जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजनिशी,
आता जरा हळूहळू लाॅकडाउनची सवय झालीये, आणि बंदोबस्तही कडक झाला आहे. ठिकठिकाणी रस्त्यावरती खुर्च्या टाकून बसलेले पोलिस दिसतात व पोलीस गाड्या दिसतात बॅरिकेड्स लावून रस्ते छोटे केलेले आहेत.
दिवसेंदिवस मुंबईतला कोरोनाचा आकडा वाढत आहे मनात एक प्रकारची धास्ती वाटते. एक प्रकारच्या भीतीखाली, तणावाखाली सारेजण जगत आहेत. आमच्या चौकोनी कुटुंबापैकी दोन कोन कामावर जातात आणि दोन जण घरात असतात. त्याचा संध्याकाळी चौकोन बनतो. घरातल्या मंडळींचे चार तास रामायण आणि महाभारत बघण्यात जातात. आमचे मात्र मिस होते याचे वाईट वाटते. हॉस्पिटलमध्ये आता सर्दी आणि तापाचे रुग्ण वाढलेले आहेत म्हणजे थोडं जरी काही झालं तरी लोक घाबरून हॉस्पिटलला येतात. आज लहान मुलांचे व्हॅक्सिनेशन होते. आम्हाला वाटले होते कोणी येणार नाही. तरी दहा-एक मुलांना त्यांच्या आया घेऊन आल्या. इतर इमर्जन्सी आणि डिलिव्हरी चालू आहे. त्यासाठी वार्ड बंद करता येत नाही. मात्र संध्याकाळी आजचा दिवस संपला गड्या हुशश् ! असं होतं.