जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजीनिशी
आज कामावर सुट्टी घेतली. सकाळी उठताना कालच्या दिवसाचे टेंशन होते, पण सकाळी उठल्यानंतर जरा छान वाटले. घसा देखील नॉर्मल झाला. मग असे वाटले की, काल संध्याकाळी उगाचच टेन्शन घेतले.
सकाळी नाश्त्याला उपमा केला त्याच्याबरोबर ती अर्थात रामायण, राम- रावण युद्ध अंतिम टप्प्यात आहे.
दुपारच्या जेवणाला साधा घरगुती बेत, पोळी भाजी भात आमटी त्याच्या सोबतीला महाभारत. त्यामध्ये युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञा साठी तयारी चालू आहे.
उद्यापासून छोटा सात दिवसांसाठी हाॅस्पिटलला जाऊन राहणार आहे. सात दिवस त्याला सुट्टी होती आता तो सात दिवस कम्प्लीट कामावर असणार आहे.
काल चौघेजण बसून पत्ते खेळ खेळलो, खूप दिवसांनी मेंढीकोट त्यालाच दश्शीकोट असे म्हणतात. त्यामध्ये आम्ही दोघे पार्टनर आणि मुले दोघे एकमेकाचे पार्टनर पण आम्ही म्हाताऱ्यांनी तरुण पिढीला हरवले.
हवे मध्ये उन्हाळा फारच वाढलेला आहे.
त्यातून मुंबईची गर्मी म्हणजे घामाच्या धारा घरातील एसी एकदम कमी कुलिंग करतोय . पण आता लाॅक डाऊन उठल्याशिवाय टेक्निशियन येणार नाही.
माझा दात देखील गेल्या आठवड्यापासून दुखतोय पण प्रायव्हेट डेंटिस्ट बंद इतकेच काय पण आमच्या हॉस्पिटलच्या डेंटिस्ट देखील बंद आहे. त्याबाबतीत रुग्णाची जवळून संबंध येत असल्याने सदर डिपार्टमेंट बंद केले आहे.
सध्या गोळ्या खाऊन दिवस ढकलत आहे
दुपारी थोडी वामकुक्षी त्यानंतर व्यायाम, प्राणायाम, श्वासाचे प्रकार इत्यादी
पुन्हा संध्याकाळी दोन तास रामायण महाभारत
रात्रीचे जेवण रोजनिशी
आणि गुड नाईट