जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजनिशी,
आज सेकंड सॅटर्डे आहे त्यामुळे मला सुट्टी आहे तशी आता जोडून पाच दिवस सुट्टी आलेली आहे. इतर वेळी जशी जशी सुट्टी संपत येते तसतसं जीवाला हुरहूर वाटते, पण आता घरात बसून देखील जीवाला हुरहूर वाटते कधी कामावर जाऊ असे होते. आज चतुर्थी आमच्या घरात सर्वांचा उपवास असतो. गणरायाला सकाळी उठल्या -उठल्या साकडे घातले बाबा रे तू विघ्नहर्ता आहेस तेव्हा आता आमच्या देशावर आलेले हे कोरोनारुपी संकट दूर कर. तरी आम्ही दोघे जण एकदम घराला चिटकून बसत नाही सकाळी आमच्या भुभुला फिरायला न्यायचे असते. त्यानंतर घरी आल्यावर रामायण
मिस्टर आज मार्केटला गेले तेथे शाबुदाणा गायब, उडदाची डाळ गायब, मुगाची डाळ गायब, जे पाहिजे ते मिळालेच नाही शिवाय सकाळी सहाला मार्केट सुरू होते आणि दहा वाजता बंद. त्यातुन पोलिसांची मनमानी जरा पब्लिक दिसले की मार्केट बंद. त्यापेक्षा माननीय मोदी साहेबांनी, उद्धव साहेबांनी ,दहा दिवस अगदी कडकडीत बंद पाळावा भाजी, मार्केट, दुध, किराणा सगळे काही बंद करावे. रोडवर फक्त पोलीस गाड्या आणि अंबुलन्स एवढेच धावतील असे केले तरच ही साखळी तुटेल. त्यात दुपारच्या बातम्या मध्ये डाऊन ची मुदत वाढवण्यात आली आहे आता 30 एप्रिल पर्यंत लाॅकडाउन ठेवणार आहे. घरात बसून बसून लोकांना मनोविकार तज्ञ म्हणजेच सायकॅट्रिकची गरज भासणार आहे
आदिमानव काळात माणूस टोळ्या बनवून राहत असे तो समाजप्रिय प्राणी आहे एकटा राहू शकत नाही. नशीब आत्ताच्या काळामध्ये आपले सुख-दुःख शेअर करायला मोबाईल आहे सोशल मीडिया आहे नाहीतर टीव्ही तरी किती पाहिला असता
नेहमीप्रमाणे टीव्ही वरती एकूण चार तास रामायण आणि महाभारत रामायणामध्ये रामाने सेतू बंधन करून लंकेला पोहोचलेला आहे तर महाभारतामध्ये पाचही पांडव कुंती बरोबर वारणावत येथे गेलेले आहेत. आज घरात सकाळचा ब्रेकफास्ट नव्हताच दुपारी वरीचे तांदूळ आणि काकडीची कोशिंबीर संध्याकाळी नैवेद्याला चपाती खिर डाळ भात आणि बटाट्याची भाजी. दोन दिवसापासून मोठ्याची कॉम्प्युटर मध्ये सिस्टीम बंद आहे त्यामुळे त्याच्यावर फ्रॉम होम सध्या बंद आहे. छोटा सध्या सेकंड शिप करतो बाकी आम्ही तिघे घरात आहे. देशातील आणि मुंबईतील कोरोनाचा वाढता आकडा पाहून टेन्शन वाढते.