Anil Kulkarni

Others

2  

Anil Kulkarni

Others

जीवन पद्धती बदलू शकते, शिक्षण पद्धती का नाही.

जीवन पद्धती बदलू शकते, शिक्षण पद्धती का नाही.

5 mins
102


'Education is what remains after one has forgotten what one has learned in schoo'l Albert Einstein. आता या विधाना नुसारपूर्वी शिकलेल्या अनुभवाच्या शिदोरीवरच नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून घ्याव्या लागतील.शाळेत शिकून व विसरल्यानंतर जो शैक्षणिक अनुभव त्यांना मिळाला असेल त्याच्यावरच त्यांची शैक्षणिक अनुभती ठरणार आहे. जीवन शैली बदलू शकते तर शिक्षण शैली का नाही?शिक्षणाचे संदर्भ इतके बदलले आहेत की विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभव पुस्तकांच्या बाहेरचेही शिकावे लागणार. करोना पूर्व शिक्षण व करोना उत्तर शिक्षण याचा वेगळा विचार करावा लागेल. कोरूना च्या काळात कळत नकळत मुलांनी अनौपचारिक शिक्षणाद्वारे अनेक चांगल्या गोष्टी, तंत्र कौशल्य, कला, छंद जोपासले. हा अभ्यासक्रमांचा भागंच समजला गेला पाहिजे. अनौपचारिकपणे जे कौशल्य, मूल्य मुले शिकतात त्याची नोंद व्हायलाच पाहिजे. सजग पालक home schooling मध्ये अभ्यास,छंद पुर्ण करून घेतातच.पालकांच उद्बोधन करून याची व्याप्ती वाढवावी. शिक्षा होऊ नये म्हणूनमुलांचा गृहपाठ करणारे हळवे पालक आहेतच की. आता ऑनलाईन मध्ये पालक जास्त सज्ज,सजग झाले आहेत.हे चित्र सार्वत्रिक झाल तर?खरंच मुले शिकली, तंत्रज्ञानाच्या जवळ गेली. काहीना त्यांच्या पालकांनी जबरदस्ती केली. काही शाळांनी त्यांचा वेळ रिकामा जाऊ दिला नाही. केवळ पाठ घेणारी, अभ्यासक्रम शिकविणारी औपचारीक पद्धत इथून पुढे आपल्याला सोडून द्यावी लागेल का? काही काळासाठी तरी. शैली आणि सवयी, पध्दती बदलाव्या लागतील.शिक्षण औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने राबवावे लागेल. की काय अशी परिस्थिती आपल्यासमोर आहे.अशी ही निरीक्षणे पाहायला हवीत जिथे काहीच एक घडले नाही,घडत नाही.


2005च्या शैक्षणिक आराखड्यानुसार शिक्षण ही वाटण्याचीभौतिक गोष्ट राहिली नाही. मुले अनुभवातून, कृतीतून, व्यक्त होण्यातून चर्चा करण्यातून प्रश्न विचारण्यातून, ऐकण्यातून,निरीक्षण करण्यानं शिकत असतात असे म्हणले आहे,आणि आताही शिकायला हवेत. काहीशा बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे, कामाचा अनुभव घेता येणे कौशल्य निववडे, कलाप्रकार याचे रसग्रहण करता येणे, सर्जनशीलता वाढवणे ही शिक्षणाची मूलभूत उद्दिष्टे आहेत. ही ध्येय साध्य होतील अशी साधने व संधी शिक्षण व्यवस्थेने,समाजव्यवस्थेने उपलब्ध करून दिली पाहिजेत. शिक्षकांनी, पालकांनी प्रेरणा द्यायची गरज आहे.आज पर्यंत हे अपेक्षेप्रमाणे झालं नाही, पण आता करायचेआहे.अशाही विद्यार्थ्यांचा विचार करावा लागेल ते शाळेत जातच नाहीत,अभ्यास करत नाहीत त्यांना कोणी काही म्हणत नाही. जिथे पालक शिक्षणाबद्दल अनभिज्ञ आहेत, जिथे आर्थिक विवंचना आहे जिथे विद्यार्थ्यांची गरज पालकांना हवी आहे.जिथे आई वडील घरी नसतील कामानिमित्त बाहेर असतील तिथे मुले मोबाईल सहवासात राहणार. शिकवणे कंटाळवाणे असेल तर मुले ऑफ स्क्रीनहोणार.सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर,sanitiser वापर साठी नवीन नवीन योजना आखाव्या लागतील. शाळे शिवायअनौपचारिक शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थ्यांनी शिकावं असं वाटत असेल तर अभ्यासक्रम बदलावा लागेल. अचानक अभ्यासक्रम बदलता येणार नाही, पण काही मार्गदर्शक सूचना वितरित करता येतील.अभ्यासक्रमातून अनौपचारिक शैक्षणिक अनुभव त्यांना कसा मिळेल याची तरतूद करायला हवी.शिकण्याच्या संधी मुलांना आपण किती आणि कशा उपलब्ध करून देतो यावरही ते अवलंबून आहे. राहू दे तुला जमणार नाही असाच पालकांचा कल असतो. किती मुले भाजी आणतात ,व्यवहार करतात, घरात उपकरणांची दुरुस्ती करतात ,घरात स्वयंपाकात मदत करतात, नवीन म्हणून एखादा पदार्थ करणं वेगळं आणि आईला मदत करणं वेगळं. भांडे घासायला मदत करतात का? श्रम प्रतिष्ठा कशी व किती रूजते. मुले घर झाडतात कां,अंगण झाडतात का? सुट्टीत मुलं काही गोष्टी करतात.ते नेहमीच करतील तरच मूल्यं रुजतील. 


आपल्याला वेगळ्या मूल्यमापनाचा विचार करता येईल का? ज्याच्यामुळे विद्यार्थी काही कौशल्य शिकु शकतील, याची नोंद घेता येईल .काही ज्ञान त्यांचे वृद्धिंगत झाले काय याची चाचणी घेता येईल. हे सगळं नवीन करण्याची संधी आहे. एकीकडे स्क्रीन टाईम वर वेबिनार घ्यायचे व त्यांच्या हातात जास्त वेळ स्क्रीन द्यायचा.निर्जीव समूह संपर्क साधनातून विद्यार्थ्यांना शिकावे लागणार. ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया एकतर्फी चालेल.ऑफलाईन मध्ये संवादाला जास्त वाव आहे. द्रोणाचार्य ऑनलाईन उपलब्ध होतील व मुलांना ऑफलाइन एकलव्य व्हावं लागेल. मूल्य बदलले की व्यवस्था बदलावी लागते. समान मूल्य अभ्यासक्रमातअसताना मूल्ये समान झिरपली नाहीत,याची जबाबदारी कोणाची? मूल्य झिरपले पाहिजेत,केवळअभ्यासक्रम नाही. अभ्यासक्रम माहीत आहे पण मूल्ये माहीत नाही अशी आज अवस्था आहे.अभ्यासक्रम केव्हा ही पूर्ण करता येतो. पूर्ण झाला असं लिहिता येतं. मूल्यात्मक बदल होतोच असं नाही. ते होण्याची संधी आली आहे. शैक्षणिक संदर्भ बदलतील याची कल्पना कोणीही केली न्हवती. शिक्षणाचे आता दोन प्रवाह झाले आहेत एक ऑनलाईन व दुसरे ऑफलाईन. शिक्षण परिस्थितीजन्य झाले आहे. शिक्षण तज्ञा पासून ते पालक, विद्यार्थ्यां पर्यंत सर्वांनाच परिस्थितीस सामोरे कसे जायचे हा प्रश्न पडला आहे.पुस्तक जेव्हा निरुपयोगी ठरत आयुष्यातले प्रश्न सोडायला तेव्हा मस्तकच कामाला येतं. परिस्तिथी संधी बनून आली आहे.आपत्ती मध्येशिक्षण वरदान ठरू शकतं. प्रत्येक जण आपल्या गतीने, सजग होऊन, स्वअनुभवाने, स्वयंअध्ययनाने शिकणार आहे. ऑनलाईन चे प्रश्न वेगळे व ऑफलाइन चे प्रश्नवेगळे. प्रश्न वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या संदर्भात सोडवावे लागतील.


आता सरसकट एकच फुटपट्टी शिक्षण क्षेत्राला लागू करता येणार नाही. मूल्यमापनाच्या मापदंड ब दलावे लागतील.शिकवण्यापेक्षा शिकणे याला आता महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासक्रमाचे वर्गीकरण करावे लागेल. काही घटक स्वयंअध्ययनासाठी गृहपाठ सारखे विद्यार्थ्यांना द्यावे लागतील.आता समंत्रणcouncelling ही मुक्त विद्यापीठातील पद्धत अंमलात आणता येईल. केवळ सगळं शिकवायचे नाही, वाचून शंका निरसन करायचे.तास कमी करून त्या तासांमध्ये आधी मुलांना वाचायला सांगून, नंतर एक दिवस चर्चेचा ठेवता येईल. हुशार ,मध्यम व अभ्यासात कच्ची असणारे विद्यार्थी यांची उत्तरे ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेता येतील.,आणि त्याच्यावर चर्चा करता येईल. शिकवायचं नाही.पाठावर चर्चा करायची. मुलांच्या शंकेचे निरसन करायचे. मुक्त विद्यापीठात सर्व अभ्यासक्रम हा शिकवला जात नाही तर समंत्रणा मार्फत शिकवला जातो.विद्यार्थ्यांनी वाचून तो अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. त्या दिवसात फक्त चर्चा करायची.अनेक घरात कादंबऱ्या ,पुस्तके काय, खायला भाकरी नाही अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीचाही आपल्याला विचार करावा लागेल. काही अजून सर्वेक्षण करून पाठबळ मिळाले पाहिजे. होम लर्निंग साठी चांगली संधी आहे.जिथे शक्य आहे तिथे सुशिक्षित पालकांच उदबोधन अभ्यासक्रमाबाबत ऑनलाईन करता येईल. मग तो मुलाकडून करून घ्यायला सांगा. काही ठिकाणी हे घडतं ते सार्वत्रिक व्हायला हवं. प्रत्येकाचं जगणं हाच अभ्यासक्रम व प्रत्येकाचे अनुभव हेच त्याला उत्तर.


अशा रीतीने जीवनानुभावावर आधारित मुलांना व्यक्त होऊ द्या. मुलांच्या कृतीतूनही त्यांचे मूल्यमापन करावे लागेल,केवळ अभ्यासातून नाही. मुले काहीच शिकणार नाही त्याचा बाऊ नको.अभ्यासक्रम शिकणार नाही,पण जीवनानुभव शिकतील तो महत्त्वाचा आहे. कौशल्य शिकतील ती महत्त्वाची आहेत. करोना सुट्टीत मुलांनी केले ते नाविन्याची कास धरणारं आहे पण त्यात सातत्य हवं. कोणती मूल्यं मुलांमध्ये रुजली हे पाहायला हवं, व्यवहारात ते दिसायला हवं. तात्पुरती प्रसंगानुरूप एखादी गोष्ट करणं वेगळं व अंगवळणी पडणं,रुजणं वेगळंं. जे जे रूचतं ते रुजतं.शिक्षकांना,पालकांना,विद्यार्थ्यांना प्रयोग करायला वाव आहे. सृजनात्मक काहीतरी करण्यासाठी वावआहे.प्रत्येकाला आपापल्या पातळीवर जे करायचे आहे ते करू द्या.अब्राहम लिंकनने मुख्याध्यापकास लिहलेल्या पत्रातल्या प्रमाणे विद्यार्थी घडायला हवेत, केवळ परीक्षेत यशस्वी असणारी मुले नको, जीवनात यशस्वी होणारी हवीत,केवळ पुस्तकी नको.प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यापुढील प्रश्नचिन्ह काढायचे असेल तर शिक्षणाचा वेगळ्या संदर्भात विचार करावा लागेल.काहीतरी व सृजनात्मक नक्कीच घडेल,फार काही भयंकर घडणार नाही, पण सुंदर घडेल. थोडं पाठबळ हवं.


Rate this content
Log in