Lata Rathi

Others

2.5  

Lata Rathi

Others

जीवन एक संघर्ष--भाग दुसरा

जीवन एक संघर्ष--भाग दुसरा

4 mins
511



भाग -2

   पहिल्या भागात आपण वाचलं, मनोहर आणि शांताच लग्न झालं. त्यांच्या संसारवेलीवर दोन जुळ्या मुली अनु आणि रेणू च आगमन झाल......


   आता पुढे....

खुप मेहनती असल्यामुळे त्याच्या छोट्या garrage चं रूपांतर आता मोठ्या garrage मध्ये झालं होतं. आता त्याच्या हाताखाली पाच, सहा मुलं कामासाठी होती. शांता पण बरच काही शिकत होती,बराच कारभार ती सांभाळायची. 

 अग शांता, आपल्या दोन मुली न आपल्यासाठी खूप भाग्यवाण ,हो न!

सुखाची खरी परिभाषा आता त्यांना उमगायला लागली होती.

--------------------------------------

  आज अनु आणि रेणूचा पाचवा वाढदिवस. मनोहर माहुरच्या देवीला खूप मानायचा, आज वाढदिवसाच्या निमीत्ताने ते चौघेही देवीच्या दर्शनाला जाणार होते,आणि तेथून मग अनाथाश्रमात जाऊन मुलांना जेवण देणार होते. 

  स्वतःच्या गाडीने चौघेही देवीच्या दर्शनाला निघाले, छान हसत खेळत प्रवास सुरू होता

 अनु-रेणू-- बाबा अजून किती हो दूर?

मनोहर- बस बेटा, लवकरच पोहोचू आपण.

शांता- हो ना, मी पण पहिल्यांदाच जातेय दर्शनाला, खूप छान सौंदर्य...

अश्या गप्पा , गोष्टी करत करतच सर्व जण माहुरच्या गडावर पोहोचले. 

देवीचं दर्शन घेऊन शांता खूप धन्य झालीं, तिने देवीची ओटी भरली, बस सर्वांना सुखी ठेव, आणखी काही मागणी नाही माझी. 

जेवण करून ते परतीच्या प्रवासाला निघाले. आता ते अनाथाश्रमात जाणार होते.

पण............

म्हणतात ना, सुखाचे दिवस आले तर, कुणाची नजर लागतेच, असंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडल. 

कदाचित नियतीला शांताच हे सुख बघवलं नाही.....

   गाडी चालवताना एका वळणावर मनोहरच लक्ष थोडं विचलित झालं, आणि गाडी एका झाडावर धडकली गाडीने दोन ,तीन पलट्या खाल्या,आणि समोरच्या एक मोठ्या दगडावर जाऊन जोरदार आदळली, आणि मनोहरच डोकं स्टेअरिंग वर आदळल... खूप रक्तस्त्राव सुरू झाला, शेजारी अनु बसली होती, तिला सुधा हाताला facture, आणि ओठ फाटले, दात पडले, जबड्याला खूप मार लागला. ती पण बेशुद्ध...

 मागच्या सीटवर बसलेल्या शांता आणि रेणू ....ह्या दोघी मात्र गाडीतुन बाहेर फेकल्या गेल्या, सुदैवाने तिथं खूप गवत होत, त्यांना थोडं खरचटलं, पण facture वगैरे नव्हत.

दोघेही शुद्धीवर होत्या. रस्त्याने बरेच येणारे जाणारे होते, त्यातल्याच कुणीतरी रुग्णवाहिकेस फोन केला, अवघ्या काही वेळातच रुग्णवाहिका आली,सर्व दवाखान्यात गेले, लगेच उपचार सुरू झाले, मनोहर ला मणक्याला खूप जबर मार लागला,operation खूप क्रिटिकल होत, इकडे अनुला सुद्धा प्लॅस्टर, आणि ओठास टाके लागले होते. 

दोघेही बापलेक ऍडमिट...

छोटी रेणू खूप घाबरलेली, पण शांता मात्र खूप हिमतीने घेत होती. 

दवाखान्यातील देवीच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करीत होती, ""हे माते, का माझी इतकी परीक्षा बघतेस,

इतक्या वर्षानंतर सुख दिलंस,आणि आता परत हिरावतोस, का?? का???

पण........

कदाचित देवाच्या मनात काही वेगळच असेल..


 डॉक्टर चे खूप शर्थीचे प्रयत्न चालू होते. पण.....!

Operation नन्तर मनोहर शुद्धीवर आलाच नाही

तो कोमात गेला.... 

व्हेंटिलेटरवर च जगणं सुरू होत.

एक महिना झाला, अनु ची तब्येत आत बरी आहे, पण मनोहर.... अजूनही कोमातच...

आज सकाळी शांता त्याच्या डोक्यापाशी बसून त्याच्या केसातून हात फिरवत होती, त्याचा हात तीच्या हातात होता, तिला थोडी हालचाल जाणवली, तिने लगेच निर्सला सांगितलं, डॉक्टर आले, त्यांनि injction लावलं,त्याने डोळे उघडून शाताकडे , आपल्या लाडक्या लेकीकडे बघितलं, थोडं स्मित हास्य केलं.. काही बोलायचा प्रयत्न करतोय.... शांता खूप सुखावली..... पण......हे काय? त्याची हाताची पकड सैल होतेय, डोळे मिटतायेत...

अन लगेच त्यानें मान टाकली...कदाचित एक नजर आपल्या पत्नी आणि मुलांना बघण्यासाठीच तो शुद्धीवर आलं असावा.

डॉक्टर म्हणाले,""sorry "

शांताचा विश्वास च बसेना, ती त्याला गदागदा हलवत होती, 

मनोहर ,अहो, उठा, आपल्याला घरी जायचंय....अनाथाश्रमतली मुलं आपली वाट बघतायत....

पूर्ण जग सकाळच्या साखर झोपेत असताना, मनोहर ने या जगाचा निरोप घेतला.....अनु, रेणू आणि शांता याना परत एकदा अनाथ करून....

तिने सर्व सोपस्कार पार पाडले,

आणि तिथेच फतकल मांडून बसली, अश्रू नाहीसे झाले होते, नजर शून्यात .....

एवढ्यात अनु रेणू तिच्याजवळ आल्या,""आई, आई, बाबा कधी येतील ग,..…खूप भुक लागलीय, काहीतरी खायला दे न!

शांता एकदम भानावर आली, तिने दोघींना आपल्या कवेत घेतले,.....नाही......नाही.......

आता बिलकुल रडायचं नाही....

मला मनोहरणे जगायला शिकवलं,आता मला माझ्या आणि मनोहरची आठवण माझ्या चिमुकल्या यांच्यासाठी जगायचंय....

बरेचदा ती निराश व्हायची, पण माझ्या आई-बाबांनी जो मार्ग पत्करला(आत्महत्येचा) तो मी नाही पत्करणार..होय मी जगणार......

माझ्या मुलीसाठी....

-----------------------------------आज सोळा वर्ष झालीत,मनोहरला जाऊन, मनोहरने उभारलेल्या garage ने आज विस्तृत रूप धारण केलंय, ते शांताच्या मेहनतीने....

अणु, आणि रेणू दोघीही आज mechanical engineer झाल्या. बाबांचं स्वन त्यांनी साकारलय.

एक महिला असून सुद्धा तिने हाच व्यवसाय सुरू ठेवला...

------------------------------------

आज मनोहरची सतरावी पुण्यतिथी....

Garrage ला लागूनच सर्व प्रकारच्या गाड्यांच एक मोठं शोरूम....

आतमध्ये मनोहरचा भला मोठा फोटो, त्याला गुलाबांच्या फुलांचा हार...

आजचं विशेष म्हणजे शोरूमच उदघाटन, पण त्याहीपेक्षा विशेष म्हणजे उदघाटनाचे प्रमुख अतिथी, अध्यक्ष , उदघाटक कोणी खासदार, आमदार नसून ....अनाथाश्रमात राहून सुद्धा आपला व्यवसाय असणारी अनाथ मुलंच होती....

"(नयी सोच-----नयी राह)


(शांता ने जर खचुन जाउन ,तिच्या आईवडिलांसारखे पाऊल उचलले असतें, तर आज अनु आणि रेणू सुद्धा अनाथाश्रमात असत्या.. ..

अहो, जीवनात,चढ उतार हे येतच असतात, पण त्याला सामोरे जा!

अंधाऱ्या वाटेवरुन जाताना, समोर अंधारच दिसतो, पण जसजसे समोर जावे ,तसतसा रस्ता हा दिसतोच....तसच आयुष्याच आहे....)


माझी कथा कशी वाटली like आणि commemts करून जरूर कळवा.

आणि हो मला follow करण्यासाठी वाचत रहा माझे लेख....आवडल्यास नक्कीच नावासहित share करा


Rate this content
Log in