खेळ
खेळ
हा खेळ कुणाला दैवाचा कळला
दैव लेख ना कधी कुणा कळला
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे
खेळ खेळणे, खेळवणे ,
हा राजकारण्यांचा खेळ, नुसतं खेळवत राहिलाय, असे अनेक वाक्प्रचार आपल्याकडे आहेत.
आणि त्याचे वेगवेगळे संदर्भ लागतात.
आता पहिलं जे गाण्याच कडव मी घेतलेल आहे
हा खेळ कुणाला दैवाचा कळला
दैव लेख ना कधी कुणा टळला
हा असो, ही असो ,
मी असो कुणी असो
याच्यामध्ये असा अर्थ आहे की ,कोणाच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे? हे कधी कोणाला माहित पडत नाही .
तेथे कोणीही व्यक्ती असू दे, रंक अथवा राव असू दे, आयुष्याच्या खेळात उतरल्यानंतर पुढे जे काही डाव येतील ,ते खेळावेच लागतात .विधीलिखित कधी कोणाला कळत नाही असा त्याचा अर्थ आहे
दुसरा मात्र संत तुकारामांचा अभंग आहे.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
येथे मात्र वारकरी लोक, दिंडी मधील चालणारे विविध प्रकारचे खेळ, त्यातून मिळणारा आनंद, भक्ती,हा संदर्भ आहे. शिवाय त्याला अध्यात्माची जोड देखील आहे. आणि वर्ण अभिमान विसरली याती
एक एका लोटांगणी जाती
इथे सगळे लोक आपला जातीभेद विसरून पांडुरंगाच्या पायाशी लीन होतात.
सगळे एकमेकांचे भाऊ भाऊ म्हणून त्यांना,
वैष्णव भाई हा शब्द वापरलेला आहे.
आता प्रत्यक्षात खेळ खेळणे, इथे मैदानी खेळ, बैठे खेळ, असा देखील अर्थ आपण घेऊ शकतो.
आणि मैदानी खेळामध्ये धावणे ,कुस्ती, किंवा अनेक खेळ येतात.
बैठ्या खेळांमध्ये कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, असे खेळ येतात.
खेळाने काय होते ?
खेळाने माणसाला शारीरिक तंदुरुस्ती राहते. बुद्धीची वाढ होते .शिवाय मैदानी खेळ ही सामूहिक गोष्ट असल्यामुळे ,त्यातून निर्माण होणाऱ्या आनंदामुळे शरीरात आत मध्ये चांगले बदल घडतात. लोकांचे एकमेकांशी संबंध वाढतात. म्हणून खेळ हे खेळावेच, परंतु आजकालची पिढी मोबाईल किंवा कॉम्प्युटर वरती गेम खेळण्यांमध्ये धन्यता मानते, आणि कधी कधी त्यामध्ये पैशांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होते .
त्यापेक्षा लहानपणापासूनच मुलांना मैदानी खेळाची आवड लावली पाहिजे.
ती कशी लागणार? त्यासाठी संध्याकाळी पालकांनी आपल्या मुलांना मैदानात घेऊन गेले पाहिजे.
जापान ,चीन इकडच्या देशांमध्ये पहा, त्यांच्याकडची मुले संध्याकाळी मैदानी खेळात गुंतलेली असतात .
अजून खेळाचा संदर्भ येतो, म्हणजे आपण बोलता बोलता बोलतो ,
"ते बाबा पैसे वाल्यांचे खेळ" आपल्याला परवडतात का? तिथे संदर्भ येतो सामाजिक परिस्थितीचा, गरिबी श्रीमंतीचा ,कारण कोणती एखादी मोठी गाडी खरेदी करणे, एखाद्या परदेशी टूरला जाणे,मुलांना महागड्या गिफ्ट देणे, हे सारे पैसे वाल्यांना परवडते, गरिबांना नाही .
अजून एक वाक्प्रचार आपण म्हणतो
" हे राजकारण्यांचे खेळ" इथे एकमेकांवर कशी कुरघोडी करायची ,
कसं तोंडावर पाडायचं, कसे मुद्दे पकडायचे, एखादी छोटीशी गोष्ट असते, जी आपल्या डोक्यात देखील येत नाही.
पण राजकारण्यांना मात्र ती बरोबर सापडते, ते राजकारणाचे खेळ .
अजून आपला एक शब्द प्रयोग आहे "नशिबाचे खेळ_" म्हणजेच विधीलिखित आणि प्राक्तन आपण मगाशी वरती रेफरन्स पाहिला, जे विधी लिखित कोणाला कळत नाही ,समजत नाही ,तेच प्राक्तन !
अशा रीतीने खेळ आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत. ते बैठे असू द्या मैदानी असू द्या नाहीतर माणसाने माणसांसाठी घडविलेले असू द्या, पण खेळ हवेत.
