जेव्हा तुम्ही एखाद्याविषयी...
जेव्हा तुम्ही एखाद्याविषयी...


माणसाला प्रेरणेचे स्रोत अनेक असतात आई-वडील, शिक्षक, गुरु, सद्गुरु, ऑफिसमध्ये एखादा सीनियर बॉस, इतिहासातील प्रेरणास्थाने, तर चालू घडामोडीतीलसुद्धा एखादी व्यक्ती असू शकते. काळानुसार त्यात बदल घडू शकतो
अगदी कालचीच घटना हैदराबाद बलात्कार केसमधील आरोपींचा एन्काउंटर झाला आणि हैदराबादचे कमिशनर सज्जनार यांचेबद्दल समाजाचा बराच मोठा भाग प्रेरित झाला. त्यात मी सुद्धा आहे. खरोखर या माणसाची जिगर खूप मोठी आहे. त्यांनी केले ते बरोबरच केले असे 99 टक्के भारतीयांना वाटते याला म्हणतात झटपट न्यायदान. कदाचित माझे हे शब्द कोणाला अतिशयोक्ती वाटेल कोणाला आवडणार नाहीत तरीदेखील या देशातील लोकशाही व्यवस्थेमधील एकंदरीत न्यायदानाची व्यवस्था पाहता झाले ते योग्य झाले असे वाटते.
कारण आपल्याकडे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख या तारखांच्या पायांमध्ये कधीकधी आरोपी तर कधीकधी फिर्यादी या जगामध्येसुद्धा नसतात आणि एकंदरीत या प्रसंगांची तीव्रता हळूहळू बराच काळ गेल्यामुळे कमी होते. लोकांची त्यामागची भावनादेखील कमी होते. समाजपुरुषाची स्मरणशक्ती कमकुवत असते. शिवाय आरोपी मोकाट सुटतात त्यांना कोणाची भीती राहात नाही कारण चला न्यायदानाला अजून पंचवीस वर्षे तरी लागतील तोपर्यंत आपण मजा करून घेऊ, अशी वृत्ती राहते किंवा जरी त्यांना जेलमध्ये ठेवले तरी वर्षानुवर्षे सरकारचा खर्च वाढतो. जामिनावर सोडले तर ते पळून जातात आणि पुन्हा नवीन गुन्हे करतात. त्यामुळे या झटपट न्यायदानामुळे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, हजारो पानांचे आरोपपत्र, हजारो पानाचे निकालपत्र, दोन्हीकडचे वकील हा सर्व खर्च सज्जनार यांनी वाचवलेला आहे.
त्याहीपूर्वी वारांगल जिल्ह्यात एका मुलीवर ॲसिड फेकण्याच्या घटनेमधील तीन आरोपींना यांनी यमसदनी पाठवले आहे. त्याला म्हणतात 56 ची छाती आणि जिगर असे जर दोन-चार सज्जनार पोलीस खात्यात निर्माण झाले तर आरोपींची मुलींकडे वाकडी नजर करुन बघण्याची बिशाद होणार नाही... हा खरा सिंघम...