दिपमाला अहिरे

Children Stories Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Children Stories Inspirational

हवेतील प्रदुषण (लघुकथा)

हवेतील प्रदुषण (लघुकथा)

1 min
210


आनंदराव गेल्यावर आपले मन गुंतून ठेवण्यासाठी सुधाताई भजनी मंडळात जात असत , वाचनात मन रमवत,नातवंडांमध्ये खेळण्यात आपला वेळ घालवत असतो.तसेच त्यांनी घराचा टेरेस जो इतके दिवस मोकळा होता.तिथे सुंदर बाग बनवली.एक एक करुन

वेगवेगळ्या फुलांची रोपे, कडीपत्ता ,मनीप्लांट सारखी सुंदर झाडे तिथे वाढवली.त्या रोजच त्या झाडांशी गप्पा मारत बसायच्या.तेथील चिमण्यांचा चिवचिवाट,फुलपाखरे हे सर्व त्यांना आनंद देत असे.

आजीची ही सुंदर बहरलेली बाग पाहून नातीला खूप आनंद झाला.ती सुद्धा आजीला मी रोपांना पाणी घालते म्हणत मदत करत असे.

आजीने नातीला झाडांचे महत्त्व सांगितले आपल्याला जगण्यासाठी प्राणवायू ची गरज असते. हल्ली वाढलेल्या गाड्या, त्यांच्यापासून निघाणारे दुर, वेगवेगळ्या कंपन्या त्यांच्यामुळे वाढणारे हवेतील प्रदुषण या मुळे हवेतील प्राणवायू चे प्रमाण कमी होते आहे... आपल्याला शुद्ध हवा मिळावी, निसर्गाचे संवर्धन व्हावे म्हणून आपण झाडे लावली पाहिजेत.

त्यांची काळजी घेऊन ती जगवली पाहिजे.. म्हणून बाळा वर्षाकाठी एक तरी रोप लावलेच पाहिजे.. ज्यामुळे हवेतील प्रदुषण कमी होण्यास थोडीफार का होईना पण मदत नक्कीच होईल...


Rate this content
Log in