नासा येवतीकर

Others

2  

नासा येवतीकर

Others

लिफ्ट

लिफ्ट

3 mins
1.5K


सहसा गाडीवार एकटे जाणे कधीच आवडत नाही. त्यामुळे कोणी लिफ्ट मागितली की नक्की त्यांना घेतो. मग गप्पा मारता मारता नियोजित ठिकाणी सहज पोहचता येते. तरी लिफ्ट देताना खtप विचार करावा लागतो, जसे की वयोवृद्ध किंवा ज्याला गाडीवर बसता येत नाही अश्यांना लिफ्ट देणे शक्यतो टाळावे कारण करायला जावे चांगले काम आणि व्हावे भलतेच म्हणून ती काळजी घ्यावी. महिला आणि तेही लेकुरवाळी यांना लिफ्ट न दिलेले बरे वाटते. फक्त ओळखीचे आणि खूप जवळचे असेल तरच त्या शिवाय शक्यतो लिफ्ट देण्याचा विचार करत नाही.


आज सायंकाळी घरी परत जाताना एका मुलाने लिफ्टसाठी हात दखविला. जेमतेम 18-20 वर्षांचा असेल, हे बघून त्याला लिफ्ट दिली. गाडीवर बसल्याबसल्या गप्पा चालू झाल्या. तो टू व्हीलर मेकॅनिक होता हे कळले. पाच-दहा मिनिटांच्या प्रवासानंतर रस्त्यावर एक व्यक्ती त्यांच्या गाडीला कीक मारुन थकला होता. त्याला त्याची गाडी काही चालू होत नव्हती. तितक्यात माझी गाडी तेथून जाऊ लागली असता त्याने मदतीसाठी हात दाखविला तसा मी थांबलो. मला गाडीचे काही ज्ञान नव्हते मात्र लिफ्ट दिलेला मुलगा मेकॅनिक आहे हे लक्षात होते म्हणून गाडी थांबविली. लगेच तो मुलगा खाली उतरला आणि अवघ्या दोन मिनिटांत गाडी चालू करून दिली. त्याने आमचे आभार मानले आणि तो पुढे गेला. तसे आम्हीही पुढे निघालो. आज लिफ्टमुळे त्या व्यक्तीला मदत करू शकलो याचा आनंद वाटत होता. मात्र बऱ्याच दिवसांपूर्वी लिफ्टमुळे माझी कशी अडचण झाली हे आठवले.


एकदा काय झाले, माझ्या गावातील एका मुलाने मला लिफ्ट मागितली, तसे मी त्याला बसायला सांगितले. नियोजित स्थळी सोडून मी माझ्या कामाला निघालो. रोजच्याप्रमाणे सायंकाळी घरी आलो तर सकाळी माझ्या गाडीवर बसलेल्या मुलाची आई माझ्या घरी आली आणि त्या मुलाची माझ्याजवळ चौकशी करू लागली. कारण सकाळी माझ्या गाडीवर बसताना अनेकांनी त्याला पाहिले होते. माझ्यासोबत गेलेला तो मुलगा परत घरी आलाच नव्हता. त्यामुळे आईला काळजी वाटू लागले की, मुलगा कोठे गेला असेल? सकाळी मी त्याला सोबत नेले होते आणि कुठे सोडले हे फक्त मलाच माहित होते म्हणून त्याची आई माझ्याकडे आली होती. पण मी त्याला लिफ्ट दिली होती, तो कुठे गेला मला काही माहित नव्हते, असे मी तिला सांगितलो. ती गेली तसे मलाही काळजी वाटू लागली होती की कुठे गेला असेल तो? दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्या बसने तो मुलगा गावात उतरला हे कळाल्यावर माझाही जीव भांड्यात पडला. त्यानंतर कोणत्याही मुलांना लिफ्ट देण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करतो आणि मगच त्याला लिफ्ट देतो.


असाच दुसरा प्रसंग माझ्या मित्रांसोबत घडला. त्यालासुद्धा माझ्यासारखी लिफ्ट देण्याची सवय. एकेदिवशी सवयीप्रमाणे तो नजीकच्या प्रांतातून आपल्या घरी परत येत होता. सायंकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग जमा झाले होते. काही क्षणात पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. तेव्हा एका तिशीच्या वयातील तरुणाने त्याला लिफ्ट मागितली. पावसात तो भिजेल म्हणून लगेच त्याने गाडीवर मागे बसण्यास होकार दिला. त्याच्याकडे एक मोठी पिशवी होती. तो तरुण पिशवी दोघांच्यामध्ये ठेवून मागे बसला. त्यांच्या गप्पा चालू झाल्या. पिशवीत काय आहे? याची विचारणा करूनदेखील तो उत्तर देत नव्हता. तेवढ्यात सीमेवरील चौकीदारने गाडी अडविली. त्याच्याजवळ गाडीचे सर्व कागदपत्रे बरोबर होती. त्यामुळे त्याला काही वाटले नाही मात्र मागे बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्यावर घाम सुटला होता. पोलिस मागच्या माणसाकडे वळले आणि त्या पिशवीत काय आहे हे विचारले. पण तो पोलिसांनादेखील काही सांगेना. तसे पोलिसांनी थेट पिशवीमध्ये हात घातला तसे शिंदीच्या (ताडी) पिशव्या हाताला लागल्या तसे पोलिसांनी गाडी बाजूला लावायला सांगितली. कारण येथे दारूविक्रीवर बंदी होती आणि काही लोक बाजूच्या राज्यातून आणून अशी दारूविक्री करत होते म्हणून हे तपासणी करत होते. माझ्या मित्राला आत्ता घाम सुटला होता. यात त्याचा काही दोष नव्हता पण पोलिस ऐकायला तयार नव्हते. त्याला लिफ्ट दिली असून माझा त्याचा काही संबंध नाही असे म्हटले तरी पोलिस ऐकायला तयार नाहीत. काय करावे हेच कळेना. त्याच वेळात आमचा एक पत्रकार मित्र तेथून जात होता. मित्राला पाहून त्याला जरा बरे वाटले. त्या पत्रकार मित्राने सगळी हकिगत ऐकल्यावर मित्राची खरी ओळख सांगितली तेव्हा पोलिसांनी त्याला सोडले. या घटनेनंतर ओळखीच्या व्यक्तीशिवाय तो कोणालाही लिफ्ट देत नाही. लिफ्ट देणे ही चांगली गोष्ट आहे मात्र लिफ्ट देताना काही काळजीदेखील घेणे आवश्यक आहे अन्यथा वेगळ्याच संकटाला तोंड द्यावे लागते, हे मात्र निश्चित.


Rate this content
Log in