लोकडाऊन आणि आम्ही
लोकडाऊन आणि आम्ही
वर्तमान परिस्थिती बघता काय बरं प्रश्न पडतो तुम्हाला? गाड्या, ट्रेन, विमान सर्व बंद! पण त्याचा एक फायदा जाणवलाय का तुम्हाला! मला मात्र जाणवला...
बघा ना.. गाड्या बंद म्हणून प्रदूषणाला किती आळा बसलाय... म्हणून स्वच्छ हवा तरी मिळतेय. अपघात कमी झालेत.... म्हणून बऱ्याच जणांना जीवनदान मिळालंय. कारखाने बंद म्हणून रासायनिक प्रदूषण कमी झाल्यामुळे झाडे कशी हिरवीगार झालीत. नव्या नवलाईने नटलेल्या वनराईसारखी.
आणि नद्यांचं पाणी ते तरी किती स्वच्छ आणि निर्मळ. हे सर्व पाहून एक प्रश्न? वर्षातून किमान एकदा तरी लाॅकडाऊन करावं. पृथ्वीवरचा प्रदूषणाचा भार थोडातरी नक्कीच कमी होईल. जीवनमान उंचावेल.