लाॅक डाउन चा दुसरा दिवस
लाॅक डाउन चा दुसरा दिवस


एकवीस दिवस लॉक डाऊन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुढीपाडवा आला.
हिंदू वर्षाचा पहिला दिवस या दिवशी ठीक ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात.
पण यंदा मात्र सारा शुक शुकशुकाट.
गुढीसाठी साखर माळ नाही कडुलिंब नाही की फुलाचे तोरण नाही.
अगदी गुढी उभारावी का नको हा सुद्धा प्रश्न होता. कारण आठ-दहा तास आपण गुढी बाहेर उभी करणार तर काय करा? पण शेवटी घरांमध्ये जे उपलब्ध आहे, त्यातून गुढी उभारण्याचा निर्णय घेतला. व्हॉट्सऍप वर आलेल्या एका रेसिपी नुसार साखर माळ घरी तयार केलेले अर्थात ही बऱ्यापैकी बिघडली पण बऱ्यापैकी सद्य पण झाली अर्धेमुर्धे तुकडे असलेली साखर माळ आणि सोसायटीत असलेल्या झाडाची तगरीची फुले लावून गुढी उभारली. त्यातून घरकाम करणारी बाई गेल्या चार दिवसापासून येत नसल्यामुळे स्वयंपाकाचा लोड देखील पडल
ा पण माझ्या घरांमध्ये माझी मुले आणि हमारे श्रीमान जी सर्वांनी मदत केल्यामुळे स्वयंपाक लवकर झाला.
अजून तरी घरामध्ये पंधरा दिवसाचा स्टाक आहे त्यामुळे श्रीखंड-पुरी भजी बटाट्याची पिवळी भाजी चटणी कोशिंबीर अगदी शाही बेत केला.
परवा दिवशी माझ्या वाढदिवसाला आणलेले श्रीखंड मी घरात न वापरता एकदम दूरदृष्टीने विचार करणाऱ्या शहाण्या गृहिणी सारखे फ्रिजमध्ये ठेवून दिले. व तो दिवस गोडाच्या शिर्यावर भागवला. त्यामुळे ते श्रीखंड आज कामाला आले खूप दिवसांनी नवरा-बायको आणि दोन्ही मुले असे चौघे जण घरात होतो. एकत्रपणे गुढीचे पूजन केले एकत्रित बसून जेवलो. एकत्रित बसून आनंद घेतला मग दुपारचा वेळ गोडाचे जेवण डोळ्यावर आल्याने वामकुक्षी आणि संध्याकाळी थोडेसे सोसायटीच्या गेटपर्यंत बाहेर जाऊन आलो बाकी लाॅक डाऊन चा दुसरा दिवस तसा मजेत गेला.