Jyoti gosavi

Others

2  

Jyoti gosavi

Others

जीवन एक संघर्ष covid-19शी

जीवन एक संघर्ष covid-19शी

2 mins
144


नमस्कार माझ्या प्रिय वाचकांनो,

सध्या आपली प्रवासवर्णने जोमात चालू होती. कैलास मानस सरोवर झाले. काश्मीर लेह लडाख झाले. केरळ कन्याकुमारी झाले आणि आता मी गुजरात टूर टाकण्याच्या विचारात होते आणि अचानक मला दहा दिवसाचा covid-19 सेवन हिल अंधेरी येथील हॉस्पिटलचा दौरा करावा लागला त्या दहा दिवसाच्या दरम्यान शरीरावर आणि मनावर काय काय आणि कसे परिणाम झाले याचेच मग लेखन सुरू केले आणि आता ते वाचकांसाठी एक अनुभव म्हणून पाठवत आहे तुम्हाला वाचायला आवडेल अशी खात्री आहे.


मंगळवारी कामावरून आले तीच प्रचंड डोकेदुखी घेऊन, मनात आले नेहमीप्रमाणे एलर्जी असेल, सर्दी असेल, त्यामुळे जास्त काही टेन्शन घेतले नाही. आता मी डबल करोणा वॉरियर आहे. एकतर मी स्वतः आरोग्य खात्यात नर्सिंग ऑफिसर या पदावर ती काम करत असल्याने मी कामावर जातच होते. मला स्वतःला ब्लड प्रेशर, डायबिटीज कोलेस्ट्रॉल या सगळ्यांच्या गोळ्या चालू आहेत परंतु मी घरांमध्ये बसले नाही. मी विचार केला मी या मुलींची परिचारिकांची लीडर जर मी घरात घाबरून बसले तर मुली त्यातून काय शिक्षण घेतील . म्हणून मी कामावर जात होते जवळ जवळ सहा महिने कोरोणा फाईट करत होते. जे लोक मुंबईला राहतात त्यांना माहित असेल ठाणा ते मालाड या कालावधीत ड्युटीवर जाणे किती रिस्की आहे. परंतु मी माझ्या स्वतःच्या मनाने जात होते. असो.


त्या दिवशी या कोरोना नावाच्या विषाणूने- राक्षसाने मला गाठलेच आणि माझ्या ध्यानीमनी नसताना अचानक मंगळवारी कामावरून घरी आले तीच प्रचंड डोकेदुखी घेऊन. त्यादिवशी साधी सिंपल मी ट्रीटमेंट घेतली मला वाटले दुसऱ्या दिवशी बरे वाटेल.


दुसऱ्या दिवशी हा प्रचंड ताप दिवसभर तापाच्या गोळ्या खाऊन पण 103 वगैरे अंगात होता सगळे अंग प्रचंड ठणकत होते आणि बिछान्यातून उठण्याची देखील ताकत नव्हती शेवटी कामावरच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यांनी मला काही  टेस्ट करायला सांगितल्या मला म्हणाले जर या टेस्ट हाय आल्या तर उद्या एक्स-रे आणि सॉब करण्यास सांगितलं. बुधवारी दिवसभर मुंबईत धो-धो पाऊस पडत होता त्यामुळे बाहेर पडणे शक्य नव्हते. गुरुवारी मात्र सकाळी सकाळी जाऊन ब्लड टेस्ट केली दुपारीच त्याचा रिझल्ट हाय आला. आणि मग सरांनी सांगितले आता एक्स-रे काढून घ्या आणि स्वाब करा. संध्याकाळी कश्याबश्या हालत मध्ये हालत मध्ये जाऊन covid-19 साठी स्वाब टेस्ट करून आले.

तरीपण आमच्या तिघांचा पॉझिटिव्ह अप्रोच होता. आपला रिपोर्ट निगेटिव्ह येणार, साधे व्हायरल इन्फेक्शन असणार असे वाटले सुदैवाने कप खोकला काही नव्हता. तो दिवस तसाच धाकधुकीत गेला.


Rate this content
Log in