Jyoti gosavi

Others


4.0  

Jyoti gosavi

Others


जेव्हा सारे जग ठप्प होते

जेव्हा सारे जग ठप्प होते

1 min 11.6K 1 min 11.6K

लॉक डाऊन सेकंड

26 एप्रिल 2020


प्रिय रोजनिशी,

आज खूप दिवसातून लिहिते मध्यंतरी तोचतोचपणा लिखाणात आणि कामात आला होता. त्यामुळे काही विशेष लिहिले नाही.


आज अक्षय्य तृतीया, त्यातून रविवार. खूप लोकांचे आज शुभमंगल सावधान होणार होते परंतु, या कोरोनामुळे सगळे बेत फिस्कटले.


28 वर्षापूर्वी याच मुहूर्तावर आमच्या दोघांचे लग्न लागले. तिथीनुसार आज 28 वर्षे झाली. आयुष्यातली एवढी वर्षे किती भरकन गेली, ते समजलेदेखील नाही.


रविवार असल्यामुळे घरातच आहे. सकाळी उठून नेहमीप्रमाणे आमच्या ब्रुनोला फिरवून आणले. त्याची तब्येत आज नरम-गरम आहे. त्याने खूप द्राक्षे खाल्ली असल्याने थोडी टॉक्सीसिटी झाल्यासारखे वाटते.


आल्यावरती माझा आवडता वर्षानुवर्षे बघत असलेला कार्यक्रम रंगोली बघितला, पण नंतर वेळ काढला नाही. लगेच अंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागले. आजचा बेत श्रीखंड-पुरी, कैरी डाळ, पन्हे, कटनी भाजी, कोशिंबीर, उन्हाळा असल्यामुळे तळणीच्या पदार्थांना बाॅयकाॅट. आज पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. शेतामधून आलेले सर्व नवीन धान्य घेऊन आजचा स्वयंपाक करायचा असतो व ज्या धरणीमातेने आपले भरणपोषण केले तिची कृतज्ञता म्हणून नवीन अन्न एका मातीच्या छोट्या मडक्याला चुना लावायचा. त्याला ढवळ असे म्हणतात. त्यात सर्व नैवेद्य भरायचा आणि शिवारामध्ये आपल्या शेतात देऊन यायचा.


आज साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त इतर दिवशी आजच्या तारखेला सराफा बाजार फुललेले असतात. पण यावेळी सगळा शुकशुकाट. खूप दिवसांनी चौघेजण पत्ते घेऊन खेळायला बसलो. मेंढीकोट खेळला बाकी मग चार तासाचे रामायण-महाभारत आहेच.


रामायण आता उत्तर रामायण सुरू झालेले आहे आणि महाभारतामध्ये बृहन्नडेने उत्तरला बरोबर घेऊन सर्व कौरवांचा पराभव केला आहे. एकंदरीत आजचा दिवस सर्व कुटुंबीयांसमवेत समाधानाचा आनंदाचा गेला.


Rate this content
Log in