STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

3 mins
219

सकाळी पावणे सहाला इंजेक्शन देण्यासाठी ब्रदर आला .त्याने आयव्ही इंजेक्शन दिले. माझ्या हातामध्ये जेलको टाकलेला आहे. त्यानंतर पर्सनल केअर टेकर आला. इकडे त्यांना पीसी म्हणतात. माझ्या तोंडात सरकारी हॉस्पिटल ची  सवय "मामा आणि मावशी" येते. सकाळचे कपडे आणि बेडशीट देऊन गेला. खरेतर सकाळी लवकर त्यांच्या पाठोपाठ सकाळचा चहा देणारा येतो. चहा आणि डायजेस्ट ची तीन बिस्कीटे देऊन जातो. पण आज तो लवकर आलाच नाही. आणि आजच नेमकी सकाळी सकाळी भूक लागलेली मग त्याला कधी तरी ड्युटी ऑफ होताना आठवण झाली आणि मला धावत धावत  येऊन चहा बिस्कीटे दिली. मग मी माझ्या नित्यनियमाप्रमाणे आंघोळीला गेले. सकाळची देवाची स्तोत्रे पूर्ण केली. नाष्टा केला नाश्त्याला आज डोसे होते. इंजेक्शन इन्शुलीनची आठवण मात्र करून द्यावी लागते. मुली स्वतःहून इन्शुलीन द्यायला येत नाहीत. कालचा ब्रदर चांगला होता तो स्वतःहून इंजेक्शन द्यायला सकाळी आला .या स्टाफ लोकांना  काहीच माहीत नसते. एकमेकींना नीट ओव्हर देत नाहीत


हरिविजय आज पाचवा अध्याय झाला. अध्याय संपता संपता एक्स-रे ला नेण्यासाठी पी सी आला त्याचबरोबर जाऊन "चेस्ट एक्स-रे" काढून आले. माझ्या बरोबर अजून दोघीजणी होत्या तिथे गेल्यावर पाच-सात पेशंट होते. पण पटापट एक्सरे काढून झाले .परत आले माळा घेणार होते, पण ईसीजी करणारी मुलगी आली मग ईसीजी करून झाला.


आज थोडा आवाज बारीक बारीक वाटतो आहे. सकाळी सकाळच्या सर्व गोळ्या घेतल्या त्यात वन ग्रॅम मेटफॉर्मिन आहे टेन एमजी इन्शुलीन आहे आता दुपारी थोडं आडवी झाले. थोड्या वेळ माझी इकडे तिकडे चालू होती दुपारचे जेवण आले पण खरंच सांगायचं तर त्यांचं काय जेवण जातच नाही. गेले चारपाच दिवस मी सकाळी आणि संध्याकाळी एका फुलक्यावर आहे. त्यानंतर पुन्हा एक हरिविजय अध्याय घेतला. सकाळपासून दीपकचा तीनवेळा,

तन्मयचा दोन-तीन वेळा फोन येऊन गेला. तन्मय (छोटा मुलगा) एकदा सकाळी भेटून गेला आज ठीक आहे आज चांगलं वाटत आहे.


अजून पण बीपी आणि शुगर मात्र जैसे थे. बीपी वर यायचं नाव घेत नाही. शुगर खाली जायचं नाव घेत नाही. काल तर बीपी टेस्टिंग करताना पलीकडे फोनवर ती माझ्या कामावरची सिस्टर होती. तिने ऐकले आणि माझ्या मागेच लागली. "मॅडम तिथून बाहेर पडा. मी सिव्हिलला तुमची व्यवस्था करते. इतके दिवस झाले तुमचे बीपी लो आहे आणि शुगर हाय आहे पण मीच समजावले की आता नको पाच दिवस झालेत. शांत घे माझा करोनाचा रिपोर्ट निगेटिव आला आहे. मी तिला समजावले खरे पण माझेदेखील डोके सटकले होते. मी तशीच उठले. नर्सेस स्टेशनपाशी जाऊन तिथे डॉक्टर धीरज कोण आहे म्हणून विचारलं.


त्यांनी सांगितलं मीच आहे म्हटलं "सर एवढं सगळं मेडिसीन चालू आहे पण माझं बीपी वर जात नाही आणि शुगर खाली येत नाही. त्यांनी विचारले बिछान्यातून उठताना चक्कर येते का? म्हणलं नाही येत मग म्हणाले बीपी ठीक आहे त्याची काळजी करू नका आणि जोपर्यंत इंजेक्शन मेथ्यलप्रेडणीसोलोने चालू आहे तोपर्यंत शुगर असेच कमी-जास्त चालू राहणार.


वाटलं नव्हतं की इतके दिवस लागतील पण काल सात दिवस झाले. कोविडचा रिपोर्ट माझा आज निगेटिव आला आहे. परंतु मला त्याचे आश्चर्य वाटते कारण परवा दिवशीपर्यंत मला ताप होता मंगळवारी मला जोराचा ताप आला होता आणि बुधवारी घेतलेल्या रिपोर्ट कसा काय निगेटिव येतो?  त्या मुलीने घेताना स्वाब बरोबर घेतला नाही.


इथे एक डॉक्टर जान्हवी म्हणून आहे ती फक्त रोज सकाळी रेग्युलर असते. बाकी संध्याकाळचे डॉक्टर नर्सेस सगळे बदलत राहतात. तिलाही मी सांगितले माझे सिम्टम्स गेल्याशिवाय मला डिस्चार्ज देऊ नको मला ठेव. अंडर ऑब्झर्वेशन ठेव. ती हो म्हणाली. संध्याकाळी माझी रूम पार्टनर न सांगताच रूम सोडून गेली. असंही स्वतःजवळ काही सामान नव्हतंच अंगावरचा ड्रेस बस! बाकी दिलेले जेवण तसेच, दिलेले कपडे टॉवेल तसेच आणि मुलगी गायब. शेवटी मला राहवेना. म्हटलं, एखादा पेशंट पळून गेला तर नर्स वरती येते म्हणून मी नर्सिंग स्टेशनला सांगायला गेले. तेव्हा कळले की तिने रुम बदलली.

***************


Rate this content
Log in