Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

कबीरांचे दोहे

कबीरांचे दोहे

3 mins
98


(संत कबीर यांचा जन्म 1440 (प्रताप घर) आणि मृत्यू 1518 (मघर) ) 


त्यांना दैवी मुल म्हणून समजले जाते .त्यांच्या जन्माबद्दल अनेक वाद प्रवाद आहेत. 

कोणी म्हणते ते अयोनी संभव आहेत. 

त्यांच्या मातेच्या हातामध्ये चा त्यांचा जन्म झाला. कोणी म्हणते एका ब्राह्मण विधवेचे मूल आहे, ते मुस्लिम जोडप्याने सांभाळले. 

ते जन्माने हिंदू होते पण नीरज आणि निमा या विणकर मुस्लिम जोडप्याने त्यांचा सांभाळ केला. 

त्यांनी स्वामी रामानंद यांना आपले गुरू मानलेले आहे. त्यांनी "राम-रहिम" ऐक्याची भावना प्रगट केली. 

त्यांना हिंदू मुसलमान ऐक्याचे प्रतीक मानले जाते. त्यांची राम कृष्ण हरी विठ्ठल यांच्यावर ची अनेक भक्ती गीते प्रसिद्ध आहेत. 


शिवाय कबीर काळाच्याही चार पावले पुढे होते. उदारता वादी असण्याचे जे मत आपण आत्ता व्यक्त करतो कबीर त्याकाळात स्वतःचे मत मांडत असत. त्यामुळे त्यांना विरोधही पुष्कळ झाला. 

कबीरा च्या पत्नीचे नाव "लोई "मुलगा "कमाल" आणि मुलगी" कमाली" आता आपण कबीरांच्या दोह्यांबद्दल पाहूया 


मुल्ला बनकर अल्ला पुकारे

वो या अल्ला सुनता है/

 चिऊटके(मुंगी) पग मे जेवर बाजे 

वो क्या अल्ला बहरा है


याचा अर्थ असा आहे की मुल्ला बनवून जोराने अल्ला म्हणून बांग दिली किंवा आवाज दिला तरच अल्ला ऐकतो का? 

तर 🐜मुंगी च्या पायात घुंगरू बांधले आणि अल्लाची प्रार्थना केली तरी त्याला तो आवाज जातो


दिन भर रोजा रखता है

 रात की हानत है गाय

 ये तो खुन की बंदगी 

कैसे खुशी खुदाय


म्हणजे दिवसभर काही खायचं नाही अगदी पाणीसुद्धा प्यायचं नाही स्वतःचा जीव मारायचा आणि रात्री मात्र गाई सारख्या गरीब पशूला मारून खायचं

आणि नाव मात्र अल्लाच्या घ्यायचं तर, असं 💉रक्त, गरिब प्राण्याचे रक्त वाहिलेलं असताना, अल्ला ला तरी खुशी होत असेल का? 

असा प्रश्न ते लोकांना विचारतात


संंत कबीर हे पूर्ण परमात्मा आहेत. ते अविनाशी असून त्यांना जन्म मृत्यू नाही. ते चारी युगात या ब्रम्हांडात येवून लिला करून सदेह येतात व सदेह सतलोकात जातात. संत ज्ञानेश्वर महाराज यानी देखिल संत कबीर हेच पूर्ण परमात्मा असल्याची ग्वाही दिली आहे. संत नामदेव महाराज याना संत कबीर यानी नाम दिक्षा देवून त्याना मोक्ष प्रदान केला आहे असे कबीर सागर (संत धर्मदास लिखीत) मध्ये लिहीले आहे


संत कबीर यांनी तत्कालीन रूढींवर प्रहार केले. निर्भीडता हे त्यांच्या ओव्यांचे मुख्य वैशिष्ट्य.

तत्कालीन समाजाचे अवगुण त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. या माध्यमातूनच त्यांनी समाजाला थोतांड आणि अवडंबरातून सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओव्या (दोहे) आजही आपल्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.


कबीर आप ठगाइये और न ठगिये कोय।

आप ठग्या सुख उपजै और ठग्या दु:ख होय।।

चोरी, लबाडीपासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की, दुस-याला लुटण्यापेक्षा स्वत: लुटले गेलेले बरे. कारण दुस-याला लुटले तर नक्कीच त्याचे रूपांतर दु:खात होणार।    


संत कबीर दोहे


सिंहों के लेहड नाही, हंसों की नहीं पाँत।

लालों की नहीं बोरियां, साध न चलै जमात।।


ते सांगतात, सिंह जंगलात एकटाच असतो. सिंहांचे कळप नसतात. तसेच हंसाचे थवे नसतात आणि रत्नांची पोती नसतात. याच प्रकारे संतसुद्धा जाती-जमाती घेऊन चालत नाही. तो एकटाच जगकल्याणासाठी झटत असतो.


कबीर घास नींदिये, जो पाऊँ तलि होइ।

उडि पडै जब आँख में, बरी दुहेली होइ।।


कबीर या दोह्यात म्हणतात, कुणालाही छोटे लेखू नये। पायाखालचे गवतही जेव्हा डोळ्यात पडते तेव्हा खूप त्रास होतो।


साई इतना दीजिये, जामै कुुटुंब समाय।

मैं भी भूखा ना रहूं, साधु न भूखा जाय।।

या ओवीत कबीर थोड्यामध्ये सुखी राहण्याचा उपदेश देतातत. हे ईश्वरा मला इतकेच दे की ज्याने माझ्या कुटुंबाला पुरेसे असेल आणि कधी कुणी पाहुणा घरात आला तर त्याचे अगत्य करता यावे.


हीरा तहां न खोलिये, जहँ खोटी है हाटि।

कसकरि बांधो गठरी, उठि करि चलै बाटि।।


या दोह्यात योग्य जागेवर ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा संदेश त्यांनी दिला आहे. ज्ञान हे हि-यासारखे असते. जिथे प्रामाणिक लोक नसतील तिथे हि-याची थैली उघडूच नये. उलट तिला आणखी घट्ट बांधून लवकरच त्या जागेवरून चालते व्हावे.


सब काहू का लीजिए, सांचा सबद निहार।

पच्छपात ना कीजिये, या कहे कबीर विचार।।


सत्याची महती या दोह्यातून कबीर सांगतात, सत्य कुठेही मिळाले तर ते निसंकोच भावाने ग्रहण करा. सत्याचा स्वीकार करताना भेदाभेदाचा विचार मनात येऊ देऊ नका. विचार करायची गरज नाही. अत्यंत विचारपूर्वक हा संदेश त्यांनी दिला आहे.


संत कबीरांचा मृत्यू

त्यांचा मृत्यू इ.स. १५९८ साली झाला असे मानले जाते. मगहर मध्येच मुस्लिम प्रथेनुसार त्यांचे दफन झाले असावे.


Rate this content
Log in