Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

2 mins
230


परमेश्वराचा हात


जरी डॉक्टरी प्रयत्न असले तरी त्यामागे परमेश्वरी अधिष्ठान लागते. परमेश्वराचा हात लागतो तरच मिरॅकल्स होतात. मी हॉस्पिटलला जाताना सोबत "हरिविजय" घेऊन गेले होते माझा माझ्या कृष्णावर दृढ विश्वास होता. मी त्याला सांगितले होते कृष्णा तू माझ्याबरोबर आला आहे आणि तू मला परत घरी घेऊन जाणार आहेस. मुळात आमचं सगळं घरदार देव मानणार आहे. देवधर्म, कुळधर्म, कुळाचार सर्व काही करणारं आहे. सर्वांचा त्या जगनियंत्या परमेश्वरावर भरपूर विश्वास आहे. दृढ विश्वास आहे.


मी आजारी पडल्यापासून तिसऱ्या दिवशी मोठ्या मुलाने गुरुचरित्राचे पारायण मांडले. त्यासाठी सात दिवस उपवासपण केला. मिस्टरांनीदेखील आमच्या गुरु घराण्यातील पूर्वजांचे त्यांच्या पोथीचे पारायण मांडले आमचे गुरु घराणे आहे (आनंदमूर्ती रघुनाथ स्वामी) यांची कृष्णा तीरावर सांगली गाव ब्रह्मनाळ येथे समाधी आणि मठ आहे.


माझ्या सर्व नातेवाईकांनी, इष्टमित्रांनी, माझ्यासाठी भरपूर प्रार्थना केल्या मला अतिशय मानसिक सपोर्ट दिला. सर्वांनी एकच सांगितले,

ज्योतीताई तू फायटर आहेस, तू लढवय्या आहेस कोरोनाला जिंकून त्यावर मात करून घरी येणार, असा मला विश्‍वास दिला. मंडळी कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही परंतु एक दिवस अतिशय क्रिटिकल आणि वाईट गेला. असे तर मला रोजच ताप आणि थंडी एका ठराविक टायमाला येत होती. पण 27 सप्टेंबर रविवार या दिवशी खरोखरी काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मला रात्रभर चित्रविचित्र दृश्य दिसत होती. त्यामध्ये एक अतिशय उंच दहा-बारा फुटांचा काळा बुरखा पांघरलेला ड्रॅक्युलासारखा माणूस वाकून वाकून माझ्याकडे बघत होता आणि सतत मला काहीतरी भीती वाटत होती. सकाळी पावणेपाचच्या सुमारास घरातील सर्वच माणसांना एक वाईट सेन्सेशन वाटत होते.


चार ठिकाणी असणारी चार माणसे परंतु त्यांना एकाच वेळी मला काहीतरी धोका असल्याचे सेन्सेशन वाटले. मी मनापासून कृष्णाची आळवणी केली कृष्णा! कृष्णा! तू मला घरी घेऊन जाणार ना? त्याच दिवशी संध्याकाळी मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. अक्षरशः माझे मला स्वतःला मी वाचणार नाही असे वाटत होते आणि मी खूप रडत होते. फोनवरती मिस्टरांशी, मुलाशी, बहिणीशी, सर्वांशी बोलताना मी फक्त आणि फक्त रडत होते. पण काय सांगू तुम्हाला मला स्वतःला तरी एक चमत्कारच दिसला आणि माझ्या उशाला श्रीकृष्ण रत्नजडीत सिंहासन टाकून बसला आहे, असे दिसले. त्याच क्षणाला छोट्या मुलाला मला अटॅक आला आहे आणि तो मला सिपीआर देत आहे असे दिसले. दुसऱ्या क्षणी त्यालादेखील कृष्ण दिसला. मोठा मुलगा घरात एकाएकी दचकून जागा झाला त्यालादेखील असेच काहीतरी वाटून गेले. असो.


तुम्हाला विश्वास वाटो न वाटो पण हे माझ्या बाबतीत घडलं खरं.


Rate this content
Log in