Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

2 mins
245


मानवी मनाची गुंतागुंत

टू व्हिलर वरून ऍडमिट व्हायला गेले खरी ,परंतु थोड्या साठी बचावले. तिथे गेल्यानंतर अर्ध्या तासातच मला थडथडून थंडी भरून आली आणि ताप देखील चढला. जर ही गोष्ट रस्त्यात घडली असती तर फारच त्रास झाला असता. कारण ताप आहे म्हटल्यानंतर कोणत्याही रिक्षावाल्याने गाडीत घ्यायला बघितले नसते आणि पुन्हा एखादी अंबुलन्स येईपर्यंत तिथे रस्त्यात  बसावे लागले असते.


घरातून निघताना मोठा मुलगा, सत्तावीस वर्षाचा मुलगा मला मिठी मारून धाय मोकलून रडला. आई लवकर परत ये तुझी वाट पाहतोय. मला बाईक बुक करायला तू हवी आहेस! असे म्हणाला, माझ्या गाडी मागे धावत होता, मला फ्लाईंग किस देत होता. शेवटी मी मान फिरवली. इतकेच काय घरातील आमचा पाळीव कुत्रा ब्रुनो तोदेखील काहीतरी समजल्या प्रमाणे अस्वस्थ झाला होता .उगाचच आतबाहेर धावाधाव करीत होता. यांच्यामागे स्कूटर वरती बसून हॉस्पिटल ला ॲडमिट व्हायला गेले तोपर्यंत मला काही वाटले नाही. कदाचित ॲम्बुलन्स मधून गेले असते तर मला डिप्रेशन आले असते.


परंतु प्रत्यक्ष हॉस्पिटलच्या दारात त्यांना सोडताना दोन डोळ्यांची भाषा काय असते ती मला कळली. अक्षरशः आम्ही दोघे एकमेकाकडे एकटक बघत होतो. जसे काही एकमेकाला डोळ्यात साठवून घेत होतो. पुन्हा बघायला मिळेल की नाही असं वाटत होतं त्यातच या माझ्या आजारपणाच्या दरम्यान ओळखीतल्या लोकांचे दोन-तीन घटना अशा झाल्या किती व्यक्ती हॉस्पिटल ला ॲडमिट झाली स्वतःच्या पायाने चालत गेली पण नंतर त्याचे नखदेखील दिसले नाही. त्यामुळे मनात एक प्रकारची भीती बसलेली होती. पुन्हा भेटू की नाही याची शाश्वती वाटत नव्हती. त्यांना सोडून माझा पाय निघत नव्हता. शेवटी मी त्यांना एक गच्च मिठी मारली आणि पुन्हा एकमेकांना बघू का? असं विचारलं दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या.

ते म्हणाले मी कसा घरापर्यंत आलो मला कळले नाही आणि मी वरती हॉस्पिटल ला ॲडमिट व्हायला गेले. मुलाने ऍडमिशन प्रोसिजर पूर्ण करून घेतली. मला वार्ड पर्यंत सोडले. त्याला पण आत यायची परमिशन नाही. वार्डमधील रिसेप्शनला फॉर्म भरताना थडथडून थंडी वाजून आली. त्यामुळे मी तेथील स्टाफला सांगितले वैद्यकीय भाषेत सांगितले मला शिवरिंग(थंडी भरून येणे) होते आहे मी झोपायला जाते त्यानंतर अनुभव फार वाईट होता. अंगात फणफणून ताप डोकं दुखतंय अंग दुखतंय आणि मी अक्षरशः ब्लॅंकेट घेऊन देखील उडत होते परंतु मला बघायला तीन तास कोणीही आले नाही.

नजरेची भाषा

त्या दिवशी माझा

covid-19 पॉझिटिव आला

आणि तुझ्या डोळ्यात

मला भूकंप दिसला

हॉस्पिटलच्या दारात

एकमेकांना सोडताना

आवरले नाहीत अश्रू पापण्यांना

मनाला जाळत होती शंका

याची देही याची डोळा

पुन्हा भेट होईल का

नजरेत नजर गुंतलेली

न बोलता एकमेकांना

बरंच काही सांगून गेली

डोळे घळा घळा वाहत होते

न बोलता बोलत होते

एकमेकांना नजरेत

साठवत होते

जुने क्षण आठवत होते

त्याक्षणी कळली

नजरेची भाषा

तु पल्लवित केल्या

जगण्याच्या आशा

म्हणून कोरोनावर करून मात

आले फिरुन तुझ्या संसारात

आले फिरून आपल्या घरट्यात


Rate this content
Log in