खेळाचे महत्व
खेळाचे महत्व
रोहन लॉकडाऊनपासून फक्त मोबाईल आणि कॉम्पुटर च खेळत होता. बाहेर खेळायला जाणे त्याने बंदच केले. त्यामुळे त्याची इम्म्युनिटी खुप कमी झाली तसेच त्याची वाढही व्यवस्थित झाली नाही आणि वजन ही वाढले नाही. लॉकडाउन लागला तेव्हा तो चौथीत गेला होता. आता तो सहावीत शिकत होता. आई वडील त्याला खुप बाहेर खेळायला सांगत होतेपण तो बिल्कुल ऐकत नव्हता शेवटी आईने त्याच्या टीचर ला सांगितले. टीचरचे मुलं ऐकतात म्हणून तिनी तसे आईने टीचर ला सांगून प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न केला.
रोहनच्या टीचरनी सर्व मुलांना एक टाइम टेबल आखून दिला त्यात तिने मुलांच्या अभ्यासाच्या वेळा तसेच खेळण्याची वेळ खाण्याची वेळ ठरवून दिली आणि तिनी सांगितले की हा टाईम टेबल सर्वानी एक महिना पाळायचा. जो हा टाईम टेबल पाळेल त्याला बेस्ट स्टुडन्ट चा अवॉर्ड मिळेल. पण सर्वांमधून बेस्ट स्टुडन्ट कसे ठरवणार. तर त्यासाठी एक बुक करायची त्यात काय खाल्ले. अर्थात ते पौष्टिक असायला पाहिजे.त्याची नोंदणी करायची. आज कोणते खेळ खेळले. त्यात किती मुलं होती. त्यापासून काय फायदा झाला. ह्याची नोंदणी करायची.कुठला नावीन्यपूर्ण खेळ खेळला हे पण लिहायचे. त्यात तुम्ही तुमच्या आईबाबांच्या काळातील खेळ ही खेळू शकता. पण सर्व खेळ सांघिक आणि मैदानातले असायला पाहिजे.आपल्या वर्गाच्या ग्रुप मध्ये रोजचे फोटो टाकायचे. हे ऐकून सर्व एक्साइटेड झाले आणि सर्व मुलं चढओढीने नवनवीन खेळ शोधून खेळू लागले. त्याचे महत्व समजवून घेऊन त्याची माहिती लिहू लागले. आई वडिलांना त्यांच्या लहानपणीचे खेळ विचारू लागले. रोहनच्या आईनी त्याला लंगडी, खो खो, विषमृत,नदी का पहाड,शिवाजी म्हणतात ह्या खेळांची माहिती दिली. त्या सर्वांचे महत्व सांगितले. रोहन नी सर्व माहिती गोळा करून लिहिले पण त्याला पहिले दोन महिने बेस्ट स्टुडन्ट चे अवॉर्ड नाही मिळाला. पण रोहन ला खेळण्याची आवड निर्माण झाली. सांघिक खेळाने कसे एकमेकांसोबत ट्युनिंग जमते एकी वाढते. तसेच खेळल्याने कसे हॅन्ड आय कोओरडईनेशन होते हे कळले. त्याची हेल्थ चांगली झाली, इम्युनिटी वाढली, उंचीही वाढू लागली नंतर पुढे त्यालाही बेस्ट स्टुडन्ट चे अवॉर्ड मिळाले. त्याचा स्क्रीन टाईम कमी झाला.
