जेव्हा सारे जग होते
जेव्हा सारे जग होते


लॉक डाऊन नंतर चा नववा दिवस
प्रिय रोजीनिशी,
आज सुट्टी आहे. रामनवमी आहे .सकाळी उठल्याउठल्या श्रीरामाला प्रार्थना केली.
"रामराया "सगळ्या भारत "भु" वरती तुझी कृपा राहूदे. या देशावर आलेल्या कोरोना रुपी संकटाचा नायनाट कर. त्याचा मुकाबला करण्याची आम्हाला शक्ती दे आणि सर्व लोकांना सुबुद्धी दे.
दुपारी रामाला नैवेद्य दाखवला. राम जन्म केला.
रामायण बघितले, महाभारत बघितले.
मला वाटले होते आज रामायण दाखवताना राम जन्माचा एपिसोड दाखवतील पण त्यांनी तर दशरथाच्या अंतयात्रेचे एपिसोड दाखवला . तिकडे महाभारतात मात्र कृष्ण जन्म झाला. दुपारी थोडीशी वामकुक्षी ,पुन्हा संध्याकाळी रामायण-महाभारत "रामनवमीच्या" निमित्ताने नऊ दिवे खिडकीमध्ये लावले. आमचा एक डॉगी आहे त्याला मात्र एकदा तरी बाहेर काढावेच लागते अर्थात सर्व काळजी घेऊनच काढतो. तेही कॉम्प्लेक्स मधल्या कॉम्प्लेक्समध्ये असो लाॅक डावून चा नववा दिवस सुफळ संपूर्ण