ज्येष्ठ नागरिक.
ज्येष्ठ नागरिक.


असावा घरात ज्येष्ठ नागरिक...प्रत्येक घरात त्यांंना मान मिळावा.आज आपण जे आहोत त्यांच्यामुळे आहोत. हे कधीही विसरून चालणार नाही.
पण आपल्या अवतीभवती त्यांचा सांभाळ न करणारे त्यांचीच मुले आपल्याला पाहायला मिळतात.आणि मन दुखावते.
बर्याच मुलांना याज्येष्ठ नागरिकांचा पैसा हवा.पणते नकोत. मुलांना सांभाळायला ते हवेत पण त्यांना काही दुखले खुपले तर चिडचिड करताथ त्यांचीच ही मुले.
काही उच्च स्तरातील घरात तर वृद्धाश्रमात ठेवतात ज्येष्ठ नागरिकांना.काहींची मुले उच्चशिक्षण घेवून परदेशी उत्तमपगार, छान बायको, मस्त घर करून राहतात. भारतातत्यांचे आई बाबा डोळ्यात प्राण आणून सदैव त्यांची वाट पाहतात. पण ही मुले आपल्या आई बाबांना भेटायलाही साधे येत नाहीत.असतात अनेक अडचणी काय करणार?
इथे ज्येष्ठ नागरिकाची मनाची उलघाल होते. पिळवणूक होते. आपलीच मुले आपणच उच्च शिक्षण दिले. आता बोलणार काय? अशी अवस्था होते या ज्येष्ठ नागरिकांची.
पण या नागरिकांना...वडीलधार्या माणसांना,आई बाबा सासू सासरे या सर्वांना आपण जर छान सांभाळले तरखरेच त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळतात.
काय लागते हो त्यांना?दोन वेळचे नीटचे जेवण ,नाष्टा..गला कपडा लत्ता.राहायला थोडी जागा.जी त्यांचीच असते.
एवढे केले तर होणारे फायदे किती आहेत...
१)घराला कधीही कुलूप लावावेलागत नाही.
२)आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळतात.
३)मुले आजी आजोंबाकडे हवा तो हट्ट करु शकतात.
४)आजी आजोबा त्यांच्याशी खेळतात.
५)नात्याची वीण घट्ट होते.
६)पुढे आपली मुलेही आपल्याला छान सांभाळतात.पेरावे तसे उगवते ...
असेअनेक फायदेआहेत.
तर सर्वांना एकच कळकळीची विनंती आपले आई बाबा सासू सासरे..वडीलधारी माणसे यांना कधीही अंतर देवू नका.