जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते
प्रिय रोजीनिशी
आजदेखील मला कामावर सुट्टी आहे. रात्री डोसासाठी पीठ भिजत घातलेले. सकाळी नाश्त्यासाठी कुरकुरीत डोसे केले. दोन्ही टाईमच्या चपात्या एकदाच करून घेतल्या. कारण सध्या खूप गर्मी वाढलेली आहे स्वयंपाकघरात घामाच्या धारा लागतात. सध्या चौघेही घरात आहोत. छोट्या मुलाला एक आठवडा सुट्टी दिलेली आहे. त्यांच्याकडे कामाच्या दोन बॅच केलेल्या आहेत. बायचान्स एखादा रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तर अर्धी बॅच क्वारंटाईन होईल तर अर्धी बॅच काम करेल. पुढच्या आठवड्यात तो कामावरच राहायला जाणार आहे. बाकी रोजचे रुटीन नेहमीसारखे...
सकाळी ब्रुनोला फिरवून आणणे, आल्यावर ब्रेकफास्टसोबत रामायण आणि दुपारच्या जेवणासोबत महाभारत... रामायणात आज कुंभकर्णाला
झोपेतून जागे केले व लढाईच्या मैदानावर कुंभकर्ण आलेला आहे तिकडे महाभारतामध्ये आज द्रौपदी स्वयंवर दाखवले. आज सगळे जुने अल्बम बघायला काढले. आई-वडील सासुबाई मुलांचे लहानपणाचे फोटो आणि त्याबरोबर प्रत्येक प्रसंगाच्या आठवणी... आमचे लग्न, मुलांची बारशी, मुलांच्या मुंजी... छोट्या मुलाला मुलीचे कपडे घालून भागवलेली मुलीची हौस
माझ्या कामावरील कार्यक्रमाचे फोटो, माझे काव्य मंडळातील फोटो, पथनाट्याचे फोटो... गेल्या दहा वर्षांत बऱ्याच ठिकाणी पर्यटन झाले. त्या त्या सर्व ठिकाणचे फोटो आणि आठवणी मनापासून एन्जॉय केल्या.
परत संध्याकाळी एक तास रामायण-महाभारत... टाइमपाससाठी कॅंडी क्रश गेम, मोबाईल बघणे या सर्व गोष्टीत दिवस कसा गेला कळले नाही. संध्याकाळी रोजनिशी.