Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

लाॅ डाऊन नंतरची रोजनिशी दिवस त

लाॅ डाऊन नंतरची रोजनिशी दिवस त

1 min
530


दिवस तिसरा - 27-3-2020


आज-काल बसमध्ये शुकशुकाट असतो आणि मला इतके दिवस वाटायचे बेस्ट बेस्ट बसच्या ड्रायव्हरला २०च्या वर गाडी चालवायची नाही असा काही नियम तर नाही ना पण आता मात्र सगळ्या गाड्या एकदम बुंगाट पळतात. माझ्या मुंबईतले रस्ते किती मोठे आहेत आणि लोकांना चालायला फुटपाथ देखील आहेत हे मला आज कळले

रस्त्यावर काहीच ट्राफिक नसताना सिग्नल यंत्रणा अजूनही का चालू असते ते मात्र समजत नाही. बेस्टच्या ड्रायव्हरची खूप दिवसांची इच्छा असणार एकदा तरी खाली रस्ता मिळावा आणि आपण सुसाट गाडी न्यावी ती मात्र पूर्ण होत आहे.


तरीपण मला त्यांचे नियोजन थोडेसे चुकल्यासारखे वाटते कारण अजूनही त्यांनी भरपूर गाड्या सोडलेल्या आहेत. बहुतेक बस जास्तीत जास्त दहा-बारा सिट घेऊन जातात त्यात वेळचे पण नुकसान आहे त्यापेक्षा त्यांनी नियोजन पद्धतीने दोन किंवा तीन बसेस नंतर एक दिवस अशा पद्धतीने बस सोडाव्या एकाच रूट वरती एकाच वेळी अनेक बजावतात त्यांचे टप्प्याटप्प्यात नियोजन करीत चालवले पाहिजे.


बाकी पोलीस कर्मचारी सफाई कर्मचारी इतर काही मदतीचे कर्मचारी बरोबर असतात यामध्ये सुरक्षारक्षकांचा प्रॉब्लेम होतो त्यांना कोणतीही बस घ्यायला पाहत नाही सुरक्षारक्षक हीसुद्धा इमर्जन्सी सेवा आहे मग ते खाजगी असो किंवा सरकारी असो त्यांना घेण्याची घेण्याची मेहरबानी करावी.


पहिल्या दिवशी मी माझ्याबरोबर अजून तीन सुरक्षारक्षकांना कंडक्टरला सांगून बरोबर घेऊन गेले. एक  कंडक्टर महाशय दारातच आयडी बघत होते त्याशिवाय वर चढून देत नव्हते असो तो पण त्याचे कर्तव्य पार पाडत होता आजची रोजनिशी बेस्ट बसेससाठी आता उद्याला हॉस्पिटलविषयी बोलू या


Rate this content
Log in