जनी - भाग ६
जनी - भाग ६
नेहमीप्रमाणे राजेश नोकरीसाठी प्रयत्न करू लागला . राजेशच्या बहिणीचे लग्न ठरले होते व दोन महिन्यानंतर हा कार्यक्रम आयोजित केलेला होता . त्यामुळे राजेश च्या वडिलांचे त्याचे सर्व मित्र , मैत्रिणी नां बोलावले होते . राजेश ने लग्न करण्यासाठी व चांगल्या जागेवर जॉब करावा ! स्वतःच्या पायावर उभे राहून आपला वडिलांचा व्यवसाय वाढावा या उद्देशाने राजेश ने सुरुवात केली होती . तिकडे जनी ची परीक्षा तीन महिन्यांवर आली होती . परीक्षा संपल्यानंतर होस्टेल सोडावे लागणार होते . त्यामुळे तीन महिन्यात जनीला निर्णय घ्यावा लागणार असल्यामुळे एक दिवस जनी ने राजेश ला हॉटेलमध्ये बोलावले गप्पा मध्ये हकीकत सांगितली तीन महिन्याच्या नंतर मला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते . तूही जीवापाड प्रेम करतो .तेव्हा तिने राजेश ला विचारले माझेशी लग्न करशील का ? त्याने दिलेले प्रपोजल स्वीकारले होते . मात्र ? ... आई-वडिलांच्या , समाजाच्या दृष्टीने स्पष्टपणे सांगता येत नव्हत . कारण राजेश चांगल्या सुसंस्कृत अशा कुटुंबात वाढलेला . त्यातून जनी हि निराश्रित .आश्रमात वाढलेली मुलगी . ! वडिलांना चालेल किंवा नाही ?याचे दडपण . नंतर कळवतो असे सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागला . मात्र दोघांना एकमेकांशिवाय करमत नव्हते . एकमेकांविषयी स्वतंत्रपणे राहू शकणार नाही . अशी त्याच्या मनाची अवस्था झाली होती .रात्री गुड नाईट केल्याशिवाय झोप येत नव्हती .सकाळी उठल्यानंतर त्यांचे गुड मॉर्निगं केल्याशिवाय दिवस सुरू होत नव्हता . घरामध्ये राजेश च्या बहिणीचा साखरपुडाचा कार्यक्रम होता .आणि सर्व मित्र आणि मैत्रिणींना कार्यक्रमासाठी बोलावले होते . तेव्हा त्याने सर्व मित्र ,मैत्रिणी सर्वांची ओळख करून दिली . आईवडिलांची त्याचा इतर मित्रांची कॉलेज जीवनामध्ये असणाऱ्या मैत्रिणी म्हणून ! राजेश ची आई सहज बोलून गेली होती . अरे राजेश यावर्षी यांचेतून एखादी मैत्रीण जीवनसाथी म्हणून शोधावी लागेल ! तेव्हा काही मित्रांणा राजेश चे व जनी यांचे ! सर्व प्रकारचे नाते मैत्रि! यांच्याविषयी कल्पना असल्यामुळे एक मित्र राजेश च्या आईला बोलला काकू जर एखादी मैत्रिण राजेशने सिलेक्ट केली तर ? .. तुम्ही द्याल परवानगी ? ...राजेश ची आई का नाही ? राजेशची पसंत हीच आमची पसंत असेल ! तेंव्हा राजेश चा मित्र म्हणाला .पण ? काका परवानगी देतील का ...कारण त्यांना अरेंज -मॅरेज पद्धतीने व खानदानी अशी मुलगी सून म्हणून हवी असेल तर !अरे त्यांची निवड तीच आमची दोघांची पसंत असेल ! त्यामुळे अडचण उद्भवणार नाही . तेव्हा मात्र राजेश चा मित्र त्याच्या आईला दुसऱ्या रूम मध्ये घेऊन गेला . त्याने लांबून दिसणार्या चार मैत्रिणी पैकी एक मैत्रिणी राजेची ... ! पंसत ! असून तिच्याशी प्रेम करतो आहे . काकूंना सांगितले या चार पैकी राजेश निवड कोणती ? असेल ! चारी मैत्रिणींपैकी जनी ही रुबाबदार व्यक्तिमत्व , गोरी आणि उंचपुरी असल्यामुळे आईने सांगितले ... ती उंच मुलगी जर असेल तर लग्न लावून देण्यात काहीच हरकत नाही . तेव्हा मात्र राजेश चा मित्र इतका जोरात . आनंदाने ओरडत धावत पळत रूमच्या बाहेर पळाला .... तेंव्हा सर्व त्याकडे टकामका बघत होती त्या आनंदात तो रूम मधून बाहेर पडला होता . कि जणू एखादे युद्ध जिंकले होते . त्याने लागलीच राजेशला बाहेर बोलावले व सांगितले . आता मात्र राजेशचे मन आतून उफाळून आले त्यालाही खूप आनंद झाला .त्याला वाटले की आता फक्त वडिलांची परवानगी बाकी आहे .कार्यक्रमा मध्ये राजेशचे सर्व नातेवाईक मंडळींना मूलगी आवडली होती .आईने सर्वानां लांबून दाखवले होते . मात्र फॅमिली बॅकग्राऊंड विषयी काही कल्पना नव्हती ! ...त्यामुळे सर्व काही फक्त दिसण्यावर ... ! साखरपुड्याचा कार्यक्रम संपल्यानंतर एक आठवड्याने राजेश च्या आईने राजेशला खोदून खोदून विचारले मला तुझ्या मैत्रिणी मध्ये एक मुलगी आवडली आहे . आईने बघितलेली ती मुलगी जनी ' च आहे हे ठाऊक असल्यामुळे त्याने आढेवेढे न घेता सांगितले तूझी पंसत हि डोळे झाकून मी लग्नाला तयार होईन ! त्यामुळे राजेश आईला वाटले आपला राजेश आपल्या शब्दाबाहेर नाही .गोष्ट त्याच्या वडिलांना सांगावी . आईने वाडिलांन सांगितल्या वर ते म्हणाले .बरं नंतर बघू . त्याच्या आनंदामध्ये आपण सामील होण्यास काही हरकत नाही असं म्हणून काही दिवसानंतर राजेशच्या वडिलांनी संबंधित मुलीच्या विषयी विचारले ! .... मला पत्ता दे मी तपास करून ठेवेल . तेव्हा मात्र राजेश मनातून घाबरला होता . कारण तिचा पत्ता म्हणजे होस्टेल ! ... नातेवाईक म्हणजे फक्त एक पांडे मॅडम !व तिची दुश्मन असणारी मैत्रीण " मोना "यापेक्षा कोणीही नातेवाईक नाही . मला एवढीच माहिती होती . राजेश ने सांगितल मी पत्ता घेतलेला नाही .तुम्हाला नंतर देतो असं म्हणून त्याने वेळ मारून नेली .. तिकडे मोना ने ठरल्याप्रमाणे निवडलेल्या मुलाशी लग्न करण्याचे ठरवले . त्याची पहिली मुलगी व मोनाच्या पोटामध्ये असणारे दुसरे अपत्त्य !(..स्वतःचे भोग . ) प्रेमासाठी व भविष्यासाठी लग्न केले होते मात्र आता दोघाना मनोमनी वाटत होते . दोन महिन्यानंतर नियमाप्रमाणे लग्न झाले यांच्या जवळ राहायला गेली .तेव्हा ती सहा ते सात महिने ची प्रेग्नेंट होती . त्यामूळ करण विचार करू लागला . या बाळाचे संगोपन , पूर्वी असलेली मुलगी , आपल्याला भविष्यात स्वतःसाठी जीवन जगता येईल का ? आणि दुसऱ्यांच्या अपत्याची वाढ करण्यामध्ये आपल पूर्ण आयुष्य मार्गी लागेल . मोनाला आपत्य आश्रमात देवू या ! असे करण म्हटला तेव्हा मात्र मोना च्या पाया खालची जमीन सरकली ! तिने सांगितले तू या अपत्याचा स्वीकार करण्याची अटीवर मी तुझ्याशी लग्न केल आहे . त्याच्या मना फक्त एकच ! स्वतःसाठी जीवन जगता येईल का ? मनात तो चिडचिड करू लागला I . तीला टाळू लागला . एक दिवस अचानक रात्री मोनाचे पोटदुखु लागल तीला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले .घरी पहिल्या पत्नी ची मुलगी ! ... मोना ने एका मुलीला जन्म दिला .तेव्हा मात्र करण नाराज झाला . दोघांच्या मुली ! ..यांचा सांभाळ करणे .एवढेच का ? जीवन .. मनात त्याला सतत वाटत होते .आपल्याला स्वतःचा मुलगा असावा . दोघांचा .! मुलगी झाल्यानंतर तो चिडचिड करू लागला ...व दुसऱ्याच अपत्य असल्यामुळे त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हता . मोनाला आपल्या जीवनाची व कायम तिरस्कार याने केला तर ! .. यापेक्षा लहान बाळ असतांनाच तिला होस्टेलमध्ये दिले तर ? पैसे दिले तर . होस्टेलमध्ये वीस वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने ती या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती त्याच पद्धतिने स्वतःची मुलगी तीने एका अंधार्या रात्री होस्टेल मध्ये टाकून आली होती .... तीला आपण टाकले याविषयी कोणताही पुरावा किंवा कोणालाही कळू नये अशी तिने खबरदारी घेतली होती .सर्व मित्र आणि मैत्रीनींना सांगितले की आजारी असल्याकारणाने आजारपणामुळे अपत्य मृत झाल .. सर्वाना सांगितल . करण च्या मनाप्रमाणे सर्व झाल म्हणून तो अधिक प्रेमाने वागवू लागला . संसार सुरू झाला . पण हिच्या मनात मैत्रीणीचा काटा काढण्यासाठी तीने तिचे पूर्वीचे होस्टेलच्या बाहेर असणारे मित्रांच्या मदततीने जनी वर बलात्काराच स्वप्न तीच्या स्वतः वरच उलटलेल होत . तसा तिने आज दुसरा प्लॅन करण्या साठी आणि त्याची अंमलबजावणी साठी सकाळी सकाळी बाहेर पडली होती ... कुठे....... ?..
(क्रमश:)
