लग्नबंधन
लग्नबंधन
हिंदीमध्ये एक मुहावरा आहे.
"शादी ऐसा लड्डू है जो खाये वो भी पछताए नही खाये वो भी पछताए "
लग्नबंधन या शब्दाची फोड लग्न+बंधन अशी आहे. लग्न ही तर दोन जीवाची जोडणी आहे .मिलन आहे. पण त्याच बरोबर बंधन देखील आहे .लग्न ही अशी संस्था आहे ज्याला काही नियम आहेत ,अटी आहेत, बंधने आहेत, शपथा आहेत, आणाभाका आहेत.
धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि नातीचरामी अशी शपथ हिंदू धर्मात वाहिली जाते तर ख्रिश्चन मुस्लीम धर्मात देखील सर्वांच्या साक्षीने शपथ दिली जाते.
'"आज पासून या व्यक्तीशी मी एकनिष्ठ राहीन, शारीरिक आर्थिक मानसिक सर्व प्रकारच्या सुखा-दुखात आम्ही एकमेकांच्या बरोबर राहू ,एकमेकाला मरेपर्यंत साथ देऊ." अशा अर्थाच्या शपथा दिल्या जातात .
आपली भारतीय संस्कृती, लग्नबंधन, साऱ्या जगात प्रसिद्ध आहे . आणि तिची भलावण केली जाते. आपल्याकडे तीन पिढ्या एकत्र आणतात नांदतात आणि या लग्न लग्न बंधनाच्या शपतां मुळे एकमेकाशी मरेपर्यंत निभावतात. पन्नास-साठ वर्षे एकत्र संसार करणे म्हणजे परदेशात मोठी आश्चर्याची गोष्ट ! कारण त्यांच्याकडे भाजीत मीठ कमी पडले म्हणून डिवोर्स होतात .
पण आजकाल आपल्याही लग्न व्यवस्थेवर पाश्चात्त्यांचे अतिक्रमण होऊ लागले आहे. घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. पूर्वी एखाद्या चे लग्न झाल्यानंतर आपण गोड बातमी आहे का? विचारत असू पण आता नीट सुखाचा संसार चाललाय का ? हे विचारावं लागतं. सर्वांचीच मुले एकुलती एक आणि लाडावलेली असतात. जे आपल्याला मिळालेले नाही ते मुलांना देण्याचा प्रयत्न कमावते आईबाप करतात. त्यात भरमसाठ अभ्यास, जीवघेणी स्पर्धा, यामुळे मुलांना घरातील जबाबदारी माहीतच नसते .आईबाप सगळ्या गोष्टीचे spoon feeding करतात . "How to cope with problem " हे मुलांना माहीतच नसते. त्यातून तू राजा आणि मी राणी मग ऐत पाणी कोण पाजणार? साध्या साध्या घर कामावरून छोट्या छोट्या गोष्टीवरून खटके उडतात आणि त्याची परिणीती मग मोठ्या भांडणात होते .रेडिमेट मागवण्याची ,हॉटेलिंग करण्याची की वृत्ती फोफावली आहे . कोणीच माघार घेत नाही ,कोणीच कमीपणा घेत नाही आणि मग लग्न बंधन नकोसे वाटते.
आता अजून एक अशी संस्कृती उदयाला येत आहे हे किंवा आली आहे "लिव्ह इन रिलेशनशिप "म्हणजे लग्न न करताच एकत्रित राहणे, लग्नातून मिळणारे फायदे हवे, पण जबाबदाऱ्या मात्र नकोत "नो किड्स, नो किचन," आणि नाहीच पटले तर लगेच सोडून द्यायला आणि दुसरा घरोबा करायला तयार ही येणारी संस्कृती ती आपल्या भारतीय संस्कृतीला नक्कीच मारक आहे.