जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


लोक डाऊन चा एकोणिसावा दिवस
प्रिय रोजीनिशी
आज लोक डाउनचा एकोणिसावा दिवस, आता दिवस कंटाळवाणे झालेले आहेत, लोकांना असे झाले आहे की कधी एकदा एकवीस दिवस निघतील आणि आता तर अजून पंधरा दिवस वाढवले.
माझे यजमान घरात बसून खूप कंटाळले आहे त्यांना कधी अशी घरात असण्याची सवय नाही. सुट्टी दिवशी पण घरात काही ना काही काम काढून ते करत असतात, तरी बरं आम्ही सकाळी एकदा फिरून येतो. आजचा दिनविशेष म्हणजे आमचा नगरसेवकांने भाज्यांची पाकीट मागवली. त्यामध्ये दोन किलो कांदे ,दोन किलो बटाटे, अर्धा किलो सिमला मिरची, अर्धा किलो साधी मिरची, एक कोबी, एक किलो टमाटे असा एकंदरीत पॅक शंभर रुपयांमध्ये कॉम्प्लेक्समधील सर्वांसाठी मागवला.
काल रात्री दीड वाजता मी अचानक खडबडून जागी झाले, कशाने झाले माहित नाही. पण एकदमच सध्या चालू असलेल्या कोरोना विषयाचे टेन्शन आले.
मनात आले मी पण कामावर जाते. मिस्टर पण काहीना काही आणण्यासाठी मार्केटला जातात , दूध आणतात आणि आणलेल्या वस्तू आपण लगेच घरात घेतो, त्यामधून आपल्याला देखील इन्फेक्शन होऊ शकते.... एकदा का असली शंका डोक्यात आली की त्याचे निराकरण झाल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही. मिस्टरांना उठवले आणि या विषयावरती मला टेन्शन म्हणून सांगितले. मग त्यानी समजूत घातली तेव्हा कुठे झोप लागली.
बाकी रोजचे रुटीन सेम सेम सकाळी कुत्र्याला फिरवून आणणे, येताना दूध घेऊन येणे मग रोजच घरातील जेवण खाण.
दुपारी वामकुक्षी, त्यानंतर घरातल्या घरात योगा, व्यायाम प्रकार, छोटासा बाॅल घेऊन खेळणे. इत्यादी शिवाय चार तासाचे रामायण महाभारत.
रामायणामध्ये राम रावण युद्धला सुरुवात तर महाभारतामध्ये लाक्षागृहा चे प्रकरण व भिमाचे हिडींबेशी लग्न.
असे एकंदरीत आजचा दिवस समाप्त