Vilas Yadavrao kaklij

Children Stories Crime Thriller

2  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Crime Thriller

"जनी"

"जनी"

7 mins
76


(क्रमश:भाग 4)

जनी रोज कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहाने जात असे तिच्या मध्ये होत जाणारा बदल, बाह्य बदल व आंतरिक बदल हे दोन्ही निसर्ग प्रमाणे होते. हळूहळू जनी ची राजेश शी मैत्री इतकी घट्ट झाली होती कि एकमेकांशिवाय ते कॉलेजला जाऊ शकत नव्हते. रोज अगदी बस स्टॉप वर राजेश आधीच पाच मिनिटं जाण्याची वाट बघू लागला व एकाच बसणे कॉलेजला जाऊ लागले. मधल्या वेळामध्ये गार्डन मध्ये जाऊन गप्पा मारणे. सुट्टीच्या दिवशी ट्रिप चे प्लॅन मनात येत असत. मात्र राजेश स्पष्टपणे जनीला सांगण्याची हिम्मत होत नव्हती आणि ती ही बोलू शकत नव्हती.मात्र इकडे तीची दुश्मन म्हणजे 'मोना' तिने तिच्या कॉलेजच्या बाहेर असणारे दोन मित्र एक विकी आणि दुसरा गण्या दोन्ही मोना ने सांगितल्याप्रमाणे हळूहळू राजेश शी मैत्री केली रोज दुकानावर बोलून गप्पा मारणे . राजेश ची ओळख केली . जाताना-येताना राजेशला चहा पिण्यासाठी बोलणे राजेश ही नकळतपणे नवीन मित्र भेटल्यामुळे व त्याच्या स्वभावामुळे त्यांच्याशी त्याची मैत्री जुळली.मात्र राजेश त्यांच्याशी शुद्ध मनाने मैत्री चे संबंध ठेवत होता. मात्र विकी आणि गण्या यांचा हेतू वेगळा होता? याची कल्पना राजेशला आलेली नव्हती. हळूहळू एक दोन आठवडे झाले राजेश लाही करमत नव्हते सुट्टीच्या दिवशी राजेश त्यांच्या दुकानावर येऊन बसत. हळूहळू त्याच्या ओळखीच्या मैत्रिणींची सर्व माहिती विकी काढत असे उद्देश हाच जनी पर्यंत पोहोचण्याचा होता व त्याला राजेश माध्यम ठरणार होता. कारण राजेश हा जनी चा जिवलग मित्र झाला होता व त्याच्या मार्फत मोना स्वतःच्या प्लॅन आखत होती. हळु हळु मैत्री घट्ट झाल्यानंतर एक दिवस मात्र विकी आणि गण्याने राजेशला ट्रीप म्हणून एका प्रेक्षणीय स्थळी जाणे विषयी विचारले? राजेशला ही ट्रिप ची आवड असल्याने बरोबर तुझे कोणी मित्र येणार असतील तर त्यांनाही घे! विकी ने गण्याने मित्रांचे आणि मैत्रिणीची नावे सांगितली. ती सर्व राजेश व जनीच्या कॉलेजमध्ये असल्यामुळे राजेश ला वाटले सर्व कॉलेजचीच मुले आहेत म्हणून आपणही जावं. त्याने एक दिवस प्लॅन आपल्या जनी ला सांगितला तिलाही मनात तेच हवं होतं. कारण या तारुण्याच्या जगात, तारुण्याच्या जगामध्ये आनंद, विहार, भटकंती निमित्त जणू तरुणांना एक संधीच असते! त्याप्रमाणे तीने होकार दिला व बरोबर तिच्या मैत्रिणींना घेण्याचे ठरवले. मात्र तीने एक अट घातली, सायंकाळी दहा वाजेपर्यंत हॉस्टेलमध्ये येण आवश्यक आहे. अन्यथा हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही.या अटीवर जनी तयार झाली. बरोबर तिच्या होस्टेलच्या दोन-तीन मैत्रिणींनाही तयार केलं. सलग सुट्टी असल्यामुळे पांडे बाईंची चर्चा करून त्यांची परवानगी घेतली व ट्रिप ला जाण्याचे ठरवले.

दिवसभर एन्जॉय केल्यानंतर सांयकाळी सात आठ वाजले असतील. तेव्हा मात्र सर्व मित्रांनी जेवणाचा प्रोग्राम ठेवलेला होता.त्यामुळे सर्व भोजनासाठी एकत्र जमले आणि नऊ ते दहा वाजे नंतर तिथून निघू असं नियोजन त्याप्रमाणे हळूहळू सगळ्यांनी मनसोक्त आंनद उपभोगला. पण इथे सोनाने केलेला प्लॅन,याची कल्पना कोणालाही नव्हती. हॉटेलमध्ये मी आणि काही मित्र आज मुक्कामी राहणार आहे, मला काय हॉस्टेलमध्ये जाण्याचे बंधन नसल्यामुळे आज काही मित्र व मी येथे हॉटेलला मुक्कामी थांबणार असे तिने मैत्रिणी नां सांगितले मात्र मैत्रिणी मध्ये जेनी ला विरोध न दाखवता तिने झाल्या गोष्टी विसरून मैत्री करावी अशी अपेक्षा ठेवून दिवसभर तिने गप्पांच्या मध्ये जनी 'शी हातमिळवणी केली होती. जनी च्या मनात कोणत्याही प्रकारचे पाप नसल्याकारणाने तीने मोनाशी मैत्री केली. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मोनाने जेनीला ठरल्याप्रमाणे रूम दाखवण्यासाठी रूम मध्ये नेले व तेथे सॉफ्ट ड्रिंक म्हणून लस्सी, आईस्क्रीम आणि सरबत ठेवलेले होते. मोनाने ग्लासमध्ये नकळतपणे विशिष्ट प्रकारची पावडर टाकली होती.ती पिल्यानंतर दोन ते तीन मिनिटात पिणारी व्यक्ती बेशुद्ध होते! असा प्लॅन केला होता. मात्र रूम मध्ये गेल्यानंतरच जनी ला संशय आला. कारण ती मोनाला होस्टेल जीवना पासून ओळखत होती. त्यामुळे तिने सावध पवित्रा घेतला व तिचा आग्रह बघून संशय आला. दोघी गप्पा मारत बसल्या मोना ने इकडे सरबताचा ग्लास सरकवला तीचा आग्रह बघुन ग्लासमध्ये काही तरी असले पाहिजे. जनी ने नकळतपणे खाली पडली त्या बरोबर मोबाईल खाली पडला आणि शोधण्याच निमित्त करून मोना म्हणाली थांब!थांब! मी देते. असं म्हणून मोना ने तो मोबाईल उचलण्यासाठी खाली वाकली त्याच क्षणी जेनीने ग्लासची अदलाबदल केली आणि गप्पा मारत बसल्या.

जनी ने मोनाला रूम बाहेर किंवा बाहेर घालवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र मोना समोरून उठत नव्हती त्यावरून जनीला मोनाचा प्लॅन नक्कीच संशयास्पद वाटू लागला. जनी सरबत नको मला असं म्हटले मात्र जनीला खूप आग्रह करायला लावला व दोघींनी सरबतचे ग्लास रिकामे केले. पण क्षणात झालेला बदल, मोनाला याची पुसटशी कल्पना आली नव्हती.की आपण समोर असताना व क्षणभरही बाजूला न झाल्यामुळे तिला कल्पना नव्हती की ग्लासमध्ये अदलाबदल झाली! आहे तिने काही क्षणात तो ग्लास रिता केला. त्याप्रमाणे, जनी ने ही तिच्यासमोर रिता केला. दुसऱ्यासाठी वाईट केला असता स्वतःलाच उपभोगावे लागते. याचा प्रत्यय तिला आला काही क्षणात येईल. मोना 'ला गुंगी येऊ लागली जनी ने मोनाला कॉटर नेले आणि पाच ते दहा मिनिटांमध्ये तीची शुद्ध हरपली त्या क्षणाला जेनीने रूमच्या बाहेर धूम ठोकली. तोपर्यंत इकडे मोनाच्या प्लॅननुसार गाडी आणि तिचे सर्व मित्र पसार झाले होते. पण राजेश मात्र दूर गेटवर वाट बघत होता.तीने राजेश ला गाठले. तेव्हा राजेश ने सांगितले ड्रायव्हर रिपेरींग साठी गेलेला आहे मी तुझ्यासाठी थांबलो. आपल्याला पुढील नाक्यावर थांबायला सांगितले आहे त्या पद्धतीने ते नाक्या पर्यंत गेले मात्र मोनाच्या प्लॅननुसार सर्व मित्र सोडून निघून गेले होते. मोनाने सांगितल्याप्रमाणे दोन अनोळखी गुंड यांना सुपारी देऊन जनी 'ची इज्जत लुटण्यासाठी तीने रूम बुक केली होती. त्यात मॅनेजर, वेटर या साऱ्यांना त्या प्लॅन मध्ये सामील केले होते. पण ती स्वतःच अडकली हे तिलाही कळले नाही. जनी घरी पोहोचली जनी ला याची कल्पना नव्हती. बरोबर दहा पर्यंत होस्टेलमध्ये पोहोचली.जेनीला सोडून राजेशही त्याच्या घरी पोहोचला.

इकडे मोना ने ठरल्याप्रमाणे सुपारी दिलेले गुंड त्या हॉटेलमध्ये मध्ये आले येताना असा प्लान ठरला होता की हॉटेल ची लाईट काही क्षण गेली त्या अंधाराचा फायदा घेऊन ते त्या रूम पर्यंत पोहोचले. काही गुंड दूर अंतरावर बसले होते. त्यांना कोणतीही कल्पना नव्हती की मोना कोण? त्यांनी ठरल्याप्रमाणे जनी ऐवजी "मोना'' ची च इज्जत लुटली. मनसोक्त रात्रीपर्यंत आळीपाळीने मोना वर त्यांनी बलात्कार केला. मोनाचे मात्र बेशुद्धावस्थेत मध्ये असल्यामुळे तिची इतकी दयनीय अवस्था झाली. मध्यरात्री २ वाजेनंतर सदरहू गुंड परत लाईट बंद करून ते अंधारामध्ये पसार झाले. दुसऱ्या दिवशी मात्र त्या मुलांसाठी त्या दोन मित्रांची मदत घेतली त्यांना सकाळपर्यंत मोनाचा फोन बंद येत होता. कारण तो स्विच ऑफ होता. तो जातांना जनी ने केल्यामुळे. त्याचे लोकेशन सुद्धा ट्रॅक होत नव्हते व मोना कोठे आहे हे विकी आणि गण्याला कळाले नाही त्यामुळे रात्रभर त्यांना वाट बघावी लागली. सकाळी मात्र मोना राहत असलेल्या महिला आश्रमामध्ये चौकशी केली तेव्हा तेथे हि नव्हती तेव्हा विकी आणि गण्याने हॉटेल वर चौकशी केली त्या रूमवर मोना आणि एका दुसऱ्या नावाने कपल साठी रूम बुक केलेली रेकॉर्ड नुसार होती. त्यानीं रूममध्ये बघितले मोनाची अवस्था, कपडे फाटलेले, फक्त डोळे उघडून बघत होती. शरीराने हालचाल ही करता येत नव्हती. हॉटेलमध्ये त्यांनी दृश्य बघितल्यानंतर मात्र त्यांचा प्लेन त्याचेंवर उलटला होता. त्यांनी मोनाला ऍडमिट केले हॉस्पिटलमध्ये दोन चार दिवस थांबावं लागेल डॉक्टरांनी सांगितले तिला झालेल्या आंतरिक आणि बाह्य जखमा इतक्या खोलवर होत्या ती आठवडाभर स्वतःच्या पायाने चालू शकणार नव्हती तिकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सुट्टी असल्यामुळे जनी ने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही तिसर्‍या दिवशी मात्र जेव्हा कॉलेजला गेल्यानंतर राजेश बस स्टॉपवर उभा होता त्याच्या मित्रांन मार्फत कळाले हि घटना कशी झाली.

गण्या व विकी हे सुद्धा आपल्याला काही गोष्टी माहित नसल्या प्रमाणे वागत होते. त्यांनी राजेश ला सांगितलं की आपण आल्यानंतर हॉटेलमध्ये मोना तिच्या त्या मित्राबरोबर हॉटेलमध्ये थांबली होती मात्र तो मित्र तिला दगा देऊन पसार झाला. तेव्हा राजेशने सांगितलं की आपण पोलिसात जाऊन तक्रार देऊ. मात्र तेव्हा गण्या आणि विकी यांची भांबेरी उडाली नको नको म्हणत हे प्रकरण वाढेल म्हणून मिटवले.जेंव्हा जनी ला सगळा वृत्तांत कळला हॉस्पिटलचे नाव कळलं तेव्हा जनीने सर्व मैत्रिणींना घेऊन हॉस्पिटलमध्ये मोनाला बघण्यासाठी गेली. तेव्हा मात्र मोना चा चेहरा बघण्यासारखा होता. आता मला कळाले की तू हॉटेलमध्ये किरण आणि मोना या कपल च्या नावाने रूम बुक केली होती व तो धोका देवून पसार झाल्याचे कळाले. आपण त्यावर कारवाई करू किंवा पोलीस कम्प्लीट करू. जेनीने मोबाईल काढला मात्र मोनाला ते नको होते.कारण, ती स्वतःच त्यात अडकणार होती. त्यामुळे तिने नको नको म्हटले. मी त्याचा बदला घेईल व शांत झाली. मात्र मनामध्ये सहज बोलताना मोनाला टोमणा मारला "असे बरेच मुलं किंवा मुली असतात इतरांना फसवतात. "दुसऱ्यांसाठी खड्डा खोदला कि ते स्वतः खड्ड्यांमध्ये पडतात व त्यांचे स्वतःचे हात पाय मोडून घेतात. तुला फसवून जाणारा ही स्वतःच खडय़ात पडेल म्हणून परत विचारले कोण होता तो? तेव्हा मोना हळू आवाजात म्हणाली, किरण! त्याने तुला फसवलं त्याप्रमाणे तोही असाच फसेल व खड्ड्यात पडेल! असे जेव्हा जेनीने उद्गार काढले! तेव्हा मात्र मोनाचा चेहरा बघण्यासारखा होता. आम्ही निघतो. काळजी घे! परत असं होऊ नको असं वाग. म्हणून जनी आणि तिच्या मैत्रिणी निघाल्या. एखाद्या जखमी वाघीणी प्रमाणे अजूनच मोना जखमी वाघीण मोना खूप चवताळली तिला वाटले यावेळेस सुटली.मात्र पुढच्या वेळेस वाट लावल्याशिवाय राहणार नाही. असे मनोमन म्हणत हॉस्पिटल मध्येच ती वेगवेगळे प्लॅन करू लागली. मात्र इकडे जनी ची प्रेम कहानी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती.


क्रमश:


Rate this content
Log in