Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Hanamant Padwal

Others


5.0  

Hanamant Padwal

Others


इतिहासाचे मूक साक्षीदार गडकिल्

इतिहासाचे मूक साक्षीदार गडकिल्

3 mins 794 3 mins 794

माझे स्वरयंत्रही शेवटची हाक देऊन बंद पडावे आणि माझ्या हाकेने गगनालाही छेद जावाआणि तुमच्या कानाच्या पडद्याचे कंप उठावेत. ते कंप तुम्हाला खडबडून जागे करतील. आणि तुम्ही आता तरी सावध व्हावे ही माझी मनोमन इच्छा आहे. दरी खोऱ्यामधून हर हर महादेवचा जयघोष गुंजत माझ्या भक्कम तटावरती मावळ्यांचा आवाज धडकत असायचा.आजही त्याच आठवणीँनी फुलून येतो. अभिमानाने माझा ऊर भरून येतो. पण तुम्ही एवढे थंड रक्ताचे कसे काय झाला हे मला न उलगडणारे कोडे आहे .अशिक्षित असणारी मुले एकत्र करून त्यांना मावळे बनवणारा राजा आणि त्याचे वंशज म्हणून घेणारे आपण. आज कुठल्या दिशेने जातआहोत. छत्रपतींच्या काळात निष्ठा म्हणजे काय असते हे अनेक मावळ्यांनी अनेकदा दाखवून दिले आहे .परंतु आज निष्ठा हा चेष्टेचा विषय होऊन बसला आहे. आणि एका दिवसामध्ये तीन रंग धारण करणारी निष्ठा जन्माला आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेला सह्याद्री आठवतोय तुम्हाला..? महाराष्ट्राचे निसर्गसौंदर्यामध्ये भर घालणारा हा सह्याद्री आजही मोठ्या थाटात उभा आहे .छत्रपतींच्या आठवणी जागवत तुम्हाला सौंदर्याचं दान देत उभा आहे. अनेक भुईकोट किल्ले आणि अभयारण्यांमध्ये रमलेला सह्याद्री तुम्हाला माहित आहे काय? मुशाफिरी करायला मोठ्या थाटाने तुम्ही निघतात परंतु आयत्या आणि रुळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा गडकोटावर जाताना कधी त्याही वाटेचा आपण वापर केला आहे काय.....? नाही करणार कारण तुमच्या मध्ये ती धमक आता उरली नाही .अरे आठवा ते मावळे आणि राजे शिवाजी किती कष्ट घेतले असतील त्यांनी या किल्ल्यासाठी ,किती यातना भोगल्या असतील त्यांनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आज आपण याच स्वातंत्र्यामध्ये स्वैराचाराने वागत आहोत .असे तुम्हाला वाटत नाही का? माझ्या भक्कम तटांमध्ये सुरक्षित राहत नाही तुम्ही ?परंतु त्याच ताटाचा उपयोग आडोसा म्हणून करता तुम्ही. मद्यप्राशन करून तुम्ही झिंगलेल्या अवस्थेत येतात आणि मला कल्पना आहे झिंगल्याशिवाय तुम्हाला माझ्या खांद्यावरती खेळतही येत नाही.आणि तुमचे ते खेळले आहे काय..  निव्वळ मूर्खपणा आणि अल्लडपणा. खरंतर अल्लडपणा नव्हे ,तुमचा तो मूर्खपणाच आहे .स्वराज्यासाठी मावळ्यांनी आपल्या देहाची आहूती दिली .रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली.या किल्ल्यावर तुम्ही हौस आणि मौज करण्यासाठी झिंगत येता हे मला अजिबात पटत नाही. महाराजांनी येवढ्या दुर्गांची निर्मीती आणि रक्षण केलं आहे .परंतु त्यांनी दुर्गावरती छत्रपती शिवाजी महाराज अशी पाटी लावली नाही किंवा मोठा बॅनर ही दिसत नाही. पण आपण याच किल्ल्यावरती मौज मस्ती करत असताना अश्लीलतेच्या रंगरंगोटीने चीरे रंगवत असता. आज अगदी सुलभतेने तुम्ही माझ्या जवळ पोहोचू शकता अरे यात माझी म्हणजे राजगडाची महती तुम्हाला माहिती आहे काय घनदाट अरण्याने वेढलेला मी होतो वाऱ्याशिवाय कोणीही पोहोचु शकत नव्हता. पावसालाच फक्त माझी वाट सापडावी एवढ्या घनदाट अरण्यात उभा होतो. मी मुरुमदेव नावाने माझी ओळख होती. राजधानीचा दर्जा मला मिळाला आणि मी पावन झालो.ज्या गडकिल्ल्यांवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची सुरुवात केली त्या गडकोट किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट झाल्याची पाहून वेदना होतात.पुराणकाळापासून आपल्या कडे किल्ले आहेत..लाला लक्ष्मीधराने देवज्ञविलास या ग्रंथात किल्ल्यांचे आठ प्रकार सांगितले आहेत........

प्रथमं गिरीदुर्गंच , वनदुर्गं द्वितीयकम् 

तृतीयं गव्हरं दुर्गं, जलदुर्गं चतुर्थकम् 

पंचमं कर्दमं दुर्गं, षष्ठं स्थान्मिश्रकं 

सप्तमं ग्रामदुर्गं स्यात कोष्टदुर्गं तथाष्टकम् 

                - देवज्ञविलास, लाला लक्ष्मीधर

अरे मीच इतिहासजमा झालो असताना आणखी खोलात का घेऊन चाललोय तुम्हाला...माझे मलाच कळले नाही. मित्रांनो,मी अचाट शक्तीचे आणि पराक्रमाचे प्रतिक पुजावेत असे योद्धे पाहिलेत,ऐकलेत.सिंहासारखा ताना,निधडा बाजी.... किती आणि कोणाची नावे घेऊ. स्त्री समानतेच्या गप्पा आज ऐकतो, आणि मग पुन्हा उमाळा दाटून येतो आणि माझा राजा मला आठवतो, रायगडावर हिरकणीचा केलेला सन्मान, सुभेदाराच्या सुनेप्रती दाखवलेला शिष्टाचार सारं सारं डोळ्यांपुढे तराळत राहते. आणि मुक्या मनानं अंगाखांद्यावरच्या ढासळत चाललेल्या एकेका चिऱ्याकडे स्वतःचाच जणू पराजय झालाय अशा नजरेने पाहत असतो. भूतकाळातुन कांही शिकून वर्तमान चाललो तर भविष्य सुकर होईल हे मी तुम्हाला सांगावे...?असो माझा शेवटचा चिरा ढासळे पर्यंत मी अभिमानाने मुका साक्षीदार म्हणून उभा असेन.हे गीत गुणगुणत.....

युगानंतर युगे युगे

आठवेल तुला राष्ट्र

सह्यगिरी सांगेल कथा

आणि मुजरा करेल महाराष्ट्र....!!

पुण्यप्रतापी शिवछत्रपती

पावन झाली इथली माती

गीत महतीचे खडकामधुनी

गाती कालची गवतपाती....!!

धैर्य तुझे शौर्य तुझे कावा तुझा

वंद्य वंद्य छावा तुझा....

नीतीन्यायाचा आदर्श तू

अन् कणाकणाचा हर्ष तू....!!

नर नारी वा असो कृषक

तूच तयाचा वाली नि रक्षक

तुझ्या भरोसी भाग्य उजळले

तुज देखता जीवन कळले...!!

-हदयाठायी तुझे वसणे राजा

रोज अंतरी तुझी बांदतो पूजा

देव नाही परी दैवत माझे

मनमंदिरी असणे साजे..!!

   राजाच्या पराक्रमाने सळसळणारे रक्त ऱ्हदयात असेल तर माझे हे मुके शब्द तुमच्या पर्यंत पोहतीलच आणि तुम्ही माझी कथा जाणून व्यथाही समजून घ्याल या आशेवर पुन्हा गप्प होतो.........

     


Rate this content
Log in