STORYMIRROR

Jyoti gosavi

Others

3  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

जीवन एक संघर्ष कोविड -19 शी

3 mins
315

27 सप्टेंबर  2020 वार रविवार

सकाळी उठले, सकाळी- सकाळी मनाला प्रसन्न वाटले. त्या मूडमध्ये सकाळची अन्हिके उरकली. "हरिविजय" अध्याय वाचून घेतला. त्यानंतर

बदललेल्या मुडमध्ये सेल्फी काढले आणि माझ्या नातेवाईकांना आणि नीलपुष्प साहित्य मंडळ यांनादेखील वरील पोस्ट फोटो पोस्ट केले. कारण कालपासून या ग्रुपने मला खूप सपोर्ट दिला होता. सगळ्यांनी माझे कौतुक पण केले होते. तुमची स्पिरिट खूप छान आहे तुम्ही नक्की बऱ्या होऊन लवकर घरी येणार असे त्यांनी मला दहा वेळा सांगितले होते.

सकाळचा नाश्ता घेतला गोळ्या, इंजेक्शन, तीन टाईम ब्लड चेकिंग आणि तिन टाइम इन्शुलिन चालू आहे.थोडाफार जेवले जेवणानंतर हरिविजय चा एक अध्याय घेतला आणि थोडीशी झोपले पाच वाजता जागी जागी झाले तर थंडी वाजत होती. जाऊन सिस्टरला सांगितलं. एकाएकी जोराने थंडी भरून येणे, ताप चढणे, सगळे अंग आणि डोके दुखू लागणे हे आता तिसऱ्यांदा झाले होते. नशीब मी थोडीशी बरी होते तेव्हाच मी जाऊन सांगितले. दहा-पंधरा मिनिटांनी सिस्टर येईपर्यंत अजून ताप वाढला. 104 पर्यंत गेला आणि माझा सकाळच्या मूड पूर्णपणे बदलला.


पंखा बंद करुन दोन ब्लँकेट अंगावर घेऊन झोपले तरीही थंडी थांबेना, मग सिस्टरने येऊन इंजेक्शन पॅरासिटामॉलची एक ड्रीप लावली. मनात नाही नाही ते विचार येऊ लागले खरंच मी येथून घरी परत जाणार आहे ना? माझा कन्हैया माझ्या पाठीशी आहे ना? आणि एकदम प्रचंड रडू आले. मला माझ्या काकांची (वडिलांची) आठवण झाली आतापर्यंत जेव्हा, जेव्हा आणीबाणीची वेळ असताना त्यांचा खंबीर आधार वाटायचा. त्यांनी गाणगापूरचं भस्म "जय गुरुदेव दत्त" असं म्हणून कपाळी लावलं की, अर्धा आजार पळून जायचा. कारण जितकं ते भस्म सामर्थ्यशाली आहे तितकाच तो हातदेखील सामर्थ्यशाली होता. त्याला अध्यात्माची जोड होती आज दोन्ही जवळ नव्हतं. आणीबाणीची वेळ आलेली आहे आणि गाणगापूरचं भस्म नाही आणि माझे काका नाहीत. काका आता तुमच्या आसोबाने कुणाचं तोंड बघायचे.


माझ्या कन्हैया आहेच पण😭😭😭 तुमची गरज भासते. मी वडिलांना काका म्हणत होते. वरील एवढाच प्यारा टाईप केला आणि मला नुसतं नुसतं धुमसून धुमसून रडायला आलं. असं वाटू लागलं कोणी कितीही ॲशुरन्स दिला तरी शेवटी आपण एकटेच आहोत आणि ही लढाई आपल्याला एकट्यालाच लढायची आहे. मी खूप डिप्रेशनमध्ये गेले. अख्खी संध्याकाळ डिप्रेशनमध्ये गेली. मी ग्लानी मध्येच पडून होते.


मला यावेळी तीव्रतेने नवरा जवळ असावा असं वाटत होतं आणि मी त्यांचे विचार करत होतो डोळे मिटले आणि डोक्यापाशी असलेल्या खुर्चीमध्ये मला दीपक बसलेले दिसले. "जाड्या" (माझं लाडकं नाव) तुला काय पाहिजे? का रडतेस? असं प्रेमाने विचारत होते. मी त्यांना विचारते, अहो तुम्हाला कोणी आत कसं काय सोडलं? तर असच आलो म्हटले. मी पटकन डोळे उघडले तर तो मला झाला झालेला भास होता. पण याला म्हणतात आंतरीक टेलीपथी. त्यानंतर फोनवर रडतच मी तन्मयशी बोलले, यांच्याशी बोलले, ताईशी बोलले, भाचीशी बोलले, जावयाशी बोलले, सगळ्यांशी बोलून झाल्यावर मन थोडे हलके झाले. दहा वाजता डॉक्टरचा राऊंड झाला. तिला पाच ते सात कालावधीमध्ये मला काय झालं होतं ते माहिती नव्हतं. मी सांगितल्यावर

"अरे ऐसा मत करो! हम है आपके लिये" असं सांगून गेली. परंतु रात्री झोपतानादेखील मी डिप्रेशनमध्ये झोपले. कृष्णाची आळवणी केली. माझ्या पाठीराखे कृष्ण कन्हैया मी तुला येताना सोबत घेऊन आलेली आहे तू माझ्या उशाशी बसलेला आहे आणि तू मला बरं करून तू मला परत घरी नेणार आहे, असं त्याला सांगितलं. त्यावेळी माझी मनःस्थिती सतत दोलायमान होत होती. त्याच मूडमध्ये मी केलेली कविता खाली देत आहे.

*****

खेळ उन सावल्यांचा

ऊन सावल्यांच्या हिंदोळ्यावर

आशा निराशेचा घेते झोला

दुःख धावते सुखापाठी

तुच केला निर्माण पसारा

 आशेचा सूर्य झाकोळण्या

निराशेचे मेघ येती हो

इवलुश्या त्या ज्योती ला

तमात ढकलून जाती हो

दिवस उगवतो छान सोनेरी

घाबरते मी अंधाराला

असे वाटते येऊन कोणी

थांबवेल का? मम श्वासाला

घुसमटतो मग श्वास ही माझा

बुडते मी त्या तम अंधारी

येतो कोणी अज्ञात हात

खेचून घेतो माझी दोरी

पुन्हा घेते मी श्वास नवा

आरंभ करते नव्या जगण्याला

झटकूनी मळभ मनावरचे

फुटती धुमारे जीवनाला

फेकीत सोनेरी नव किरणे

रवी उभा मम स्वागताला


Rate this content
Log in