क्षमा
क्षमा
क्षमा दोन अक्षरी शब्द आहे.लहान शब्द पण या शब्दानेच मानव महान होतो.
क्ष..क्षमाशील व्यक्तीमत्व
मा...मायेप्रमाणे माया करणारा
क्षमा करणारा फार महान असतो.
आपल्याला एखाद्या व्यक्तीने रागावून बोलले तरी आपल्याला राग येतो.पण हा राग न दाखवता त्याला क्षमा करून आपण त्याचे चांगले मित्र बनलो तर त्याचा राग विरघळेल.
एखाद्याने शिव्या दिल्या म्हणून आपण तशाच शिव्या दिल्या तर त्यात आणि आपल्यात फरक काय?
त्याला आपण म्हणायचे या शिव्या मला नको आहेत.त्या तुझ्याजवळच ठेव.बघा बर काय होईल?..माहीत आहे मला आपण काही गौतम बुद्ध नाही .पण जर या आपल्या वर्तनातून समोरचा सुधारला तर चांगलेच आहे न.त्याला क्षमा करायची पुढे चालायचे..
पाण्याबाहेर आलेल्या विंचवाला पाण्यात सोडले त्याचा जीव वाचवला तरी तो हाताला नांगी मारायचे राहत नाही.जर आपण त्याला पाण्याबाहेरच ठेवले व त्याचा जीव गेला तर तर त्याच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला.क्षमा हा मानवाचा अत्यंत उत्तम गुणधर्म आहे .तो सर्वांनी
आपलेसे करावा म्हणजे आपल्याला होणारा बराचसा त्रास कमी होईल.
आपण काही संत महात्मे नाहीत प्रत्येक गोष्टीतच क्षमा करायला पण तरी या गुणाला आपलेसे केले तर जीवनातील अशांतता जावून शांतीचा आनंद नक्कीच उपभोगता येईल.
चला तर मग क्षमा हा गुण आतण आपल्यात आणूया व जीवनाचा आनंद उपभोगूया.
आनंद या जीवनाचा
सुगंधापरी दरवळावा
गाण्यातला सूर जैसा
ओठातूनी ओघळावा
झिजूनी स्वतः चंदनाने
दुसर्यास मधुगंध द्यावा....
