Vilas Yadavrao kaklij

Children Stories Romance Tragedy

2  

Vilas Yadavrao kaklij

Children Stories Romance Tragedy

जनी(भाग-४)

जनी(भाग-४)

6 mins
82


भाग-३(क्रमश:)


जनी आज दहावीची परीक्षा देऊन बाहेर आली होती.जेनीच साधारण वय सोळा वर्षे लागलं होतं. 16 वर्ष धोक्याचं याप्रमाणे पांडे बाईने जनी ला अनेक प्रकारच्या कान गोष्टी व समाजामध्ये असणारे धोके, सावध राहण्याविषयी अनेक गोष्टी तिच्या कानी सांगितल्या होत्या. ती सावध पवित्रा घेऊन वागत होती. जनी ज्या होस्टेलमध्ये राहत होती तेथे फक्त पहिली ते दहावी पर्यंत असणारी माध्यमिक शाळा असल्याकारणाने दहावी नंतर तीला होस्टेलच्या बाहेर कॉलेजला ऍडमिशन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. होस्टेलमध्ये फक्त बारावी पर्यंत विद्यार्थिनींचा सांभाळ केला जात. वय वर्ष 18 नतंर विद्यार्थिनींना होस्टेल च्या मदतीने किंवा काही सामाजिक संघटनेच्या मदतीने स्वतः स्वावलंबी बनण्यासाठी सहाय्य केले जात, त्यानंतर मात्र हॉस्टेलमध्ये राहता येत नव्हते.पांडे बाईने जनी ला सांगितले कि तुझ्याकडे फक्त दोन वर्ष आहेत त्यानंतर तुला आमच्या होस्टेलमध्ये राहता येणार नाही! तो पर्यंत तुला स्वतःच्या पाया वर तू कशी उभी राहशील या पद्धतीने शिक्षणाकडे लक्ष दे? व काहीतरी व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर कशी उभी राहशील याकडे लक्ष दे! त्याप्रमाणे जनी कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी मैत्रिणी बरोबर एका नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पोहोचल्या! बंदिस्त जीवनामध्ये असलेल्या मुली जणू पिंजर्‍यातून प्रथमच बाहेर पडलेल्या पक्ष्यांप्रमाणे त्यांना मोकळं असं वाटत होतं. कारण? आज पर्यंत पंधरा वर्ष?आठवत नाही तेव्हा पासून होस्टेलच्या चार भिंतींमध्ये जीवन व्यतीत केलं असल्यामुळे कशा पद्धतीने? माणसे वागतात किंवा समाज कसा वागतो, हे आज तीने व तिच्या मैत्रिणी बाहेरच्या जगात पहिल्यांदाच प्रवेश केल्यासारखं त्यांना वाटत होते. जणू काही एखाद्या यात्रेमध्ये आपण आलो आहोत.असं होस्टेलच्या बाहेर त्यांना वाटत होते.

ती आणि तिच्या दोन,चार मैत्रिणी कॉलेजमध्ये पोहोचल्या! ऍडमिशन फॉर्म घेतले. ऍडमिशन घेण्यासाठी रांगेमध्ये ऑफिस पुढे मागेपुढे सर्व विद्यार्थी एकत्र! ना गणवेषाचा बंधन वा मुला-मुलींच एकत्र येण्याच बंधन नाही.त्यामुळे कोणाच्या खांद्यावर हात टाकून, कोणी कोणाच्याही बाईकवर? एकत्र! ग्रुप ने गप्पा मारताना. जेनी ला हे सारे चित्र पाहिल्यामुळे विचित्र वाटत होतं मात्र निसर्गत: वयात आलेल्या मुलींना किंवा मुलांना आकर्षण असते सहाजिकच प्रत्येकाची नजर हि समोरच्या व्यक्तीकडे. तारुण्य नवनवीन चेहरे! जणूकाही स्वर्गा मध्ये फिरत असल्याचा अनुभव. रांगेमध्ये उभे राहताना मुल-मुली सर्व एकत्र असल्यामुळे एकमेकांशी गप्पा मारणे,धक्के मारणे, मुद्दामून वेगळ्या प्रकारचे विषय काढणे. हे जनी ला सर्व विषय नवीन होते. कारण होस्टेल मध्ये, को-इज्युकेशन नसल्यामुळे फक्त मुलींमध्ये राहण्याची सवय असल्यामुळे व नेहमी बंधनात! आज प्रथमच जनी व तिच्या मैत्रिणी बाहेर मोकळ्या समाजामध्ये आल्या होत्या. ऍडमीशन घेत असताना च गर्दीमध्ये जनी ला एका मुलाने जोरात धक्का दिला?ती अतिशय संतापली असले हे वातावरण पूर्वी न पाहिल्यामुळे गोंधळी! त्याने बघितले मात्र समोरच्या मुलाने स्माईल करत सॉरी म्हटले तेव्हा मात्र जनी ची नजर झुकली. तिने प्रथमच गोरा गोमटा. धिप्पाड, असा मुलगा बघितला होता आणि त्याने सॉरी म्हटल्यामुळे तिचा सारा राग निवळला होता. ऍडमिशन घेतले आणि परत होस्टेलवर येण्यासाठी बसने प्रवास करावा लागत होता. बसने प्रवास करून होस्टेलवर पोहोचल्या! दुसऱ्या दिवशी बस ने कॉलेजला जाण्याची तयारी! सुरू केली.शालेय जीवनामध्ये जेनी कडे असणारे कपडे व शाळेचा गणवेश असल्यामुळे तीला इतर मूलींकडे आहेत तसले कपडे तिच्याकडे नव्हते! मात्र बाहेरच्या जगाचे निरीक्षण केल्या नंतर कॉलेजला आपल्यालाही असे विशिष्ट प्रकारचे कपडे घ्यावेत अशी मनोमन इच्छा होती. हॉस्टेल म्हणजे त्यांचे पालक.मर्यादित प्रकारची मदत व अर्थ सहाय्य देत होते त्यामुळे महागडे,भरभरीत, दिखाऊ कपडे घेण्याची परिस्थिती जेनी कडे नव्हती. मात्र कॉलेज वातावरणामध्ये जनी ने प्रवेश केल्यानंतर इतर मुलींचे कपडे बघून राग यायचा. काही कपडे बघून संताप व्हायचा. मात्र करणार काय? काही मुलींची कपडे फक्त स्वतःची छाती कशी दाखवता येईल? या पद्धतीने शिवलेले व विशिष्ट प्रकारची विडों ठेवलेली त्यातून सूडौल वक्ष दिसावेत अशी रचना! असत मुलींचे शॉटकट कपडे त्यामुळे जास्तीत जास्त शरीर उघडे दाखवता येईल या पद्धतीचे कपडे वापरत.मात्र पूर्वी मुलींना जास्तीत जास्त शरीर कसं झाकता येईल अशा पद्धतीने कपडे वापरले जात होते. मात्र ! इथे परिस्थिती वेगळी होती. मुली जास्तीत जास्त शरीर उघड कसं दाखवता येईल अशा पद्धतीने कपडे वापरतात विशेषतः हा त्यांच्या दृष्टीने मुलांचे पूर्ण अंगभर कपडे! दिसत होते. दुसऱ्या दिवशी योगायोगाने म्हणा ज्या मुलाने काल धक्का दिला होता. गेट समोर पाठमोरा जात होता. जनी तिच्या मैत्रिणीच्या गृप मध्ये वर्ग शोधण्यात गर्क असताना. मोठमोठ्या इमारती व प्रचंड गर्दी यामध्ये गोंधळल्या सारखं झालं आणि अचानक जोरात जनी चा धक्का मुलांच्या टोळक्यात असणाऱ्या एका मुलाला लागला! जेव्हा त्याने मागे बघितले. तेंव्हा मात्र जनी चा राग निवळा! कारण ज्याने काल जनी ला धक्का मारला होता त्यालाच आज जनी कडून धक्का लागला.आता जनी ला सॉरी म्हणण्या शिवाय पर्याय नव्हता. तीने सॉरी म्हटले, त्याने इट्स ओके! कोणत्या वर्गात ॲडमिशन घेतले? नवीन आहे वाटतं! हो! इलेव्हन सायन्स ला प्रवेश घेतला. ओके,मी पण याच कॉलेजमध्ये आहे. माझ नाव राजेश. आपले नाव? तिने हळु आवाजात सांगितलं जनी! नाव ऐकल्या नंतर त्याच्या चेहऱ्यावर हसू आले कारण त्याला हे नाव एखाद्या जुन्या वळणाचं वाटलं असाव! त्याच्या समजूती प्रमाणे वेगळं नाव असेल अशी समजूत झाली होती.

कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींचे नाव, पेहराव, आणि वागणं जर बघितले तर नक्कीच हसू येईल. बावळटपणा वाटेल. आजची तरुण पिढी वाहत चालली कि काय असे वाटेल.मात्र कॅपस मध्ये असणाऱ्या मुला-मुलींना आपण जणू स्वर्गात वावरत आहोत आणि आपण जे काही वागतो. पेहराव करतो. त्या गोष्टी जगामध्ये कोणी च केलेल्या नसतात व त्या आमच्या साठीच तयार केलेल्या असा अविर्भाव त्यांच्यामध्ये निर्माण होतो. जनी चा कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिल्यांदा ती वर्गांमध्ये लेक्चर अटेंड करत होती. समोरच लेक्चर त्यांना काही कळत नव्हते. कारण शालेय जीवनातली पद्धत आणि कॉलेज जीवनाच्या पद्धतीत बरीच तफावत होती. सुरुवातीचे काही दिवस फक्त बघणे आणि नोट्स लिहिणे याशिवाय तिने काही केले नाही. लेक्चर संपल्यानंतर दुपारी प्रॅक्टिकल साठी जावं लागत तेव्हा सकाळी 12 वी चे प्रॅक्टिकल नंतर 11 वी चा प्रॅक्टिकल असतात रोजच 12 वी चा प्रॅक्टिकल संपल्यानंतर 11 वी चा प्रॅक्टिकल साठी आमचा लायब्ररीमध्ये प्रवेश होता. तेव्हा रोजच येताना किंवा जाताना राजेश ची आणि तिची नजरानजर होत. एवढी धैर्यवान व डेरिंग. कराटे चे क्लास केलेली मुलगी.अन्याय झाला मुलींना कोणी विचारलं तर त्याचा तिथेच थोबाडीत देणारी, पण राजेश कडे पाहिल्यानंतर तिच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचे रोमांच निर्माण होत होते. जनी ची नजर राजेश कडे गेल्यानंतर एकमेकांचे नजरेने संभाषण सुरू होत होते. नजरेतूनच प्रेमाची सुरुवात कशी झाली हे त्यांनाही कळले नाही.त्यामुळे हळूहळू जनी मध्ये पेहरावा मध्ये बोलण्यामध्ये बदल होत होता कारण तारुण्यात आकर्षण आणि कॉलेज जीवनात वातावरण त्यामुळे साहाजिकच हळूहळू जनी ने ही प्रयत्न करू लागली. काही दिवसात हेअर स्टाईल मध्ये बदल केला जनीच आश्चर्य म्हणजे कॉलेजच्या इतर तरुण-तरुणींच्या दृष्टीने अतिशय मादक! स्वरूपाच भर-भरीत आणि आकर्षक!असण्या योग्य होतं.त्यामुळे अनेक नजरा तिच्याकडे येऊ लागल्या.कारण वर्गामध्ये तिची बोलण्याची पद्धत, चालण्याची व कोणालाही सहकार्य करण्याची पद्धत. त्यामुळे हळूहळू तिच्या मैत्रिणी वाढू लागल्या मुलांचीही ओळख करून घेणे यामुळे संकोच वाटत नव्हता मात्र जेव्हा समोर राजेश आला तेव्हा मात्र शरीरामध्ये रोमान्स, शहारे येत. जणू ते एकमेकांसाठी बनले की काय अशा पद्धतीने फिलिंग. दोघांच्या मनामध्ये निर्माण होत. हळूहळू नजरेची भाषा मैत्रीमध्ये रूपांतरित होण्यास सुरुवात झाली.एका मधल्या सुट्टीच्या वेळी जनी व तिच्या मैत्रिणींचा ग्रुप कॅन्टीगं कडे जात असताना सुधाकर रही कॅन्टीन मध्ये बसलेला होता.

जनी ला पाहिल्यानंतर चहा घेणार काय ?असे म्हणून सुधाकरने विचारले, सर्व तुमच्या ग्रुपला! तेथे एकमेकांच्या ओळखी झाल्या आणि अशा पद्धतीने रोजच्या रोज सुरू झाल्या भेटी. त्या नजरेची भाषा सहवासामुळे हळु-हळु मैत्री निर्माण झाली.हे दोघांनाही कळाले नाही.या पद्धतीने जनी च्या कॉलेज तुझ्या जीवनातला प्रवास सुरू झाला मात्र तिची प्रतिस्पर्धी मोना? तिच्या मध्ये एवढा बदल झाला की ती पैशासाठी कोणत्याही थराला व कोणत्याही प्रकारची कामे करत होती.तिच्या महिला आश्रम मध्ये कोणत्याही प्रकारची बंधन नव्हती. काही कमी प्रमाणात होती. त्यामुळे ती सहज बाहेर पैशांसाठी ती हळू हळू गर्ल चे काम करू लागली. त्यामुळे तिला प्रचंड पैसा मिळू लागला. एखाद्या हॉटेलमध्ये एक दीड तास जाऊन एखाद्या पुरुषाशी मैत्री करणे व चार पाच हजार रुपयांची कमाई करून देणे.तिच्या शरीराला ही सवय झाली होती. मात्र पैशांसाठी ती इतर महिलांनाही याच पद्धतीने पैसे कमवण्याचा सल्ला देऊ लागली तिच्या मनामध्ये एकच ध्यास जनी ची वाट लावेल! यासाठी ती तिचा प्लॅन कार्यरत झाला होता. तिने तिच्या एका कॉलेजमध्ये असलेल्या "विकी" नावाजलेली दोन मुलेही मोनाची मित्र होत त्यांच्याकडून कधीही पैसे घेत नव्हती व त्यांना आपली साथ देत होती व त्या बदल्यात! त्यांचे कडून काम करण्याची अट त्यांना घातली होती. जनी विषयी सर्व माहिती मिळून तीचे करियर बरबाद करणे हाच तिचा हेतू होता. तिच्या प्लनला तीने सुरुवात केली. म्हणजे?


क्रमश: (पुढील भाग-४ )



Rate this content
Log in