IPS रागिणी..
IPS रागिणी..


कोवळ्या वयात अत्याचार झाले.. तिच्या शरीरावर.. तिच्या मनावर.. दुःख याचं नव्हतं तिला की परक्याने चुरगाळलं.. दुःख तर याच होतं की आपल्यांनी नाकारलं.. सगळीकडे पसरलेला अंधार आणि डोळ्यात पाणी घेऊन तिने गाव सोडलं..
ती दुसऱ्या गावाला आली.. नव्याने अस्तित्व शोधायला.. रात्रीच्या रात्री जागून ती अभ्यास करत राहिली.. परीक्षा देत राहिली.. उत्तीर्ण होत राहिली..त्याच बरोबर तिने कणखर बनवलं स्वतःच मन आणि शरीरही.. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी सगळ्यात उत्तीर्ण झाल्यावर तिची मुलाखत घेतली गेली आणि मग तिचं पोस्टिंग झालं ते परत तिच्याच गावात.. नियतीने आपला फेरा पूर्ण केला होता..
आज तिने कितीतरी वर्षानंतर तिच्याच गावात पाय ठेवला होता.. सोबत एक नवीन ओळख घेऊन.. IPS रागिणी.. एकेकाळच्या तिच्या डोळ्यातील पाण्याचे तिच्या जिद्दीने आणि कष्टाने मोती झाले होते..