Priya Satpute

Romance Tragedy Others

5.0  

Priya Satpute

Romance Tragedy Others

झुंज - भाग १

झुंज - भाग १

2 mins
716


रेड सिग्नलवर थांबलेल्या गाडीतुन अजय स्वतःच्या आयुष्यातल्या ग्रीन सिग्नलची वाट बघत होता. हिरानंदानी मधून त्याची कार जणू त्याच्या भुतकाळाच्या वळणांवर पुढे जात होती, मात्र त्याच्या चेहऱ्यावर त्याच सूतमात्र देखील दिसतं नव्हतं. ना चेहऱ्यावर हास्य, ना डोळ्यात तेज, दिसतं होता तो वयाआधी पोक्त झालेला अजय. जो पेशाने सॉफ्टवेयर इंजिनियर होता, जागतिक टॉप टेन कंपनीमध्ये वर्षाला ३० लाखांच्या वर कमाई करत होता. ज्याच्या खांद्यावर संपूर्ण घरादाराचं ओझं जुंपलं होतं. आई-वडील, लग्न झालेला बिनकामाचा लहानभाऊ, त्याची बायको आणि पोर. असं इन मीन ते सात माणसांचं कुटुंब, ज्यांच्या सुखासाठी तो दिवसातले चार तास झोपून मर मर राबायचा. नागपूरच्या पुलगांव मधून अकरावीला बाहेर पडलेला अजय, डोळ्यात ढीगभर स्वप्ने घेऊन बाहेर पडला. अकरावीला मुंबई गाठलेला अजय जणू, मनाशी चंग बांधून आयुष्यातल्या प्रत्येक परीक्षेला सामोरा गेला अन एका विजयी योध्य्याप्रमाणे तलवारीच्या धारेप्रमाणे येईल त्या प्रसंगांना पुरून उरला.


अचानक धाडकन कारच्या काचेवर एक लहान मुलगी हात मारून त्याला गुलाब दाखवून मंद स्मितहास्य करून पाहत होती. अजय ने काच खाली घेऊन तिच्याकडून गुलाबाचा गुच्छ घेत तिच्या हातांवर पैसे आणि एक पुस्तक ठेवलं. तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत, "थँक यू भैया !" बोलून पुढे जात पुन्हा मागे येऊन म्हणाली, "भैया, पुस्तक पुढच्या आठवड्यात देईन, चालेल ना ?" त्यावर अजय म्हणाला, " अरे, मीरा तुझ्यासाठीच आणलं आहे ते, तुझ्याकडेच ठेव." तेवढ्यात सिग्नल ग्रीन झाला होता. नाईलाजास्तव त्याला कार पुढे न्यायला लागली. मीराच्या टपोऱ्या डोळ्यात मोठे मोठे मोती भरून आले होते हे मात्र नक्की! हात जोडून ती देवाला प्रार्थना करते, "देवा, भैयाला खूप आनंदी ठेव, हल्ली तो हसतच नाही रे!" हे बोलून ती पुन्हा त्या नव्या पुस्तकाला निहारू लागली होती. असा हा अजय, अनोळखी लोकांवर जीव लावणारा मग विचार करा, कुटुंबावर किती प्रेम करत असेल ?


कार पार्किंग मध्ये लाऊन, तो शांत बसून होता, आपसूकच फोन चेक करताना त्याच लक्ष गेलं, त्याला आलेल्या भारत मॅट्रिमोनी चॅट नोटिफिकेशन विंडो वर, इंटरेस्ट मेसेज होता, जो एका रिया नावाच्या मुलीकडून आला होता. फोटो मध्ये मुलगी सुंदर दिसत होती, त्याला साजेशी दिसेल अशी, पण त्याच्या मनात काय आलं देव जाणे, त्याने तिला रिप्लाय मध्ये लिहून टाकलं, हॅलो! मी गेले चार वर्षे एका मुलीसोबत रिलेशनशिप मध्ये होतो.

रिया - सो ? तो तुझा भूतकाळ होता.

अजय - मी तिच्यासोबत फिज़िकली इन्व्हॉल्व्ह होतो.

रिया - अच्छा.

अजय - तुला तरीही माझ्याशी बोलायचे आहे का ?

रिया - इट्स नॉर्मल, चार वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये असणारच ना!


त्याने दीर्घ श्वास घेतला, मन रीत व्हायला त्याला आज एक अनोळखी व्यक्ती समोरून साद घालत होती...



Rate this content
Log in