Jyoti gosavi

Others

3.5  

Jyoti gosavi

Others

जेव्हा सारे जग ठप्प होते

जेव्हा सारे जग ठप्प होते

1 min
2.8K


प्रिय रोजनिशी


आज एक मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. या वर्षे लाॅकडाऊनमुळे झेंडावंदन फक्त जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. सकाळी उठून आमच्या ब्रुनोला फिरवून आणले. सकाळचा ब्रेकफास्ट चहा-ब्रेड वरती भागवला .आज जेवणाला स्पेशल मेनू होता. सीझनचा पहिला आमरस आज खाल्ला.अठरा वर्षांपूर्वी आजच्या तारखेला मुलांच्या मुंजी झाल्या होत्या त्यानिमित्ताने आणि सर्वजण एकत्र असल्यामुळे स्पेशल मेनू केला. आम्रस, पुरी, चटणी ,मटर पनीरची भाजी, वरण-भात असा शाही बेत होता.

दुपारी वामकुक्षी संध्याकाळी पुन्हा एकदा फिरून आलो.


सध्या आमच्या सोसायटीनेदेखील कडक नियमावली केलेली आहे. त्यानुसार इस्त्रीवाला, लॉन्ड्रीवाला, पाववाला कोणालापण आत एन्ट्री नाही. कॉम्प्लेक्सचे मोठे गेट लावलेले असते. शेजारी असणारे सुपरमार्केट व प्रिमायसेसमध्ये बसणारे भाजीवाले सर्व बंद आहेत. मुंबईत आणि भारतात कोरोना वेगाने वाढत आहे मृत्यूची संख्या एक हजाराच्या वर कालच गेलेली आहे. सर्वत्र लोकांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे. बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे घरी आल्यावर हॅन्ड वॉश करणे नियमितपणे चालू आहे.


रामायण आणि महाभारत दोन्ही अंतिम टप्प्यात आहे. महाभारतामध्ये आज युद्धाचा ऐलान झाला. उद्यापासून युद्ध सुरू होईल. बरोबर अठरा भाग शिल्लक आहेत.

रामायणामध्ये उद्या शेवटचा भाग आहे. आज लव-कुश आयोध्येमध्ये येऊन रामापुढे गीतगायन करीत आहेत. आज पुन्हा दोन आठवड्याचे लाॅकडाऊन वाढवले आहे.

मी कामावर जात आहे. पण यांना घरात बसून कंटाळा आलाय. कधी एकदा लाॅकडाऊन उठतो असं त्यांना झालंय.


Rate this content
Log in