नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

कोरोनाची शिकवण

कोरोनाची शिकवण

3 mins
383


राजुची कोरोना टेस्ट आज निगेटिव्ह मिळाल्यावर दवाखान्यातील सर्व लोकांनी त्याचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले. दवाखान्याच्या गाडीतून त्याला त्याच्या मोहोर कॉलनीत नेण्यात आले. गाडी कॉलनीत आली तसे गच्चीवरून काही लोकांनी गाडीवर फुलांचा वर्षाव केला. राजुची बायको आणि त्याची दोन चिमुकली लेकरांना देखील त्याचे स्वागत केले. राजू जणू एक महायुद्ध जिंकून आपल्या घरी परत आलंय असंच काही वातावरण त्याला दिसून आला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळू लागले होते ते सुखाचे होते की दुःखाचे त्याला ही कल्पना करवत नव्हते. मात्र पंधरा दिवसापूर्वीचे चित्र त्याच्या डोळ्यासमोर आल्यावर त्यांच्या अंगाचा थरकाप उडत होता. त्या दिवशी तो रात्रभर खोकलत होता. अंगात जरा ताप देखील भरला होता. त्याचे खोकणे कॉलनीत सर्वाना ऐकू गेलं होतं. कोरोना टेस्ट करून घे म्हटलं तरी राजू लक्ष देत नव्हता. शेवटी कॉलनीतल्या कोणीतरी जागरूक युवकाने आरोग्य यंत्रणेला फोन केले तसे त्यांची गाडी आवाज करत कॉलनीमध्ये आली. पांढऱ्या पोशाखात असलेली तीन-चार माणसं खाली उतरली आणि राजूला व्हॅन मध्ये बसवून घेऊन गेलं. 

राजू कोरोना पॉजिटिव्ह निघाल्याची बातमी संपूर्ण कॉलनीत पसरली. राजू दवाखान्यात जाण्यास तयार नव्हता. पण नाईलाजास्तव त्याला दवाखान्यात जावेच लागले. तेथे राजू सारखे कोरोना पॉजिटिव्ह असलेले अनेकजण आपापल्या बेडवर आराम करत होते. पॉजिटिव्ह निघाल्याचे कोणालाही काही वाटत नव्हते शिवाय राजूच्या. राजू पॉजिटिव्ह निघाल्याचे कळाल्यावर कॉलनीत लोकं राजुचे घर वाळीत टाकले होते. त्यांच्या घराभोवती लाकडं बांधण्यात आली आणि कोणी ही संपर्क करू नये असा संदेश ही दिला. त्यामुळे राजुच्या कुटुंबाची चौदा ते पंधरा दिवस खूपच वाताहत झाली. कोण्या दुकानात जाता येत नव्हते, कोणी मदतीला तयार नव्हते, लेकरांना बाहेर पाठविता येत नव्हते. घरातले कोणीही पॉजिटिव्ह नव्हते शिवाय राजुच्या. पण कोणीही त्यांना मदत करत नव्हते त्यामुळे त्यांचा जीव मेटाकुटीला आले होते. कोरोना काळातील ते चौदा दिवस चौदा वर्षासारखी वाटू लागली होती. घरात राजुची आई होती एका खोलीत. तिचा दरवाजा नेहमी बंदच असायचा. राजुची बायको तिला कधीही बाहेर येऊ दिले नव्हते. आपल्या लेकरांना त्या घरात कधीही जाऊ दिली नाही. एवढंच काय ती राजूला देखील तिच्याजवळ जाऊ देत नव्हती कारण ती त्वचेच्या एका रोगाने त्रस्त झाली होती. तिला स्पर्श केला तर तिचा रोग आपणाला ही लागेल अशी तिची समजूत होती. त्यामुळे ती त्या राजूच्या आईला गेल्या दोन वर्षांपासून अंधार असलेल्या खोलीत डांबून ठेवली होती. तिचे अन्न-पाणी दुरूनच तिला दिले जायचे. आठवड्यातून एखाद्या दिवशी तिला स्नान करायला मिळत असे. अंधारातून उजेडात आली की तिचे डोळे दिपून जायचे. ती प्रकाश सहन करू शकत नव्हती. राजुचे वडील गेल्यापासून तिची खूपच दयनीय अवस्था झाली. ते असतांना सर्वचजण काळजी घेत कारण राजुच्या बापाजवळ थोडे फार पैसे होते त्यामुळे त्यांची सर्व सोय होत होती. राजुच्या आईजवळ काहीच नव्हते म्हणून ते गेल्यावर तिची खूपच परवड झाली होती. 

आईसारखेच आज राजूवर जीवन जगण्याची वेळ आली. एवढंच नाही तर राजुच्या परिवाराला देखील आईसारखे जीवन जगायला मिळाले. बाहेरील लोकं आपापसात कुजबुजत असत आणि म्हणत असत, " आपल्या कर्माची फळं, इथेच भोगावी लागतात, जसे राजु आणि त्यांचे परिवार भोगत आहे ."

कोरोना पॉजिटिव्ह आल्यामुळे चौदा दिवसांत जे शिकायला मिळायला हवं ते सर्व राजू आणि त्याच्या पत्नीला शिकण्यास मिळाले. चौदा दिवसानी राजू आपल्या घरी आल्यावर सर्वप्रथम आपल्या आईच्या खोलीत गेला. तिचे पाय पकडून क्षमा मागितली आणि यापुढे तू ह्या खोलीत नाहीतर आमच्यासोबत राहायची असे तिला सांगून तिला बाहेर आणलं. राजुच्या बायकोने देखील यास विरोध केला नाही कारण कोरोनाने तिला पण चांगलाच धडा शिकवला होता. तिने देखील सासूचे पाय धरून माफी मागितली. 


( ही कथा हिंदी भाषेत वाचली होती, त्या लेखकाचे नाव काही लक्षात राहिले नाही, मात्र कथेचा अर्थ भावला. त्यामुळे, माझ्या शब्दात मराठी मध्ये अनुवाद केली आहे. )


Rate this content
Log in