधा तुपाला वानवा नसायची. पाच-सहा भाऊ असले तर एकदोन नोकरी करायचे बाकीची शेती करायचे. असा बळीराजा माझं काय पण साऱ्या समाजव्यवस्थेचा बाप होता पण...
पुढे लोकसंख्या वाढली, खाणारी तोंडे वाढली, शेतांचे तुकडे पडले, त्यात पाऊस पडेना, प्रचंड जंगलतोड, धान्य कमी पिकू लागले. पिकले तरी शेतमालाला बाजारभाव घावना. माझा शेतकरी बाप रापलेल्या चेहऱ्याने दिवस-रात्र शेतात राबराब राबतो. त्याला ऊन लागत नाही. थंडी वाजत नाही की पाऊस लागत नाही. पावसात भिजून तू आजारी पडत नाही त्याचं त्याच्या काळ्या आईवर काळ्या मायवर आजही तितकंच प्रेम आहे जितका त्याच्यासारख्या आईवर आहे पण जेव्हा पोटाला चिमटा बसतो तेव्हा लेकरा-बाळांची तोंडं बघून दुःखी, निराश होतो व शेवटी आत्महत्येसारखा टोकाचा विचार करतो. त्याची चिल्लीपिल्ली उघड्यावर पडतात व पुन्हा त्याच काळ्या आईचं पाय धरतात.
उपाययोजना - मनाने खंबीर पाहिजे. आजची परिस्थिती उद्या राहत नाही हा विचार केला पाहिजे. शेतामध्ये रासायनिक खताचा वापर कमी केला पाहिजे. ऑरगॅनिक खते वापरली पाहिजेत. शेतीबरोबरच जोडधंदा केला पाहिजे. सर्वकाही सरकारनेच करावं ही मानसिकता बदलली पाहिजे. तरच माझ्या शेतकरी बापाला सुखाचे दिवस येतील. आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.