गुरूंचे महत्त्व
गुरूंचे महत्त्व


"गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला
म्हणुनी गुरु पाहिजे तर साधकाला
गुरुचे घराणे असावे समर्थ
म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ"
अशा शब्दांमध्ये समर्थ रामदासांनी गुरूंचे महत्त्व विशद केले आहे. तुमचे आईबाप प्रत्येक जन्मात वेगळे असू शकतात ,पण गुरु मात्र जन्मोजन्मी एकच असतो. मनापासून ध्यास घेतला तर कोण्या एका जन्मात तो तुम्हाला नक्की भेटतो.
मी 21 वर्षे मनोरुग्णालयात काम केले त्यातील एक मोहिनी चांदवानी नावाची मनोरुग्ण मला गुरु मानायची, माझ्या डोक्यावर फुले ठेवून माझी पूजा करायची, पाया पडायची, त्यावर इतर सर्वजण तिला व मला हसायचे त्यामुळे एकदा रागाने मी तिला झिडकारले आणि एका मनोरुग्णाने मला वरील तत्वज्ञान शिकवले माँ बाप हर जनम मे बदलते है /लेकिन गुरु तो जनम जनम के होते है /तुम मेरे से ऐसा बर्तावऐसा नही कर सकती त्यानंतर मी कधी तिला ओरडले नाही. तर तिच्या डोक्यावर, तिच्या समाधानासाठी ,माझी लायकी नसताना देखील आशीर्वादाचा हात ठेवत गेले न जाणो तिचा माझा गेला जन्माचा ऋणानुबंध असेल.
आपल्या धर्मात मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव असे म्हटले आहे म्हणजे आई-वडिलां पाठोपाठ गुरूंना मान देण्यात आला आहे . कलावंत लोक देखील परमेश्वरा खालोखाल गुरूला मानतात त्यांच्या नावाचा उल्लेख करताना आदर म्हणून कानाला हात लावतात.
महर्षी व्यासांना जगाचे गुरू मानले जाते ,त्यांनी सहा शास्त्रे अठरा पुराणे लिहिलेली आहेत शिवाय महाभारता सारखा सर्वांना ज्ञान देणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यासाठी गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणतात एखाद्या सणासारखा उत्सव केला जातो. गुरूंनी दिलेल्या कृपा दाना बद्दल त्या दिवशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरुवंदने मध्ये शरणांगत भाव व कृतज्ञता हवी
गुरू-श
िष्याचे नाते प्रेमाचे, श्रद्धेचे ,आणि विश्वासाचे असते .गुरूंचे महत्त्व कायम राखण्यासाठी राम ,कृष्ण हे देव असून देखील त्यांनी अनुक्रमे वशिष्ट आणि सांदिपनी यांना गुरु केले. गुरु-शिष्यांच्या अशा कितीतरी जोड्या अजरामर आहेत गुरु द्रोण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ,सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर ,या आदर्श गुरु-शिष्यांच्या जोड्या आहेत.
"शिष्यात इच्छिते पराजया" या संस्कृत सुभाषित अनुसार माझा शिष्य इतका मोठा व्हावा कि त्याने माझा पराजय करावा अशी कामना गुरु करतात . त्या कसोटीला वरील जोड्या उतरतात.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु "गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः"
प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही चांगला गुण असतो त्या गुणांसाठी त्या व्यक्तीला गुरू मानावा दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले आहेत त्यामध्ये सारी पंचमहाभूते, कबूतर, हत्ती ,मधमाशी ,मुंगी पतंग ,टिटवी ,आणि इतर बरेच आहेत पृथ्वी म्हटलं की स्थिरता, पतंग म्हणलं की समर्पण, मधमाशी संचय करण्याची वृत्ती, या अशा गुणांसाठी प्रत्येकाला त्यांनी गुरु मानलं
गुरु शिष्याला फक्त ज्ञानच देत नाही तर त्याला योग्य दिशा दाखवतो, घडवतो,
पण आताच्या काळातील गुरु हे बरेचसे भोंदूबाबा असतात .त्यांचे नादी लागून लोकांचे नुकसान होते ,गुरुपरंपरे वरील विश्वास उडतो. त्याबाबत कुणा बाबा बापू च्या नादी लागण्यापूर्वी लोकांनी विचार करावा .सदर व्यक्ती गुरु म्हणून योग्य आहे का?
तुमचा गुरु कोणत्यातरी जन्मात का होईना तुमच्यापर्यंत चालत येतो. पण त्यासाठी तुमची तळमळ कशी हवी? जर तुम्ही पाण्यात बुडत असाल तर श्वास घेण्यासाठी जेवढे धडपड कराल एवढी धडपड तेवढा ध्यास दर गुरुंसाठी घेतला तर तुमचे गुरु तुम्हाला नक्की भेटतात शेवटी म्हणतात ना
गुरुविण नाही दुजा आधार