Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

खरा शत्रू कोण

खरा शत्रू कोण

2 mins
284


शेवटी विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा झाडावरती चढून, झाडावर लटकलेले ते प्रेत खाली काढले आणि आपल्या खांद्यावरती घेतले. आणि तो वाट चालू लागला. 

हा!हा!हा! वेताळ हसला. "राजा विक्रमादित्य! तू शूर आहेस, धीट आहेस, परंतु तू उगाचच स्वतःला कष्ट घेत आहेस, आणि एखाद्या वाईट माणसासाठी काम करत आहेस. 

तरीपण सगळ्या रस्त्याने जाताना, तुझा देखील वेळ जावा म्हणून मी तुला एक कथा सांगणार आहे. 

त्या कथेच्या शेवटी तुला एका प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे. तुला माहित आहे जर का तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला माहित असून जर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायावरून लागतील. आणि जर तू बोलला तर मी चाललो. 

तर आता ऐक! मी सांगतो ती कथा. 

भारत देश हा एक संपन्न देश आहे. तेथे सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकाशी गुण्यागोविंदाने नांदतात .परंतु भारताला दोन शेजारी देश आहेत. एका देशाचे नाव चीन असून दुसऱ्या देशाचे नाव पाकिस्तान आहे. भारताचे हे दोन्ही शेजारी, मित्र नसून शत्रू आहेत. 

परंतु ते उघडपणे सांगत नाहीत. वरून वरून ते मखलाशी करतात तुम्ही आम्ही मित्र आहोत. असे भासवतात . 

वास्तविक पाहता त्यातील एक शेजारी हा पूर्वी आपल्या भारतचा भू भाग होता. परंतु तो काही मतलबी लोकांमुळे वेगळा करून द्यावा लागला. 

दोन भाऊ वेगळे झाल्यानंतर देखील, लहान भाऊ सतत कागाळ्या करीत राहिला. मोठ्या भावाच्या प्रॉपर्टी वर डोळा ठेवून राहिला. तो आपला शेजारी आपल्याशी उघडपणे शत्रुत्व करून आहे.

परंतु दुसरा भाऊ हिंदी- चीनी भाई भाई म्हणत आपल्याशी पाठीमध्ये सुरा खुपसतो. 

1963 च्या युद्धात देखील त्याने आपल्या पाठीत सुरा खुपसला आणि

आपला भूभाग बळकावून घेतला. आणि आत्ता देखील गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी केली. 

तर पाकिस्तानने आत्तापर्यंत आपल्याबरोबर तीन वेळा युद्ध करून प्रत्येकवेळी तो तोंडावर पडला आहे. 

तरी तो आपल्याशी कधी मैत्री ,तर कधी शत्रुत्वाचे नाते दाखवत राहतो. 

तर यामध्ये आपला जास्त शत्रू कोण? आपण यापैकी कोणावर विश्वास दाखवला पाहिजे? 

याचे उत्तर तुला माहीत असून जर तू दिले नाही तर त्याचे काय परिणाम होतील तुला माहीतच आहे. विक्रमादित्य काही काळ शांत राहिला त्यानंतर त्याने उत्तर दिले "वेताळा शत्रू हा शत्रूच असतो. तो कमी किंवा जास्त असा शत्रू नसतो .

एकाने हिंदी चीनी भाई भाई चा नारा दाखवत विश्वास घात केला. परंतु त्यानंतर तो तुमच्याशी भाईचारा सांगायला आला नाही. 

परंतु दुसरा देश मात्र नेहमीच संबंध सुधारण्याची भाषा करतो आणि अतिरेक्यांच्या कडून तुमच्यावरती हल्ला करतो. कधी खोट्या नोटांच्या रुपाने, कधी ड्रग्जच्या रूपाने, तर कधी सव्वीस अकरा च्या हल्ले करण्याच्या रुपाने, तो तुमची सामाजिक आर्थिक मानसिक सर्व बाजूंनी नुकसान करत आहे. आणि शेवटी सीमेवरच्या जवानांना देखील अचानक हल्ले करून, भ्याड हल्ले करून, मारण्याचे कृत्य करतो आहे. त्यामुळे दोघेही सारखेच शत्रू आहेत त्यापैकी कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत शेवटी शत्रूला शत्रू असतो . 

त्याबरोबर राजा तू न्यायी आहेस ,हुशार आहेस, पण तू एक चूक करतो आहेस. 

तू बोललास! की मी चाललो. 

हा हा हा असे म्हणत वेताळ पुन्हा उडून गेला आणि झाडावरती ते प्रेत लटकले.


Rate this content
Log in