जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते
लॉक डाऊन चा तेरावा दिवस ६ एप्रिल 20 20
प्रिय रोजीनिशी
आज सुट्टी आहे त्यामुळे घरातच आहे महावीर जयंतीची सुट्टी आहे ज्याप्रमाणे त्यांनी शांततेचा धर्म सांगितला आहे तशी सर्व जगात शांती नांदू दे
आजचा दिवस सकाळी आरामात उठलो. तरीपण सात वाजता आमच्या डॉगीला घेऊन बाहेरून फिरून आलो. त्यानंतर ब्रेकफास्ट आणि जेवण एकच मिसळपाव. घरात बसल्या बसल्या सगळ्यांच्या जिभेचे चोचले वाढलेत ते जरा सुट्टी दिवशी पुरवते .
सकाळचे दोन तास आणि संध्याकाळचे दोन तास रामायण महाभारत. रामायणात वालीवध झाला. महाभारतात छोटे कौरव आणि पांडव यांच्यातील भांडणे चालू आहेत.
दुपारी वामकुक्षी नंतर थोडा वेळ टाईमपास आणि व्यायाम करण्यास
ाठी मोठा लेक आणि मी क्रिकेट खेळलो. त्याला आज सुट्टी आहे. छोटा अकरा वाजता ड्युटीवर गेला तो पण हेल्थ डिपार्टमेंट मध्ये असल्यामुळे त्याला कामावर जावे लागते.
मी आणि दीपक म्हणजे मिस्टर आम्ही दोघांनी थोडा वेळ रबरी बाॅलने फुटबॉल खेळलो.
मुंबईत आता गुणाकार पद्धतीने कोरोणाचे रुग्ण वाढू लागले आहेत त्यामुळे काळजी वाटते.
आज मोठ्या बहिणीचा गावाकडून स्वतःची काळजी घेण्याविषयी कोणाला फोन आला तसेच आता मुंबईमध्ये कोरोणा जास्त वाढत आहे तू हाय रिस्क मध्ये आहे तरी कामावर जाऊ नको असे तिने सांगितले.
संध्याकाळच्या जेवणात साधीशी खिचडी. रामायण महाभारत संध्याकाळचे दोन तास छान जातात शेवटी आता झोपताना रोजीनीशी.