नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

खोडकर कृष्णा

खोडकर कृष्णा

3 mins
202


त्याचं नाव कृष्णा होतं. नावाप्रमाणे तो नटखट आणि खोडकर होता. दिसायला देखील कृष्णासारखा सावळा होता. दुसऱ्याची खोड करण्याची त्याला वाईट सवय होती. त्याच्या या सवयीला सारेचजण कंटाळले होते. त्याच्यावर कोणताच उपाय काम करत नव्हता. घरातील आईवडील, शेजारचे आणि शाळेतील शिक्षक सारेचजण त्याच्या खोड्यापुढे हतबल झाली होती. वर्गाचे बाहेर ठेवलेले चप्पल बाजूला फेकून देणे, दुसऱ्याचे दप्तर लपवून ठेवणे असे अनेक खोड्या करण्यास तो पुढे असायचा. मात्र कोणाची वस्तू चोरण्याची सवय त्याला नव्हती. त्याच्या जीवनात काळे गुरुजीने प्रवेश केला आणि त्या खोडकर कृष्णाचे रूपांतर प्रेमळ कृष्णामध्ये झाले. अशक्य वाटणारी गोष्ट काळे गुरुजींनी शक्य करून दाखविली. शाळेत आल्याबरोबर कृष्णाच्या अनेक करामती पाहून काळे गुरुजींनी त्यावर उपाय करण्यासाठी नियोजन तयार केले. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्याबरोबर काळे गुरुजींनी कृष्णाला एक छोटे काम सांगितले आणि त्याने ते सहज पूर्ण केले. त्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत झाले. कृष्णाला मनोमन खूप आनंद वाटले. कृष्णामध्ये बदल होऊ शकते याची जाणीव काळे गुरुजीला झाली. त्यांनी कृष्णाला संपूर्ण वेळ आपल्यासोबत ठेवत.

गावात काही कामानिमित्त जायचे असेल तर सोबतीला कृष्णा असायचा. गावात तो सर्वांचा परिचित होता कारण तो गावात खूप फिरतो. फिरतांना त्याच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात सायकलचे टायर राहत असे. सरांनी त्याला विचारले, कृष्णा तुला गावातील संपूर्ण लोकं ओळखीचे आहेत का ? यावर कृष्णाने उत्तर दिले, होय. कसे काय ? काळे गुरुजींनी लगेच दुसरा प्रश्न विचारला. त्यावर कृष्णा हसत हसत म्हणाला, मी याच गावातला आहे ना ! या उत्तरावर सर फक्त हसले आणि परत शाळेत आले. कृष्णा खोडकर असला तरी अभ्यासात मात्र हुशार म्हणता येणार नाही पण जास्त ढ असा ही नाही. त्याचे मराठी वाचन चांगले होते, लेखन चांगले नव्हते, आणि गणित थोडे कच्चे होते. काळे सरांनी त्याचा पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यावर प्रकल्प तयार केला. त्यादिवशी काळे सरांनी विविध डबे आणले होते आणि त्यात वेगवेगळ्या वस्तू होत्या. ते सर्व डबे कृष्णाच्या हातात देऊन त्यांनी दहा दहा असे गट करायला सांगितलं. त्याप्रमाणे तो दिवसभर कामात व्यस्त होता. त्यामुळे त्याला खोड्या करायला वेळच मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी सरांनी हातात खूप पेपर घेऊन आले होते. ते सर्व पेपर कृष्णाच्या हातात देऊन एक कात्री दिली आणि रंगीन चित्र व्यवस्थित कापण्यास सांगितलं. त्यादिवशी देखील तो व्यस्त होता. हे सारे काम मुलांपासून वेगळे बसून करण्यात येत त्यामुळे मुलांना आता कृष्णाचा त्रास जाणवत होता. कृष्णाला दिवसभर कामात व्यस्त ठेवल्यामुळे त्याची खोड्या करण्याची वृत्ती हळूहळू कमी होऊ लागली. एक आठवडाभर केलेलं कामातुन एक छान प्रोजेक्ट तयार करण्यात आले. त्या प्रोजेक्टचे प्रदर्शन सर्व मुलांसमोर केल्यानंतर सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. यावेळी कृष्णाला विलक्षण आनंद झाला होता. त्याला आता अभ्यासाची गोडी लागली होती. गणितं सोडविताना डब्यातील विविध वस्तूचा वापर करू लागला. असे करतांना त्याला गणितं सोडविण्याची आवड निर्माण झाली. काही दिवसांतच कृष्णामध्ये आमूलाग्र असा बदल होऊ लागला.

काळे सरांनी जो विचार करून प्रोजेक्ट तयार केला होता तो आता यशस्वी होताना दिसू लागला होता. कृष्णाची मूळ समस्या होती त्याचे अक्षर चांगले नव्हते म्हणून लिहिण्याचे टाळत असे, वाचन करताना जोडाक्षर शब्द आले की त्याचे वाचन थांबायचे त्यामुळे वाचनाचा कंटाळा करत असे आणि गणितं करता येत नसल्याने सारी मुले त्याला चिडवत होती, तसेच शाळेतील सर्व वेळ घालविण्यासाठी तो असे खोड्या करायचा, या सर्व समस्याच विचार करून त्यांनी कृष्णाला शाळेतील संपूर्ण वेळ कामात व्यस्त ठेवले. त्याच्या हातात पेपर देऊन अनेक शब्दांचे वाचन करण्याचा सराव झाला तसेच अंकाची ओळख करण्यासाठी डब्यातील विविध वस्तू कामाला आले. नकळतपणे कृष्णाचे अभ्यास झाले आणि खोडकर कृष्णा अभ्यासू झाला.


Rate this content
Log in