जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजनिशी
आज कामावर जायचे होते त्यामुळे सकाळी लवकर उठून चपात्या भाजी केली. बाहेर अजून जैसे थे वातावरण आहे. म्हणजेच गाड्या खाली, आयडी बघितल्याशिवाय कंडक्टर बसमध्ये घेत नाही. कामावर अजूनही तणावपूर्ण वातावरण आहे आमच्या येथे दोन डॉक्टरांना होम क्वारंटाईन केले आहे. कारण त्यांचा पॉझिटिव रुग्णांशी डायरेक्ट संबंध आला होता. आज आमच्या सरकारी क्वार्टर्स खाली असल्यामुळे
क्वारंटाईन पेशंटला ठेवण्यासाठी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यात आज बारा रुग्ण ठेवलेले आहेत. आता सगळी मंडळी पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टीव इक्विपमेंट आठवणीने वापरतात. मी कामावर गेले की एक हलकफुलकं वातावरण तयार करते, सर्वांना धीर देत असते. बाकी नवीन विशेष काही नाही.
आज हनुमान जयंती. येता येता रस्त्यामध्ये एक इच्छापूर्ती हनुमान मंदिर आहे त्याचे दर्शन घेतले. हनुमंताला प्रार्थना केली... बा मारुतीराया तुला काहीही अशक्य नाही. या कोरोनारुपी संकटाचा नाश कर...
संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीवर रामायण, महाभारत बघितले. रामायणात आज सीतेचा शोध लागलेला आहे तर महाभारतामध्ये सर्व राजकुमार यांची शस्त्रपरीक्षा झाली. परत संध्याकाळी पोळी-भाजी इत्यादी... पण घरातील मंडळी सर्व गोष्टींना मदत करतात. साठ किलोमीटरचा प्रवास जेवणखाण आणि रोजनिशी... गुड नाईट