काल्पनिक पत्र...
काल्पनिक पत्र...
मा. सावित्रीबाई फुले यांना....
शि.सा.स.न.
उद्या तुमची जयंती. या निमित्त आपल्या स्मरणार्थ लिहावे असे मनापासून वाटले. मी पामर काय लिहिणार आपल्या कार्यावर. आपले कार्य उत्तुंग शिखरावर पोहोचलेले आहे. आपल्याला मानाचा मुजरा करते. सावित्रीबाई आपण म. फुलेंच्या भार्या. त्यांनी आपल्याला शिकवले व मुलींना शिक्षण द्यायचे हे आपण ठरवले.
पूर्वी मुलींना शिक्षण देण्याच्या विरोधात सर्व समाज होता. पण आपण सर्वांची मते झुगारून, स्वतः हाल सोसून, खूप कष्टात मुलींना शिकवण्याचा वसा घेतला व तो आपण पूर्ण केला. आपल्याला म. फुलेंची साथ उत्तम होती. आपण दोघांनी मिळून समाजातील स्त्री शिक्षणाचा जो लढा दिला तो खरंच खूप उच्च होता. आज आपल्यामुळे मुलींना समाजात एक स्थान निर्माण झाले आहे. स्त्रीला समाजात मान मिळत आहे. स्त्री उच्च शिक्षण घेवून उच्चपदावर कार्यरत आहे.
नमन तुम्हांला सावित्री...
तुम्ही हा लढा हाल सोसत यशस्वीरित्या लढलात. त्यामुळे आज स्त्री शिक्षण घेवू शकते. आपले खूप खूप आभार आहेत या समस्त स्त्री जातीवर. उद्या आपल्या जयंतीनिमित्त शाळेत आपल्या प्रतिमेचे पूजन होईल. आपले कार्य मुलांना सामजावून दिले जाईल. आपल्याला वंदनीय सलाम केले जातील.
परत एकदा मी आपल्यासमोर नतमस्तक होते आणि आता थांबते.