STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष कोविड -19शी

जीवन एक संघर्ष कोविड -19शी

2 mins
131

अखेर जिंकलो

जितमया, जितमया

सातव्या दिवसानंतर पुन्हा एक स्वॅब घेतला. तो व्यवस्थित घेतला गेला ते आपल्याला स्वॅब घेतानाच कळते. आता शरीरदेखील औषधांना रिस्पॉन्स देऊ लागले. ताप आला नाही. आता नवीन आलेली रूम पार्टनरदेखील मला छान मिळाली. समवयस्क असल्यामुळे आमच्या दोघींची ट्युनिंग चांगली जमली. कोविडसारख्या परिस्थितीत आम्ही एकत्र आलो. ती पण खोकत होती. तिला फुप्फुसात आणि ब्लडमध्ये दोन्ही ठिकाणी इन्फेक्‍शन होते, असे तिने सांगितले.


सेफ डिस्टन्स ठेवून, मास्क लावून आम्ही दोघी गप्पा मारत होतो. एकमेकांची सुखदुःखे शेअर करत होतो. आता एकटेपणा पळून गेला होता.

बाकीचे रुटीन रोजच्याप्रमाणे चालू होते. तीन तारखेला जो स्वॅब घेतला त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. सकाळीसकाळी डॉक्टर जान्हवीने मला ही गोड बातमी दिली आणि जेवणाच्या आधी जाणार का जेवणाच्या नंतर घरी जाणार? असे विचारले.

एकदम हिंदी सिनेमात दाखवतात तसे पहिल्यांदा हिरो किंवा हिरोईनला 'तुम माँ बननेवाली हो' किंवा 'तुम बाप बननेवाले हो', असं सांगितल्यावर जसं सतारीचं म्युझिक देतात आणि त्या तालावर तो हिरो किंवा हिरोइन गोलगोल फिरतात तसं मला तिथल्या कॉरिडॉरमध्ये थुईथुई नाचावसं वाटलं.  मी आनंदाने एकदम खुश झाले. ताबडतोब सगळ्या नातेवाईकांना फोन करून कळवले. सगळ्यांनी आनंदाने जल्लोष केला तसे मला व्हाट्सअपवर टाकले. मग काहीच करायचे सुचेना. सामान भरायला घेतले पण कोणत्या बॅगेत काय भरू हे कळेना. चारवेळा इतरचे सामान तिकडेइकडे सामान इकडे शेवटी मी दमले तोपर्यंत दुपारचे जेवण आले. अक्षरशः त्या दिवशी तेच जेवण आवडीने जेवले. म्हणजे काय जेवले आणि काय नाही ते आठवत नाही. पण या सगळ्या प्रकारात मी थकून गेले होते शेवटी बेडवर आडवी झाले आणि एक डुलकी काढली.


सेवन हिल हॉस्पिटलला मी पाचपैकी चार स्टार देईन कारण गव्हर्नमेंटने सर्व व्यवस्थित पुरविलेले आहे. ज्या होत्या त्या मानवी चुका होत्या. व्यवस्थित रोजच्या रोज स्वच्छता होत होती. रोजच्या रोज चादरी, बेडशीट बदलल्या जात होत्या. कपडे बदलायला मिळत होते. टॉवेल मिळत होते. जेवणातदेखील केळी, दुध, अंडी इत्यादी गोष्टी मिळत होत्या. रोजच्या रोज रूमची स्वच्छता, टॉयलेट-बाथरूमची स्वच्छता केली जात होती. फक्त आपल्याला फाॅलोअप करायला लागायचा.


छोटा मुलगा ठाण्याला जाऊन मोठी गाडी घेऊन आला. त्याच्यासोबत मोठा मुलगादेखील आला होता. एकंदरीत डिस्चार्ज प्रोसिजर व्हायला चार वाजले. एका व्हीलचेअरवरती सर्व सामान लादून खाली उतरले. तिथे मला एअरपोर्टप्रमाणे वातावरण वाटले. पाच-सहा मंडळी लाईनमध्ये खुर्च्या टाकून बसलेली होती आणि कागदपत्रे बघून त्याची झेरॉक्स आपल्याला देऊन शेवटी हातावरती होम क्वारंटाईनचा शिक्का मारला. तिथे मला दोन्ही मुलांनीदेखील कवेत घेतले. घरी आल्यावर तर एक उत्सवच झाला.


मिस्टरांनी आरतीचे तबक तयार करून मला ओवाळून घरात घेतले. आमचा ब्रुनोदेखील सगळ्यांच्या पायात लुडबुड करीत आपला आनंद व्यक्त करीत होता आणि तोंडाने आवाज करत जणू काय मला विचारत होता... इतके दिवस कुठे होतीस.


घरात सगळा आनंदीआनंद झाला होता. मी पुन्हा कोरोनावर मात करून माझ्या घरात परत आले होते.



Rate this content
Log in