Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष कोविड -19

जीवन एक संघर्ष कोविड -19

2 mins
152


25 सप्टेंबर 2020

मंगळवारी डोकेदुखी, अंगदुखी, बुधवारी दिवसभर ताप, गुरुवारी सकाळी ब्लड टेस्ट आणि संध्याकाळी covid-19 ची टेस्ट. दिवस थोडा धाकधूक

गेला. शुक्रवार 25 तारीख उजाडली, तशी मी बरी होते. त्यामुळे असं काही टेन्शन वाटलं नाही. सकाळचा नाश्ता झाला, दुपारचा स्वयंपाक उठतबसत मुलाच्या मदतीने केला आणि आता जेवायला बसणार तेवढ्यात! मधून डॉक्टर प्रभू चा फोन आला मॅडम तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि ते शब्द एखाद्या तापलेल्या शीसाप्रमाणे या प्रमाणे कानात शिरले क्षणभर काही सुचेना पायाखालची जमीन सरकली. त्यानंतर मुलाला सांगितले. मिस्टर नाईटचे येऊन झोपलेले होते त्यांना उठून त्यांना सांगितले. मुलगा मी आणि आमचे पतीदेव दीपक सगळ्यांची रडारड सुरू झाली. तिकडे सेवन हिल हॉस्पिटलमध्ये छोटा काम करतो त्याला कळले तो पण रडू लागला. त्याने मला राहून राहून एकच सांगितले आई माझ्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट व्हायला ये. इकडे तिकडे जाऊ नको! मी स्वतः येथे लक्ष देईन.


मी सुन्न झाले होते, घरातले सगळे सुन्न झाले होते .काय करायचे ,काय कपडे भरायचे कोणाला काही सुचेना. वातावरणात एक प्रकारचा तणाव भरून राहिला होता. मुलाने आणि मिस्टरांनी हाताला येतील ते कपडे बॅगेत भरून ठेवले. कसबसं जेवायचं म्हणून जेवलो आणि ॲम्बुलन्स व्यवस्था करायला आमच्या एरियातील माजी नगरसेविका  यांना सांगितले त्यांनी व्यवस्था केली पण तो ॲम्बुलन्स वाला येतो येतो म्हणत शेवटपर्यंत आलाच नाही. आता बिग बाजार मध्ये आहे, आता ट्राफिकमध्ये आहे, आता सिग्नल ला आहे असं करत त्यांने अजून आमच्या तणावात भर घातली. ते तीन-चार तास खूप टेन्शनमध्ये गेले शेवटी अती ताणल्यावर त्यांना म्हटले आपली टुविलर काढा मी गाडीवर बसून यायला तयार आहे.


फोर व्हिलर आहे पण अशावेळी ते दोघे पॅनिक झाले होते. मुलगा म्हणाला आई या परिस्थितीत मी गाडी चालवू शकत नाही.  आणि मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये मनस्थिती ठीक नसताना यांना पण ते जमले नसते. टू व्हीलरवर आमचा भरपूर विश्वास आहे टू व्हीलरवरती आम्ही शिर्डीपर्यंत जातो. त्यामुळे तिच्यावर विश्वास होता शेवटी बॅग पायात घेतली आणि दोघे मास्क लावून मी स्वतःचा चेहरा बांधून अंधेरी कडे निघालो छोटा मुलगा माझा बेड वगैरे रिझर्व करून वाट पाहत होता त्याने बातमी कळल्यापासून एक घास देखील तोंडात घातला नव्हता मी त्याला चार वेळा सांगत होते बाळा मी चांगली आहे तू खाऊन घे पण त्याने ऐकले नाही शेवटी जेव्हा मला ऍडमिट केले त्यानंतर त्याने खाल्ले.


Rate this content
Log in