कन्यादान
कन्यादान
खरे तर कन्यादान हा शब्दच कानाला खटकतो .कन्या ही काही एखादी वस्तू नाही ,की जी एकाने उचलून दुसर्याला द्यावी. दान म्हणजे कायमस्वरूपी देण्यात येणारी वस्तू.
पूर्वीच्या काळी कदाचित मुलींची संख्या जास्त असल्याने ही संकल्पना अस्तित्वात आली असेल .परंतु काळानुरूप ती बदलली पाहिजे स्री आणि पुरुष संसाराच्या एका रथाची दोन चाके असतात त्या दोघांच्या बॅलन्सिंग वर संसार उभा असतो आता तर ती त्याच्या खांद्याला खांदा लावून आर्थिक भार देखील पेलते किंबहुना बऱ्याच वेळा पुरुष फक्त निष्क्रिय बसलेला असून स्त्रियाच घर चालवितात अशावेळी ती मुलगी दानाची वस्तू कशी काय असू शकते?
त्याकाळी आठव्या वर्षी मुलींची लग्ने होत असत
"अष्ट वर्षात भवेत कन्या पुत्रवत पालिता मया"
याचा अर्थ वयाच्या आठ वर्षापर्यंत मी तिला मुलासारखी वाढविलेली आहे मग अशी लाडाकोडात वाढलेली मुलगी, तुमच्या घरातील परी, दुसऱ्याला दानात का द्यायची? तिची सन्मानाने पाठवणी करायची आणि त्यांना ठणकावुन सांगायचे की आमची मुलगी ,आम्ही तुम्हाला देत आहोत तिला प्रेमाने वागवा माणसाप्रमाणे वागवा.