Seema Kulkarni

Children Stories

2  

Seema Kulkarni

Children Stories

किल्ले रायगड

किल्ले रायगड

3 mins
57


आज कितीतरी दिवसांनी यश आणि बाबा टेकडीवर फिरायला निघाले होते. दिवाळीची धामधूम नुकतीच शांत झाली होती. नेहमी दिवाळीच्या सुट्टीत मामाच्या गावी जाणारा यश, यावेळेस इथेच होता. आजीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे आईला आणि त्याला गावाला जाता येत नव्हते. बिल्डिंग मधले रोजचे मित्रही बहुतेक जण गावाला गेलेले. त्यामुळे यशचा मूड ठीक नव्हता. विनाकारण चिडचिड करत होता. कारण यश ला करमत नव्हते. आईच्या पाठीमागे आजीचे काम होते. मोबाईल खेळायला आवडतो पण, बाबांच्या धाकामुळे जास्त वेळ तो घेऊ शकत नव्हता. बाबा ही तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला रुजू झाले होते. त्याचे मन दुसरीकडे बदलण्यासाठी, बाबा आज त्याला मोकळ्या हवेत टेकडीवर फिरायला घेऊन आले होते.

सकाळची ती थंड,ताजी हवा मनाला अल्हाददायक वाटत होती. त्या वातावरणात यश ची कळी थोडी खुलली. त्याच्या कलाने घेत घेत बाबांनी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. यशचे प्रश्न, बाबांचे उत्तर असा वेळ छान जात होता.बोलता-बोलता बाबांनी त्यांच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी सांगायला सुरुवात केली. दिवाळीच्या सुट्टीत काय काय धम्माल चालायची, हे ते अगदी रंगवून सांगू लागले. यशही त्यामध्ये रमून गेला. त्याची मरगळ, चिडचिडेपणा त्या थंड हवेत विरून गेला होता. अर्धवट उडलेले फटाके परत गोळा करून ते उडवणे, यातली मजा ऐकताना यशला खुप हसायला आले. बाबा एकदम बोलले,

 "बरं का यश, आम्ही ना लहानपणी मोठ्या मातीचा किल्ला पण बनवायचो बर का,"

 "किल्ला?" यशने प्रश्नार्थक चेहरा करून विचारले.

 कारण हल्ली मोबाईलच्या जमान्यात, ही गोष्ट अगदी दुर्मिळ झाली आहे.

 "हो रे,आमच्या आजोबांनी, आमच्या बाबांनी आम्हाला बनवायला शिकवले होते आणि ते दोघे पण आम्हाला मदत करायचे बरं का. आम्ही तीन ते चार दिवसात खूप छान किल्ला बनवायचो मातीचा. मग नंतर त्याला थोडे सजवत होतो. शिवाजी महाराज, मावळे यांच्या मुर्त्या उभ्या करायचो"

"तुम्हाला किल्ला बनवता येतो बाबा? यश ने विचारले

 " हो, आता बर्‍याच वर्षात नाही बनवला पण विसरलो नाही बर का!"

 बाबांच्या अगदी जवळ येऊन यश बोलला,

 "बाबा मला पण शिकवाल किल्ला बनवायला?"

"का नाही बाळा,आपण उद्याच सुरुवात करू. मस्तपैकी किल्ला बनवू.

   यशचा चेहरा आनंदाने चमकला. मग दुसऱ्या दिवसापासून माती आणने, किल्ल्याची जागा निश्चित करणे, किती मोठा बनवायचा या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली. यश अगदी उत्साहित झाला होता. बाबांना लागेल ती मदत करत होता. बाबांच्याही जुन्या आठवणींना या निमित्ताने उजाळा मिळाला होता.

   काळी मऊसूत माती आणली गेली. छोट्या-मोठ्या काठ्या मातीमध्ये रोवून त्यावर गोणपाट टाकले गेले. त्यावर ओल्या मातीचा थर दिला गेला. अशा प्रकारे सुरुवात झाली. बाजारातून शिवाजी महाराज आणि मावळे यांच्या ढाल-तलवार घेतलेल्या छोट्या छोट्या मूर्ती आणल्या गेल्या. यशचे मन दुसरीकडे गुंतले हे पाहून आईला ही बरे वाटत होते. हळूहळू किल्ला आकार घेत होता. यशच्या ज्ञानात एक नवीन भर पडत होती.

 "यश आता मी बनवतोय पण पुढच्या दिवाळीला तू स्वतः बनवायचा किल्ला."बाबा मधेच बोलले. यश ने होकारार्थी मान हलवली. पाहता पाहता किल्ला तयार झाला. आता रंगरंगोटी बाकी होती. बुरुजांना वेगळा कलर दिला गेला. पांढरे पट्टे उमटवले गेले. मावळे, शिवाजी महाराज यांना त्यांच्या त्यांच्या जागेवर बसवण्यात आले. सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज अगदी शोभून दिसत होते. आणि किल्ल्याच्या नावाची पार्टी झळकली. "किल्ले रायगड" 

   बाबांनी जोरात गर्जना केली. "शिवाजी महाराज की जय".

   यश परत-परत बनवलेल्या किल्ल्याकडे एकटक पाहत होता.



Rate this content
Log in