जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


लाॅक डाऊन चा आठवा दिवस
आज कामाला सुट्टी आहे घरातच आहे पण मग घरातले नाश्ता वेगळा जेवण वेगळे इत्यादी गोष्टी चालूच राहतात त्यातच सकाळी दोन तास , व संध्याकाळी दोन तास रामायण आणि महाभारत याच्यामध्ये जातात. आमच्या घरात आम्हा सर्वांना या सीरिअल बघण्यास आवडतात ती आपल्या देशाची संस्कृतीक धरोहर आहे मुलांना माहित झालीच पाहिजे.
आज नवीन गोष्ट म्हणजे मोठा मुलगा आणि मी सकाळी -सकाळी टेरेसवर जाऊन दोघांनी व्यायाम केला. धावणे, दोरी उड्या ,आणि बॉक्सिंगची किट वर टेरेसवर नेली होती. तिथे त्याने मला बॉक्सिंगचे चार हात शिकवले. काहीतरी नवीन बाकी सकाळी नाष्टा, जेवण, वामकुक्षी, उठल्यावर करोना विषयी बातम्या .
अजून एक नवीन गोष्ट जाणवली म्हणजे सोसायटीमध्ये संध्याकाळी एकदम शांतता असते. इतर वेळी लहान मुले खेळत असतात गोड शब्दात त्यांची किलबिल म्हणा नाहीतर दंगा म्हणा ओरडाआरडा चालू असतो बराच वेळा त्याचा त्रास होतो पण आता सारेच एकदम शांत आहे म्हणजे आई वडील काय करतात मुलांना खेळायला पाठवतात, आणि जे संध्याकाळी सातच्या आत घरात अशी गोष्ट असते ती केव्हाच कालबाह्य झालेली आहे. दिवेलागण झाल्यावर हात-पाय धुऊन देवाला दिवा लावून शुभंकरोती आणि मग अभ्यास असे काही नाही .आता ही मुले रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत खालीच खेळत असतात त्यामुळे आता घरात आई वडिलांना किती त्रास देत असतील देव जाणे असो आमच्या डोक्याला मात्र सध्या शांतता आहे