जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते
प्रिय रोजीनिशी,
आज आंबेडकर जयंतीची सुट्टी आहे त्यामुळे मी घरीच आहे आज जर खरोखरी लाॅक डाउन चा शेवटचा दिवस असता तर खूप आनंद झाला असता. एकवीस दिवस संपले पण लॉक डाऊन चालूच आहे आता तीन मे पर्यंत मुदत वाढवलेली आहे.
आता रोज रोज काय लिहायचं तीच ती दैनंदिनी लिहून आणि करून कंटाळा आला.
माणसाला नेहमी नेहमी आयुष्यात काहीतरी वेगळं थ्रिल पाहिजे असतं. तोचतोचपणा आला की कंटाळा येतो सुरुवातीला सर्वांना छान वाटले असेल चला सुट्टी मिळाली पण आता मात्र अशी 24 तास घरात कोंडलेली सुट्टी नकोशी झालेली आहे.
त्याबाबतीत मी सुदैवी.
मी कोरोना वाॅरियर आहे. जरी धोका असला तरी माझ्या कामात थ्रिल आहे.
दिवसभरात सकाळी आमच्या ब्रुनोला घेऊन मॉर्निंग
वॉक, घरी आल्यावर नाष्ट्या सोबत रामायण, दुपारच्या जेवणाबरोबर महाभारत. आज रामायणामध्ये अतिकाय, अकंपन रावणाचे चार मुलगे आणि एक सेनापती त्यांचा वध केला तर, महाभारतामध्ये द्रौपदीचा पाची पांडवांशी विवाह करून तिला सासरी पाठवलं.
आज नाष्टा कम जेवण एकच वडापाव.
खूप दिवस झाले लाॅक डावून मुळे चटक-मटक खाल्ले नव्हते. वडापाव हा मुंबईकरांचा वीक पॉइंट ,जसा कावळा सकाळी उठल्यावर "काव काव" म्हणतो तसा मुंबईकर वडापाव वडापाव म्हणतो. त्यामुळे आज घरची मंडळी देखील खुश
आता उरलेल्या लाॅक डाउन मध्ये थोड उन्हाळी काम करायचं ठरवलं आहे .सांडगे मिरचीचं लोणचं इत्यादी बाकी मोबाईल सोशल मीडिया नातेवाईकांचे फोन इत्यादी गोष्टी चालूच आहेत आणि संध्याकाळी आठवणीने रोजनिशी